गोळेगाव - ग्राम विकासाचे अद्भुत मॉडेल

गोळेगाव - ग्राम विकासाचे अद्भुत मॉडेल 

(सरपंचाच्या खुर्चीवर सावित्रीबाई आणि भारताचे संविधान)


वरील फोटोवरून आपल्याला अंदाज आला असेलच की, या गावातील लोकनेत्यांमध्ये खरच काहीतरी वेगळेपण आहे, ज्यामुळे हे गाव एक ग्राम-विकासाचे एक वेगळे मॉडेल म्हणून उदयास येऊ शकले. वरील फोटोमधील खुर्ची हि गोळेगाव येथील सरपंचांची आहे, ज्यावर ते कधीच बसले नाहीत तर, त्यावर आदर्श म्हणून सावित्रीमाता फुले आणि जगातील अनमोल ग्रंथ भारताचे संविधान ठेवलेले आहे. जे दररोज गावातील लोकनेत्यांना आणि गावकर्यांना गावाच्या विकासाकरिता निरंतर कार्य करण्याकरिता प्रेरणा देत असते.

गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि समाज कार्यात अग्रेसर श्री. सुनील चव्हाण आणि सुभाष चव्हाण यांच्या कृपेने गोळेगाव बघण्याचा योगायोग आला. गोळेगाव हे औरंगाबाद जिल्यातील खुलताबाद तालुक्यात, साधारणतः ४७७ परिवार असलेले २४५९ लोकसंखेचे गाव आहे. 

२० वर्षापासून गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावाचा विकास करून गावाला स्वयंपूर्ण करायला निश्चय केला होता आणि आज हो निश्चय त्यांनी पूर्णत्वास नेल्याचे दिसून येते. असा निश्चय करण्यास कारण ठरले, ते एका १३-१४ वर्ष वयाच्या मुलाचा लांबून पाणी आणताना दाहकतेने गेलेला जीव. ते दृश्य गावातील तरुण मैदानात क्रिकेट खेळत असतांना बघतात आणि त्याच दिवशी निर्णय घेतात कि, गावातील पाण्याचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत सोडवायचाच किंव्हा गाव सोडून जायचे!

गावातील सर्व तरुणांना गाव सोडून जाने तर श्यक्या नव्हते, त्यामुळे त्यांनी गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा निर्धार केला. गावातील प्रत्येक व्यक्ती मागे ५० रुपये लोकवर्गणी गोळा करून श्रमदानातून गावाच्या मध्यभागी विहीर तयार करण्यात आली आणि गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता सोडविण्यात आला. आणि त्यानंतर ते कधीच माघे वळले नाहीत. सरकारच्या मदतीविना एक -एक उपक्रम करून ग्रामपंचायत आणि तरुण मंडळींनी गावात सर्व सोयी- सुविधा कश्या उपलब्ध होणार याकरिता श्रमदानातून कार्य केलेत आणि खऱ्याखुऱ्या आत्मनिर्भर्तेकडे वाटचाल केली. 

२०१६ पासून सत्यमेव जयते वाटर कप मध्ये सहभागी होऊन श्रमदानातून गावातील ओसाळ माळरान हे हिरवेगार करून दाखविले आणि ज्या गावाला पाण्याकरिता टँकर सुरु करण्याची गरज भासली होती, ते गाव आज पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन उस लागवडीचे क्षेत्र वाढलेले दिसून येते त्याबरोबरच घरोघरी २४ घंटे नळयोजनेद्वारे पाणीपूरवठा होतो. आणि पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे तालुक्यातील सर्वात जास्त दुग्धउत्पादन करणारे गाव म्हणून ओळख निर्माण केली. 

हि किमया फक्त गावातील तरुण मंडळी तसेच गावाला लाभलेले स्वच्छ आणि पारदर्शी सरपंच श्री. संतोष जोशी व त्यांचे मित्र मंडळ यांचेमुळे घळून आलेली आहे.

कुठेही न बघायला मिळणारे असे अजून एक वेगळेपण या गावाचे आहे ते म्हणजे, ग्राम पंचायतीने गर्भवती महिलांकरिता एक गर्भ संस्कार केंद्र सुरु केले आहे, जेणेकरून गावातील कोणतीही गर्भवती महिला त्या केंद्रात जाऊन आराम करू शकेल, तिला वाटेल त्या महापुरुश्यांचे आत्मकथनपर पुस्तक वाचू शकेल, टी.व्ही. वरती गर्भ संस्काराच्या गोष्टी बघू शकते. असे अतिशय शांत, आणि सर्व सोयी युक्त हे केंद्र असून दुपारच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा त्या केंद्रात केलेली आहे.

गोळेगाववासी सर्व तरुणांना आणि तळफदार, स्वच्छ प्रतिमेचे सरपंच यांना नमन आणि खूप खूप शुभेच्छ्या.......






   

Comments

  1. खुपच छान गाव आहे.सर हे आम्ही पन बघितले खुप काही शिकण्यासारखे आहे ह्या गावात. धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय