Posts

सोयरासिस (अ‍ॅक्ने) सारख्या त्वचाविकारांवर परिणामकारक आयुर्वेदीक उपाय

 सोयरासिस (अ‍ॅक्ने) सारख्या त्वचाविकारांवर परिणामकारक आयुर्वेदीक उपाय रक्तामधील अशुद्धीमुळे अ‍ॅक्नेचा त्रास अधिक वाढतो. म्हणूनच ब्रेकआऊटचा त्रास कमी करण्यासाठी रक्तशुद्धीचा पर्याय सर्वप्रथम सुचवला जातो. रक्तासोबत शरीरात टाकाऊ घटक आणि कार्बन डायऑक्साईडचादेखील प्रवाह होतो. त्यामुळे या घातक घटकांना बाहेर काढणे आवश्यक असते.  काही नैसगिक उपायांनी रक्तातील अशुद्धता कमी करण्यास मदत होते. यामुळे सोयरासिस, गजकर्ण (eczema)यासारखे अनेक त्वचाविकार कमी करण्यास मदत होते. फळं :   संत्री, रास्पबेरी, किवी, अ‍ॅव्हॅकॅडो, द्राक्षं या सारखी मुबलक पाण्याचा समावेश असणारी फळं आहारात घ्या. यामध्ये रक्त शुद्ध करण्याची क्षमता असते. यामुळे त्वचा तजेलदार होते. हर्बल टी :   चहा पिणे चांगले की वाईट हा अनेकांसाठी वादाचा मुद्दा आहे. मात्र त्यामध्ये काही हर्ब्स मिसळल्यास शरीरातील घातक घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. काही हर्बल टी पसंतीनुसार घरी बनवता येतात. आलं, पेपरमिंट  हर्बल टी घरी देखील बनवता येतात. हर्ब्स - : पळस, बदाम, अळशी, बभूळ  यांची पानं नैसर्गिकरित्या औषधी असतात. यामुळे र...

निरोगी राहण्याकरिता घरगुती उपचार

Image
  निरोगी राहण्याकरिता घरगुती उपचार  आज थोडा वेगळ्या विषयावर माजा स्वताचा आलेला अनुभव आपणां सर्वांन सोबत शेअर करत आहे, शक्य असल्यास करून बघा, गुण आल्यास मानव सेवेचे कार्य करा.  ( फक्त १ चिमूट ) आंघोळीच्या पाण्या सोबत काय टाकल्याने काय फरक पडतो हे करून पहा, हा प्रयोग २१ दिवस नियमित करावा.  🔘पाण्यात भीमसेन कापुर टाकल्यास अंग हळवे होते, थकवा जातो, पित्त कमी होते. 🔘हळद टाकल्यास त्वचेचे विकार थांबण्यास मदत होते, शिवाय मन व शरीर स्वस्थ राहते. 🔘भिमसेन कापुर व हळद टाकल्यास, केस गळणे कमी होते, जखम असल्यास लवकर बरी होण्यास मदत होते. 🔘खस पावडर व हळद टाकल्यास शरीरास थंडावा मिळतो. 🔘केसर व गुलाब पाणि टाकल्यास सर्दी कमी होण्यास मदत होते. 🔘लैंगीक समस्या स्री/पुरूष वेलची व लवंग पावडर करून टाकावी.  🔘मानसिक आजार असल्यास चिंचपावडर व गुलाब पाणि टाकावे, विचार कमी होतात.  🔘त्वचारोग असल्यास लिंबाचा पाला व खडेमिठ टाकावे.  🔘आर्थिक समस्या असल्यास भिमसेन कापुर, खस पावडर, व हळद टाकावी ( ४० दिवस ) पहिल्या दिवसापासुन फरक पडतो.  अजुन अनेक समस्यांवर आंघोळीच्या पाण्यात चिम...

अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Image
  अंजीर खाण्याचे  आरोग्यदायी  फायदे                 अंजीर मध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. अंजीर थंड असले तरी ते पचण्यास थोडे जड असते. हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये किंवा मिठाईमध्ये वापरले जाते. पण सुक्या अंजीरपेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते. ताज्या अंजीराच्या सेवनानं पोषक घटक जास्त प्रमाणात मिळतात, तर सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात.    अंजीर खाण्याचे फायदे : १) अंजीर पित्त विकार, रक्त विकार, वात व कफ विकार दूर करणारे आहे. ताज्या अंजीरामध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असतात, तर सुक्या अंजीरामध्ये अनेक प्रकाराचे उपयोगी क्षार आणि जीवनसत्त्वे असतात. २) अंजीरात लोह घटक अधिक असतो. यामुळे आमाशय जास्त क्रियाशील बनते; त्यामुळे भूक फार लागते म्हणूनच रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) या आजारामध्ये अंजीर सेवन करावे. अंजीरामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत राहण्य...

मणिपूर चक्र आणि रामरक्षा

  मणिपूर चक्र आणि रामरक्षा--- एक अभ्यास!  हे चक्र नाभिस्थानाजवळ असते. ह्याला दहा पाकळ्या असून सत्वगुणात्मक सृष्टीचे पालन करणारा विष्णु याची अधिष्ठात्री देवता आहे. २) शरीराचा मध्य बिंदू अर्थात गुरुत्वमध्य ह्याच चक्रात असतो.  ३) ह्या चक्रावर धारणा केल्याने चित्तात सत्वगुण वाढून ते स्थिर होऊ लागते. ४) धारणा म्हणजे काय? चित्ताची स्थिरता म्हणजे धारणा... धारणा, ध्यान आणि समाधी या तीन्ही भिन्न गोष्टी आहेत. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर धारणा म्हणजे concentration... किंवा एकाग्रता ५) चित्त शरीरांतील एखाद्या भागावर स्थिर ठेवण्याचा अभ्यास करणे म्हणजे धारणेचा अभ्यास करणे होय ६) महत्त्वाचं--- एकदा आपल्याला आपल्या चक्रांचं शरीरातील स्थान माहीत झाले की त्या स्थानावर धारणा केली (त्या स्थानावर आपलं चित्त एकाग्र केलं) की त्या चक्रावर ती धारणा केली असं म्हणतात. ७) ज्या नाडीचक्रावर आपण चित्त स्थिर केलं (धारणा केली) की त्या चक्रांतील नाड्यांचे आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे व्यापार सुसूत्रपणे चालू लागतात. उदाहरणार्थ , आपल्या शरीरातील खालील अवयव/ग्रंथी मणिपूर चक्राच्या नियंत्...

खडीसाखर खाण्याचे फायदे

Image
 सतत थकवा येतो?  मग खडीसाखर खाण्याचे हे फायदे नक्की घ्या जाणून...            खडीसाखर प्रत्येकाच्या घरी असतेच. खडीसाखरेचे खडे हे ओबढधोबड आकाराचे असतात. रिफाईंड साखरेपेक्षा कमी गोड असलेली खडी साखर तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. शिवाय आयुर्वेद शास्त्रातील अनेक औषधांमध्ये खडीसाखरेचा वापर केला जातो. रिफांईड साखर खाणं जरी आरोग्यासाठी हितकारक नसलं तरी खडीसाखर मात्र काही प्रमाणात खाण्यास काहीच हरकत नाही. शिवाय खडीसाखरेत रिफांईड साखरेपेक्षा कमी प्रमाणात कॅलरिज असतात.  * कोणताही गोड पदार्थ करायचा असला की साधारणपणे गुळ, साखर यांचा वापर सर्रास केला जातो. परंतु, कोणत्याही पदार्थाचं अतिरिक्त सेवन योग्य नाही असं देखील म्हटलं जातं. * हि गोष्ट गोड पदार्थांच्या बाबतीतही लागू होतं. कोणताही गोड पदार्थ जास्त खाल्ला की त्याचा त्रास हा जाणवूच लागतो. त्यामुळे गोड पदार्थ हे कायम नियंत्रणात खावे.  मात्र, काही गोड पदार्थने अनेक  शारीरिक तक्रारी दूर होतात. * खडीसाखर खाण्याचे फायदे :  ▪ जुनाट खोकला असेल तर खडीसाखर खाल्ल्यामुळे तो बरा होतो. ▪ हिमोग्ल...

