Posts

शीतपित्त उपाय

 शीतपित्त उपाय सकाळी उठल्यावर चिमूटभर तांदूळ म्हणजे 8-10 चावून खावे व वरती पाणी पिऊन घ्यावे तद्नंतर 15 मिनिटांनी सकाळीची सर्व कर्म उरकुन घ्यावी. ज्या ठिकाणी पित्त उठणे व खाजवणे त्या जागी तूप लावणे. औषधी: हरिद्रखंड 1-1 चमचा सकाळी व संध्याकाळी, Allergin Grannuals वरीलप्रमाणे, Alert capsule 1-1 वरीलप्रमाणे जेवणानंतर संधर्भ-  वैद्य श्री. माळाकोळीकर,  नाडी परीक्षण तज्ञ श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ.   मोबाईल क्रमांक- 7350911888 अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

पांढरे मीठ व काळे मीठ यातील फरक

Image
  पांढरे मीठ खाल्ल्याने वजन वाढते. काळे मीठ वजन कमी करते. २ काळ्या मीठामुळे केसांतील कोंडा, केसगळती, केस दुभंगणे या समस्या दूर होतात. शरिरातील आयर्नचे प्रमाण वाढते. ४ काळ्या मीठाच्या सेवनाने स्नायू मजबूत होतात. ५ पोटाच्या विकारांवरही काळे मीठ गुणकारी आहे. ६ अंगदुखी कमी करण्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. ७ यातील पोषकतत्वे त्वचेसाठी फायदेशीर असतात. ८ उच्च रक्तदाबावर नियंत्रण राहते. ९ शरिरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यासही मदत होते.  लवंग खाल्ल्याने कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते. यामुळे हार्ट प्रॉब्लेम टाळण्यास मदत होते.हे खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. डायबिटीजपासून बचाव होतो.यामुळे तोंडात सलायवा तयार होते. यामुळे पचन चांगले होऊन अ‍ॅसिडीटी होत नाही. संधर्भ-  वैद्य श्री. माळाकोळीकर,  नाडी परीक्षण तज्ञ श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ.   मोबाईल क्रमांक- 7350911888 अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

वातदोष

  वर्षा ऋतूच्या काळात- 1.अग्नि मंद झालेला असतो,   2.शरीरात वातदोषाचा प्रकोप झालेला असतो ,    3 शरीराची प्रतिकारक्षमता कमी झालेली असते . हे तीन मुद्दे एव्हाना तुम्हाला पाठ झालेचं असतील   त्यात सध्याच्या कोरोना साथीमुळे , सगळ्यांचा मानसिक तणावही खूप वाढलेला आहे ,त्यामुळे आधीच उणावलेली प्रतिकारशक्ती अजून खालावते.  अशा कसोटीच्या काळात आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी , प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी ,नेहमीच्या दिनक्रमात ,घरच्याघरी करता येण्यासारखे, अतिशय परिणामकारक पण साधे-सोपे उपचार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, आता त्याची थोडक्यात माहिती करून घेऊया व हे उपचार शक्य तेवढे आचारणातही आणूया . कारण हे सर्व केवळ लेखाचे विषय नसून, प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या गोष्टी आहेत.  म्हटलेले आहेचं ना की, एकतरी ओवी अनुभवावी. अभ्यंग व  उद्वर्तन-  अभ्यंग म्हणजे सर्व शरीराला तेलाने मालिश करणे .  अभ्यंगाची सुरवात  खरतरं साधारण दिवळीपासून करावी, पण वर्षा काळात होणारा वातप्रकोप लक्षात घेता, आठवड्यातून  एक वेळा , सकाळी उपाशीपोटी,  तिळाचे तेल ,नार...

"क्लँपिंग थेरपी,"

Image
  "क्लँपिंग थेरपी," 👏👏👏👏👏👏👏 देवाची आरती करताना असो किंवा उत्साहाच्या क्षणी टाळ्या या आपसुकच वाजवल्या जातात. मानवी शरीरात 340 प्रेशर पॉईन्ट्स असतात. त्यापैकी 27 हाताच्या तळव्यामध्ये आढळतात. असे Kairali Ayurveda group चे डॉ. राहुल डोग्रा सांगतात.  त्या प्रेशर पॉईंटवर विशिष्ट दाब दिल्यास, मसाज केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. अनेक वेदना कमी करण्यास मदत होते. क्लॅपिंग थेरपी – :     खोबरेल तेल किंवा तीळाचे तेल हाताला लावून मसाज करा. ते हळूहळू त्वचेमध्ये शोषले जाते. दोन्ही हात एकमेकांवर ठेवा. ते डोळ्यासमोर ताठ ठेवा. खांदे थोडे सैलसर ठेवा. हा उपाय सकाळच्या वेळेस अधिक फायदेशीर ठरते.      सकाळच्या वेळेस 20-30 मिनिटं टाळया वाजवल्यास तुम्ही फीट आणि अ‍ॅक्टीव्ह रहाल. कारण टाळ्या वाजवल्याने रक्तप्रवाह सुधारतो. रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते. तसेच घातक कोलेस्ट्रेरॉलचा त्रासही कमी होतो असा सल्ला डॉ. डोग्रा देतात. टाळी वाजवल्यानंतर कोणत्या 5 अँक्युपंचर पॉईंटला चालना मिळते  : 1       Hand valley point 2.    ...

