Success Story- Farmer Producer Company ( यशोगाथा- शेतकरी उत्पादक कंपनी )

 Success Story- Farmer Producer Company 

( यशोगाथा- शेतकरी उत्पादक कंपनी )

मित्रहो, शेतकरी उत्पादक कंपनी बाबत आपण मागील लेखात जाणून घेतलेहोते, संदर्भाकरिता लिंक बघा.  (https://aamhishetakari.blogspot.com/2021/01/farmer-producer-organisation.html).

या लेखात जाणून घेऊ या की, आपल्या देशात शेतकऱ्यांच्या अश्या प्रकारच्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO- Farmer Producer Organization) अतिशय योग्य प्रकारे कार्य करीत असून आपल्या सभासदांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहेत, तसेच योग्य नफा मिळवून घेत आहेत. अश्याच प्रकारची एक यशोगाथा उदाहरणादाखल समजून घेऊ या..........

राजस्थान मधील अशीच एक शेतकरी उत्पादक कंपनी आहे, भारत सरकारची संस्था - SFAC (Small Farmers’ Agri-Business Consortium) ने त्यांच्या योजनेमधून तयार केलेल्या ह्या शेतकरी कंपनीची ही यशोगाथा मराठी शेतकऱ्यांकरिता अनुवादित करून उपलब्ध करीत आहो. जेणेकरून या उदाहरणावरून मराठी शेतकऱ्यांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी तयार करण्याबाबत उत्सुकता जागरूक होणार.

केदारनाथ किसान ग्रो प्रोड्यूसर कंपनी लि., टोंक,

(संदर्भ- Farmer Producer Organization Scheme Success Story (sfacindia.com) )

केदारनाथ किसान ग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड (केकेएपीसीएल), टोंक- राजस्थान, १५ फेब्रुवारी २०१३ ला ISAP या संस्थेने ३० गावातील १००० शेतकऱ्यांना सभासद करून रजिस्टर केली.


इनपुट सप्लाय शॉपची  (कृषी सेवा केंद्र) स्थापना-

ऑक्टोबर २०१ मध्ये या शेतकर्‍यांनी सुरुवातीला खत व कीटकनाशकांसाठी येणारा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने पाचेश्वर येथे कृषी केंद्र (इनपुट सप्लाय शॉप) सुरू करण्याचा निर्णय घेतला. जुलै २०१ पर्यंत शेतकऱ्यांनी 3.80 टन खते व कीटकनाशके यशस्वीरित्या विकली, याचे कारण असे होते की, सभासदांना कमी किमती खते आणि कीटकनाशक त्यांच्या कृषी केंद्रामार्फत उपलब्ध करून दिलेत. इतर व्यापा्याने अत्यधिक कमी किंमतीत खते विकल्यामुळे या शेतकर्‍यांना वेगवेगळे आमिष देण्याचा प्रयत्न करून स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, परंतु सदस्य शेतकर्‍यांनी एकत्रितपणे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार फिक्स दराने खतांची विक्री करण्याचा निर्णय घेतला.

एफपीओने शेती उत्पादनांच्या एकत्रीत करून विक्री करण्याकरिता, ग्रामीण स्तरावर संकलन केंद्र स्थापित केले आहे. शेतमाल काढणी झाल्यानंतर ठराविक दराने शेतकर्यांकडून थेट शेतमाल विकत घेऊन साठवणूक केल्या जातो, आणि बाजारातील किंमती वाढल्या की काही काळ ते ठेवल्यानंतर योग्य विक्रेत्यांना चांगल्या किंमतीला विकले जाते. अशा प्रकारे, विपणनाची ही प्रक्रिया एफपीओकरिता खूप फायदेशीर व्यवसाय ठरला आहे.

आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये या एफपीओने वाटाणा – रुपये- १७,१७२,४५०/- आणि हरभरा – रुपये- ६९,९८,८८७/- चा व्यवसाय केला. तसेच, या  एफपीओने टोंक येथे ०५ लाख रुपये किमतीचे डाळींचे प्रोसेसिंग युनिट उभारण्याची योजना आखत होती. ही यशोगाथा २०१६-१७ या आर्थिक वर्षात तयार केली होती, त्यामानाने आज या कंपनीचा टर्नओवर खूप जास्त झाला असेलच.

 

     अ.  क्र

तपशील

वार्षिक उलाढाल

कृषी सेवा केंद्र (निविष्ठा व्यवसाय- किरकोळ विक्री, बि-बियाणे, कीटकनाशक, खते. (जुलै २०१३)

रू. 3,४०,०००/-

शेतमाल खरेदी आणि विक्री (२०१६-१७)

रू. २,४१,७१,३३७/-



या कंपनीत प्रामुख्याने विविध जाती व समुदायातील लघु आणि सीमांत शेतकरी आहेत. कंपनीने सदस्यांना इंटरनेट कनेक्शनसारख्या काही मुख्य सोयीसुविधा पुरविल्या आहेत, जेणेकरून त्यांना हवामानाचा अंदाज देता येणार आणि शेतमालाच्या बाजारातील किंमतींविषयी माहिती देता येणार आणि शेतकरी त्यांचे उत्पादन विक्री करतांना दराबाबत जागरूक राहून मोलभाव करू शकणार.

वरील याशोगाथेमधून काय शिकाता येण्यासारखे आहे,

१)    छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना त्यांचा स्वतःचा विकास करायचा असेल तर, त्यांनी एकत्रित येऊन एकजूट होणे गरजेचे आहे.

२)      छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतीला लागणाऱ्या निविष्ठा एकत्रितपणे खरेदी करून आपल्या सभासदांना कमीत- किमतींमध्ये उपलब्ध करून द्यावे.

३)      शेतकऱ्यांसाठी कृषीविकास केंद्रे उपलब्ध करणे गरजेचे आहे, ज्या केंद्रामार्फत शेतकऱ्यांना गरज पडल्यास क्रेडीटवर बि-बियाणे, खते, किटकनाशक उपलब्ध करण्याची गरज आहे. 

४)      शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले उत्पादन हमी भावात विकत घेण्याकरिता खरेदी केंद्र स्थापन करण्याची गरज आहे.

५)      शेतकऱ्यांना आवश्यक माहिती जसे, हवामानाचा अंदाज, बाजार भाव तसेच पिकाबाबत तंत्रज्ञान अश्या प्रकारची माहिती वेळेत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

६)      छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे वाटणारे सेवा केंद्रे जेणेकरून त्या ठिकाणी त्याला वेळेत, आणि क्रेडिटवर आवश्यक गोष्टी उपलब्ध होऊ शकणार आणि त्याच्या मालाला हक्काचे आणि हमी भावात खरेदी करणारी कंपनी २४ तास उपलब्ध असेल. असे झाल्यास छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांचे सावकार, व्यापारी, बिज कंपन्या, खताच्या व कीटकनाशकाच्या कंपन्या यांच्यापासून सुटका होणार व शेतमालाला हमी भाव मिळेल.

****************** 






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय