Posts

Soil Testing- (माती परीक्षण) - फायद्याची शेती

Image
 माती परीक्षण - फायद्याची शेती  मित्रहो , पारंपारिक शेती कडून आधुनिक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे , हे कटुसत्य असून सर्व ह्याबाबत ज्ञात आहेत. तथापि पारंपारिक शेतीमधील बऱ्याच गोष्टी अजूनही टिकवून ठेवणे, ही सुद्धा काळाची गरज आहे, त्याचाच अर्थ पारंपारिक शेती व आधुनिक तंत्रज्ञान या दोघांची सांगळ घालून आधुनिक शेती करणे हे शेतकर्यांकरिता जास्त महत्त्वाचे वाटते. याचाच एक भाग म्हणजे शेतीच्या हंगामाला सुरवात करण्याअगोदर शेतीच्या तब्बेतीची ( SOIL HEALTH) तपासनी करून घेणे हे शेतकऱ्यांचे प्रथम कर्तव्य आहे. आणि त्याकरिता माती परीक्षण करणे खूप खूप गरजेचे असते. तर चला आज माती परीक्षणाबाबत जाणून घेऊ या..........   माती परीक्षण म्हणजे काय ? आणि त्याचे महत्त्व काय आहे ? माती परीक्षण म्हणजे जमिनीमध्ये किती प्रमाणात नैसर्गिकरित्या अन्नद्रव्य उपलब्ध आहेत, आणि ते आपल्या पिकाला किती प्रमाणात उपलब्ध होऊ शकते, याची चाचणी करून अहवाल प्राप्त करणे होय. साधारणतः शेती करतांना आपण लागवड केलेल्या पिकाला वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते , त्यांची पूर्तता आपण वेगवेगळ्या खतामधून करीत असतो, प...

सामुहिक प्रयत्नातून पावसावर आधारित शेती विकास

Image
सामुहिक प्रयत्नातून पावसावर आधारित शेती विकास   “ शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय ” हा लेख वाचून एका मित्राने फीडबॅक दिला की , “ Land holding कमी असल्याने शेतकरी एकत्र येऊन शेती करणे आवश्यक परंतु dryland Agriculture मध्ये निसर्गाच्या लहरी पणा मुळे शाश्वत उत्पन्न येईलच याची खात्री नाही त्यामुळे जोखमीचे आहे” ..... त्यांचा हा फीडबॅक खूप चांगला आणि अतिशय महत्वाचा आहे , असे प्रश्न मनात येणे साहजिकच आहे ,   आपल्या राज्यात तसेच देश्यात शेती ही खूप मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे , आणि वातावरणातील होत असलेल्या बदलामुळे अवकाळी पाऊसामुळे पीक घरी येई पर्यंत शास्वती नसते की , पीक होणार कि नाही. वरील फीडबॅक नुसार तसे बघता , संघटन करणे आणि निसर्गावर आधारित शेती करणे ह्या दोन्ही गोष्टी अगदी वेगळ्या आहेत. आणि जर संघटन असेल तर कोणत्याही प्रश्नावर उत्तर मिळविता येऊ शकते. असो , तर निसर्गावर आधारित शेती किंव्हा पावसावर आधारित शेती बाबत थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू या.... पावसाच्या पाण्यावर आधारित शेतीमधील आव्हाणे काय आहेत-  पावसावर आ...

जुगाडातून आत्मनिर्भर

Image
  जुगाडातून आत्मनिर्भर भारत खेड्यापाड्यात विभागला असल्यामुळे सूक्ष्म व्यवसाय ( Micro Business ) हा ग्रामीण विकासाचा महत्त्वपूर्ण अंग आहे. अश्याप्रकारच्या व्यवसायातून स्वरोजगाराची निर्मिती होते, आणि स्वतःबरोबरच परिवाराला आत्मनिर्भर करण्यास मदत होते. असाच  एक ग्रामीण भागातील सज्जन श्री. नरेशभाऊ पवार मु. भद्रावती, जिल्हा- चंद्रपूर हे आत्मनिर्भर झाले आहेत.   नरेशभाऊंनी जुगाड करून त्यांच्या M -80 गाडीला थ्री-व्हीलर मध्ये रुपांतरीत करून कटलरी व्यवसायातून दिवसाला ८०० ते १००० रुपये पर्यंत उत्पन्न घेत आहेत. ग्रामीण भागातील परीवाराची  उपजीविका चालविण्याकरिता इतके पैसे पुरेसे आहेत , ज्यात मुलांचे शिक्षण , आरोग्य , रोजची उपजीविका आरामात केली जाऊ शकते. अगोदर नरेशभाऊ हे सायकलवरून हा व्यवसाय करायचे, त्यावेळेस जवळपासच्या फक्त १ किंव्हा २ गावात फिरून दिवसाला १५० ते २०० रुपये पर्यंत उत्त्पन्न मिळवायचे , त्यात परिवार चालवणे त्यांना खूप कठीण व्हायचे. त्यानंतर त्यांनी व्यवसाय वाढविण्याकरिता जुगाड करून M -80 गाडीला थ्री-व्हीलर तयार केली, आता ते रोज ५ ते ६ गावात जातात आणि ८००-१००० रुप...