कृषी हा व्यवसाय समजावा- Treat Agriculture as a Business

Image
  कृषी हा व्यवसाय समजावा- Treat Agriculture as a Business बऱ्याच महिन्यानंतर मागील आठवड्यात फिल्ड मध्ये जाण्याचा योग आला आणि बऱ्याच शेतकरी मित्रांबरोबर चर्चा करण्याचा झाली. सहज शेतामध्ये आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या एका शेतकरी मित्राने विचारले कि, शेतकरी शेती योग्य रीतीने करीत नाही व आजकाल शेती परवडणारी राहिली नाही. याचे नेमके कारण काय असावे ?? असा प्रश्न विचारून त्यांनी त्यांच्या अंदाजाने सांगितले कि, असे असण्यामागचे कारण कदाचीत असे असावे कि, शेतकरी अनपड/ अडाणी आहे, किंव्हा शेतकरी आळसी आहे, त्यामुळे त्याला कितीही शिकविले किंव्हा माहिती असली तरी आळसीपणामुळे व्यवस्तीत शेती करीत नाही. त्या शेतकऱ्याचा प्रश्न आणि त्याचे अंदाज हे त्यांच्या विचारांनी बरोबर आहेत, किंबहुना भारतातील बऱ्याच लोकांचा हाच समाज आहे (खासकरून पांढरपेशी लोकांचा) कि, भारतातील शेतकरी अडाणी व आळसी आहे. परंतु हे खरे असेल काय ?? हा प्रश्न कायम राहतो.... मग वरीलप्रमाणे विचार केल्यास,  १) शेतकरी जर अडाणी असता तर, भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतीचे उत्पादन होते. किंबहुना बऱ्याच पिकांमध्ये आपला भारत देश जगात नं...

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

Image
  पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop) कोणत्याही पिकाला नत्र, स्फुरद व पालाश (NPK) या मुख्य अन्नद्रव्याबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा खूप गरज  असते.  जसे-  कॅल्शियम ,  मॅग्रेशियम ,  सल्फर,कार्बन  डायऑक्साईड ,  हायड्रोजन ,  ऑक्सिजन ,  लोह ,  मॅगनीज ,  बोरॉन , झिंक ,  कॉपर ,  मॉलिब्लेनम ,  क्लोरीन, आदी. पिकाच्या वाढीसाठी आवश्यक १६ अन्नद्रव्यांपैकी १३ जमिनीतून , तर तीन अन्नद्रव्ये पाणी आणि हवेतून मिळतात. या १३ अन्नद्रव्यांपैकी अधिक प्रमाणात लागणारी तीन , मध्यम प्रमाणात लागणारी तीन व कमी प्रमाणात लागणारी सात मूलद्रव्ये आहेत. त्यांना अनुक्रमे प्रमुख , दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणतात. - प्रमुख अन्नद्रव्ये - ही नत्र ( N2), स्फुरद ( P2O5) व पालाश ( K+) - दुय्यम अन्नद्रव्ये - कॅल्शियम ( Ca2+), मॅग्नेशियम ( Mg2+) व गंधक ( SO42) - सूक्ष्म अन्नद्रव्ये - लोह ( Fe2+), मँगेनीज ( Mn2+), कॉपर ( Cu2+), झिंक ( Zn2+), बोरॉन ( H3BO3), मॉलिब्डेनम ( MoO42) आणि क्लोरिन ( Cl-), निकेल ( Ni2...

जमिनीचा सामू - Soil pH

Image
आपले शेतकरी माती परीक्षण करतात आणि माती परीक्षणाच्या रिपोर्टमध्ये नेहमी मातीचा सामू / pH बाबत अहवाल दिलेला असतो, आणि त्यानुसार आपल्याला जमिनीच्या सुधारणेचे नियोजन करता येतो. जमिनीचा सामू / pH न्युट्रल असेल तर त्या जमिनीमध्ये योग्य प्रकारे पिकाला अन्नद्रव्याचा पुरवठा होतो, तसेच उत्पादन योग्य प्रमाणात मिळते. जमिनीचा सामू काय असतो याबाबत जाणून घेऊ या... मातीचा/ जमिनीचा सामू - (Soil pH) काय असतो-  मातीचा सामू (पीएच) हे जमिनीच्या आम्लता किंवा क्षारीयतेचे मोजमाप आहे.  जमिनीचे त्यांच्या pH (Power / persentage of Hydrogen) च्या  उपलब्धतेनुसार वर्गीकृत करता येते:  6.5 ते 7.5 — तटस्थ ( Neutral ) 7.5 पेक्षा जास्त - क्षारीय (Alkaline) 6.5 पेक्षा कमी -आम्लीय (Acidic), आणि 5.5 पेक्षा कमी पीएच असलेली माती अतीआम्लीय मानली जाते.   मातीचा सामू/ पीएच चे महत्व काय आहे? आपली जमीन आम्लधर्मी आहे किंवा अल्कधर्मी आहे ते त्याच्या सामू/ पीएच द्वारे दर्शविली जाते. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान (सरासरी ७) असल्यास  तटस्थ / N eutral  माती असते त्या जमिनीमध्ये पिके खूप चांगल्...