Posts

आमटीभात... वरणभात... दहीभात... ताकभात... कालवणभात... पिठलंभात... केशरीभात

 क्या #भात है!! ---आमटीभात... वरणभात... दहीभात... ताकभात... कालवणभात... पिठलंभात... केशरीभात... वगैरे सांप्रत काळात भारत देशात डाएट नावाच्या फॅडने  किंवा स्टाईलने भात किंवा तांदूळ ह्या आपल्या लाडक्या आणि आवडत्या अशा पदार्थावर फार मोठी कुरघोडी करायला लावली आहे.  विकेट किपिंग करताना जांभया दिल्याबद्दल पाकिस्तानी कॅप्टन सरफराज अहमद जितका बदनाम झालाय त्यापेक्षा काकणभर जास्तच बदनामी डाएट ह्या प्रकाराने भाताची केलेली आहे. आणि समस्त भारतीयांसाठी ही गोष्ट खचितच महान चिंतेची बाब आहे.  भा  र  त ह्या शब्दाची व्युत्पत्तीच मुळात 'भात जेवण्यात रत असलेल्या लोकांचा देश' अशी व्हायला हवी होती आणि तेच जास्त संयुक्तिक झालं असतं नाही का. ज्या देशाच्या नावातच भात लपलेला आहे अशा लोकांनी भात सोडणे किंवा वजन वाढते म्हणून त्याला त्यागणे म्हणजे ऑस्ट्रेलियाने स्लेजिंगचा त्याग केल्यासारखं होईल.  भारतीय माणसाने आमटी भाताला नाही म्हणणे म्हणजे आमटीभाताचा घोर अपमान, म्हणजे स्टीव्ह बकनरने सचिनला नॉट आऊट देण्यासारखं आहे. बकनरने सचिनला खोटं आऊट देऊन आपलं नाव राखावं आणि आपण आमटीभात जेवून ...

थंडी हिवाळा - आरोग्य टिप्स

 थंडी हिवाळा  - आरोग्य टिप्स सर्दि ताप व्हायरल इन्फेक्षन  खोकला  कफ  घसा दुखने अशा त्रासाला सामोरे  जाव लागत आहे तेव्हा  या सर्व आजारावर खालील उपाय करा व निरोगी रहा👇  1:- आले 2 तुकडे+ १०/१५तुळशीचेपाण + 4/5मिरे + थोडी दालचिनी व एक चमचा जिरे  खोकला असेल तर  3/4लवंग  हे मिक्सर मधे बारीक करून 2 ग्लास  पाणी टाकुन उकळून पाणी एक ग्लास होई पर्यंत ऊकळू द्या 4 भाग करून दिवसात 4 वेळा घ्या कोमट कोमट घ्या त्यात तुम्ही आणखी पाणी अँड करू शकता जर तुम्हची ताप सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्षन बरेच दिवसांनी असेल तर  कडनिंबावरिल गुळवेलाची काडी  यात अॅड करायचा आहे हा उपाय   2 तासात ताप सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्षन गायब होईल  हा प्रयोग 4 दिवस करा  फॅन ac टाळा शक्यतो कोमट पाणी प्या 4 दिवसात 100% बरे व्हाल   सर्दी मुळे  घसा दुखत आहे ? घसा दुखणे  – दूध , हळद व गुळ  याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी  कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते. घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला ...

आमवात (Rheumatoid Arthritis)

आमवात (Rheumatoid Arthritis)  आमवात हा बरा होण्यास खूप वेळ घेणारा आजार आहे..पेशंट आणि डॉक्टर ची सत्वपरीक्षा च म्हणा ना..सतत या आजारामध्ये ups आणि downs येत असतात ..आज पेशंट बरा आहे म्हणेपर्यंत हवामान बदल,खाण्या पिण्यात बदल झाला तर लगेच सांधे दुखायला आणि सुजायला सुरवात होते.. "रोगा: सर्वेपी मंदेग्नो" म्हणजे सगळ्या आजारांचे मूळ कारण हे आयुर्वेदामध्ये अग्निमांद्य सांगितले आहे..अग्नी मंद असेल ,नियमित व्यायाम करत नाही आणि विरुद्ध आहार वरचेवर सेवन यामुळे आमवाताची पाया भरणी होते.. सामान्य लक्षणे १)अंग जड होते २)ताप येतो  ३)भूक मंदावते  ४)पोट साफ होत नाही  ५)सांधे स्पर्शाला गरम लागतात. ६)सांधे सुजतात आणि लाल होतात. ७) अतिशय तीव्र वेदना होतात सांध्याच्या ठिकाणी. आमवातामध्ये वेदना एका सांध्या कडून दुसऱ्या सांध्याकडे संचार करतात.हालचाल खूप मंद होते.  RA Test negative आली म्हणजे आमवात नाही असे म्हणता येणार नाही.लक्षणांवरून आमवात ओळखता येतो.    या आजारात पथ्यापथ्य पाळणे अत्यंत गरजेचे असते.पचायला हलका आहार घ्यावा लागतो..   मोठ्या डाळी,दही,तेलकट पदार्थ ,विरुध्द ...

