Posts

FPO Scheme (एफपीओ योजना)- Launch For 10,000 New FPOs Formation

Image
  FPO योजना - १०,००० नवीन शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करणे मित्रहो , नवीन शेती सुधार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने रु. ६००० कोटी रुपयांची तरतूद करून त्याअंतर्गत संपूर्ण देशभरात १० , ००० एफपीओ (फार्मर प्रोडुसर ऑर्गनायझेशन - शेतकरी उत्पादक संस्था) तयार करण्याकरिता योजना आणि त्यांची मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यामध्ये काय-काय तरतुदी केल्या गेल्यात याबाबत थोडक्यात जाणून घेऊया,    योजने ची उद्दीष्टे - १)    कार्यक्षम आणि शास्वत उत्पन्न देऊ शकेल, अश्याप्रकारच्या शेतीच्या विकासासाठी आणि एकूणच सामाजिक-आर्थिक विकासासाठी आणि कृषी क्षेत्राच्या कल्याणकारीतेसाठी नवीन 10,000 एफपीओ तयार करण्यासाठी समग्र आणि व्यापक व सहाय्यक अशी संरचना उपलब्ध करून देणे.   २)      कार्यक्षम, किफायतशीर आणि टिकाऊ संसाध नांचा वापर करून, शेतीची उत्पादकता वाढविणे, आणि त्यांच्या उत्पादनांसाठी उत्तम , सरळ,  बाजारपे ठेसोबत जोडून जास्तीत-जास्त नफा मिळवून देणे आणि सामूहिक प्र क्रियेतून त्याला शास्वत बनणे. ३)      एफपीओ चे...

FPO Registration- Cooperative Society act & Indian Company Act

Image
  FPO Registration- Cooperative Society act & Indian Company Act मित्रहो , मागील लेखात आपण (FPO- Farmer producer Organisation) शेतकरी उत्पादक संस्था याबाबत सविस्तर जाणून घेतले, त्यामध्ये आपण बघितले की , शेतकरी उत्पादक संस्थेचे रजिस्ट्रेशन आपण ०६ प्रकारच्या कायद्याच्या तरतुदीनुसार करू शकतो , परंतु बहुतेक शेतकरी उत्पादक संस्था ह्या सहकारी सोसायटी कायदा  ( Cooperative Society Act) किंव्हा भारतीय कंपनी कायदा (Indian Company Act) अश्या दोन कायद्यानुसार नोंदणी केलेल्या आहेत, किंबहुना केंद्र सरकारच्या नवीन योजनेनुसार नवीन तयार करावयाच्या शेतकरी संघटनांचे रजिस्ट्रेशन या दोन कायद्यांतर्गत करण्याकरिता नियोजन केले आहे.  तर आपण जाणून घेऊ या की , “सहकारी सोसायटी कायदा  ( Cooperative Society Act) ” आणि “भारतीय कंपनी कायदा (Indian Company Act) ”  यातील फरक समजून घेऊ या , जेणेकरून तुम्हाला तुमच्या गावात शेतकरी उत्पादक संस्था ( FPO ) तयार करावयाचे ठरल्यास, त्यांची नोंदणी कोणत्या कायद्यानुसार करावी याचा निर्णय घेता येऊ शकतो.     १)     नोंदणी- ...

शेतकरी उत्पादक संघटना - (FPO) चे व्यवसाय नियोजन (बिझनेस प्लान)

Image
  शेतकरी उत्पादक संघटना - ( एफपीओ ) चे व्यवसाय नियोजन (बिझनेस प्लान) मागील लेखात आपण चर्चा केल्यानुसार, शेतकरी उत्पादक कंपनी तयार केल्यानंतर त्याचे व्यवसायाचे नियोजन कसे करायचे याबाबद या लेखात चर्चा करूया. शेतकरी उत्पादक संघटना/ कंपनीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असल्यास काहीतरी व्यवसाय करणे गरजेचे असते. आणि जो व्यवसाय एफपीओने सर्वानुमते आणि अनुभवी तज्ञांच्या मदतीने निवडला असेत, त्या व्यवसायाचे “बिझनेस प्लान” करणे आवश्यक आहे. त्यानुसारच कोणत्याही बँकेकडून पतपुरवठा मिळू शकेल आणि एक लक्ष ठेवून एफपीओ आपला विकास करू शकेल. तर जाणून घेऊया शेतकरी उत्पादक संघटना/ कंपनीचे- ( एफपीओ ) चे व्यवसाय नियोजन (बिझनेस प्लान) कसे तयार करावे, आणि कसा पतपुरवठा मिळवावा. तर शेतकरी कंपनी ही साधारणतः आपल्या सभासदांना निविष्ठा उपलब्ध करून देणे , किंव्हा विक्री ची व्यवस्था करून देणे, किंव्हा सेवा पुरविणे , किंव्हा शेतउत्पादनावर मूल्यवर्धन करून त्यांची बाजारात विक्री करण्याच्याबाबतीत व्यवसाय करू शकतो.   तर मूल्यवर्धन साखळी विकास (व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट) संकल्पना काय आहे ? व्हॅल्यू ...