कोमट पाणी पिण्याचे फायदे

 कोमट पाणी पिण्याचे फायदे, बरेच रोग होतात दूर  सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोमट पाणी पिल्यामुळे शरीराची घाण साफ होते. कोमट पाणी पिण्यामुळे, शरीरातील विषारी द्रव मूत्रमार्गे बाहेर पडतात. सकाळी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीर शुद्ध होते. जाणून घ्या फायदे. आपले शरीर बहुतांश पाण्याने बनलेले आहे. जर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर बरेच रोग शरीरात घर करू लागतात, याचाच अर्थ पाणी आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. कोमट पाणी एक औषध म्हणून कार्य करते. बहुतेक लोक दिवसाची सुरुवात गरम चहा किंवा कॉफीने करतात, जेणेकरून शरीराला ताजेतवाने वाटेल. त्याच वेळी, पाणी पिताना, सामान्य किंवा थंड पाणी पितात. आयुर्वेदानुसार हे चुकीचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सर्दी पडश्यात लाभदायक सर्दी झाल्यावर कोमट पाणी पिण्याने कफ वितळतो. दिवसातून तीन किंवा चार वेळा कोमट पाणी घेतल्यास थंडीत आराम मिळेल. कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या केल्याने देखील खोकला बरा होऊ शकतो. कोमट पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होते वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्याचा व...

खोकला घरगुती उपाय

 घरगुती उपचार  खोकला  ज्यांना खुप जास्त खोकला येत असेल औषधांनी तेवढ्यापुरता थांबुन परत - परत तोच त्रास होत त्यांनी हा उपाय करायला हरकत नाही गुण येईल.  अगदी थोडी हळद पावडर तोंडाच्या एकदम आत मध्ये जे छोटेसे मांसाचे लोलक असते त्यास लावावी, चटकवावी. हाताने शक्य नसेल तर छोट्या चमचीस तुप लावुन त्या चमचीस हळद पावडर लावा व त्याने केले तरी चालते, दिवसातून तीन तार वेळेस लावले तर उत्तम, लाभ त्वरीत होतो.  निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

चहा

 चहा ☕ मग सकाळी उठल्यावर चहा प्यावा की नाही ?   अगदी सकाळी उठल्यावर तोडं धुतले की  लगेचच चहाची गरजही नसतेच !  वास्तविक रिकाम्यापोटी घेतलेला चहा  हा काही वेळाने लागणार्या भूकेलाही नाहीशी करतो.  म्हणजेच चहा प्यायचा टाळला  तर नाष्ट्याची भूक कडकडून लागते.  हा अनुभव प्रत्येकाने घेतला तरच कळतो…  चहा न घेता तसेच राहीले असता..  पित्ताचा काळ हा सकाळी १० ते दुपारी २ असल्याने  ह्या काळात चांगली भूक लागते.  चहा हे पेय शीतप्रदेशाचे पेय आहे.  थंड प्रदेशात गारठा कमी व्हावा म्हणून  चहा/कॉफी पाना ची पद्धती आहे.  ▪ आपल्याकडे फारतर पावसाळ्यात व हिवाळ्यात चहा/कॉफी प्यायला हरकत नाही परंतु तो गोदुग्ध युक्त असावा.  ▪अति तुरट किंवा कडू रसात्मक असा नसावा.  ▪परंतु जे पित्तज प्रकृती आहेत, ज्यांना पित्ताचे विकार संभवतात त्यांनी चहा शक्यतो अतिप्रमाणात टाळावा.  त्यांना ऐवजी गोदुग्ध + गोघॄत (गाईचे तूप) + साखर घ्यायला हवे. ▪ चहा बनवताना त्यात सुंठ व वेलची पावडर टाकावी म्हणजे पचनास मदत होते,  पित्त वाढत नाही व इंद्रियांचा जडा...

हेमंत ऋतूत काय खावे ? काय खाऊ नये

 आला हेमंत ऋतू.... या ऋतूत काय खावे ? काय खाऊ नये ?  *   १. ऋतूचे नाव - हेमंत   २. काळ - ऑक्टोबरचा उत्तरार्ध,  नोव्हेंबर पूर्ण, डिसेंबरचा पूर्वार्ध  ३. दोष प्रकोप - त्रिदोष संतुलीत असतात म्हणूनच याला आरोग्यदायी ऋतू म्हणतात.  ४. योग्य आहार रस - गोड, आंबट, खारट  ५. अयोग्य आहार रस - कडू, तिखट, तुरट  ६. हे खावे -  तूप, लोणी, तेल, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, दूध घातलेली तांदळाची खीर, उडीद, खडी साखर, रबडी, मलई, मध, ऊसाचा रस, हलवा, डाळी, मोड आलेले हरभरे, मोड आलेली कडधान्ये, मूग, गहू, ज्वारी, जुना तांदूळ, आवळा, संत्रे, मिठाई, सुका मेवा, मांसाहार, च्यवनप्राश, मोरावळा, गरम पाणी, गरम अन्न भाजी - पडवळ, वांगी, कोबी, लाल टोमॅटो, गाजर, मटार, पालक  ७. हे खाऊ नये -  कोरडे पदार्थ, आईस्क्रिम, थंड पेय व थंड पदार्थ, चिंच, आमसूल, आंबट दही, आंबा लोणचे, पातळ पदार्थ  ८. हे करावे -   👉 रोज सकाळी ब्रश झाल्यावर चहाच्या चमच्याने अर्धा चमचा हिरडा चूर्ण आणि अर्धा चमचा सुंठ चूर्ण एक कप दुधात उकळून किंवा पाण्यात काढा करुन घ्यावे. 👉 सूर्योदय...