जवस खाण्याचे महत्त्व

Image
 जवस घेण्याचे महत्त्व   यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी, कानडीत अल्सी आणि आलसी आणि संस्कृतमध्ये अलसी, अतसी, अतसिका, हैमवती, मदगंधा, मलीना, तैलोत्तमा, नीलपुष्पी, उमा किंवा क्षुमा म्हणतात. जवसाचे तेल वापरून तैलरंग, व्हॉर्निश, सौम्य साबण, छपाईची शाई वगैरे बनते. वंगणे, मलमे आणि चामड्याचे पॉलिशसाठीही अळशीच्या तेलाचा उपयोग होतो. तेल काढून उरलेली पेंड, गुरांच्या सकस खाद्यासाठी अणि खत म्हणून वापरतात. पशुवैद्य या तेलाचा उपयोग दुभती जनावरे आणि घोडे यांच्याकरिता रेचक म्हणून करतात. बियांच्या वापराने पित्तभावना, पाठदुखी आणि दाह-क्षोभ आदी कमी होते. व्रण आणि लघवीच्या त्रासावर गुणकारी. खोकल्यावर आणि मूत्रपिंडाच्या विकारांवर आराम पडण्यासाठी जवसाच्या बिया चांगल्या असतात. साल आणि पाने परम्यासाठी उपयोगी, तर जाळलेली साल भळभळ वाहणारे रक्त थांबवते आणि जखमा भरण्यास उपयोगी पडते. फुले मेंदू आणि हृदयासाठी पौष्टिक. युनानी वैद्य अंतर्गत जखमांसाठी बियांचे सेवन करण्यास सांगतात तर त्याच बियांचा गजकर्णादी वापर त्वचारोगांवर बाह्योपचाराने करतात. चुन्याच्या निवळीत मिसळलेले तेल हा कातडीच्...

सब्जाचे बी खाण्याचे फायदे !

Image
चिया सीड्स किंवा सब्जाचे बी खाण्याचे फायदे ! सब्जा म्हणजे चिया सीड्स हे भारतीय तुळशीचा एक प्रकाराचा असलेल्या वनस्पतीपासून मिळणारे बी आहे. सब्जाचे अनेक आयुर्वेदिक औषधी फायदे आहेत. प्राचीन काळापासून अंगातील उष्णता कमी करण्यासाठी सब्जाच्या बियांचा वापर केला जातो. सब्जाच्या बियांना फालुदा बीज,  तुक्मरिया बीज, गोड तुळशीचे बी (Chia Seeds In Marathi) असे देखील म्हटले जाते!  सब्जा हे मुळात भारतीय तुळशीच्या संवर्गातील वनस्पतीचा एक प्रकार आहे.   सब्जा (Chia Seeds In Marathi) चे आरोग्यासाठी होणारे फायदे  सब्जामध्ये अनेक पौष्टिक तत्वे आहेत. सब्जामध्ये उच्च प्रतीचे फायबर, ओमेगा थ्री फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात आहे. सब्जाच्या बियांमध्ये फायटोकेमिकल्स आहेत तसेच पॉलीफेनोलिक फ्लैवोनोईड्स जसे ओरिएंटिन, विसिनीन अशा प्रकारचे अँटीऑक्सीडेंट देखील आहेत. सब्जामध्ये नैसर्गिक तेल देखील आढळते. यामध्ये सायट्रल, लिमोनेन, युजीनॉल,सायट्रोनेलोल, टेरपीनॉल असे नैसर्गिक तेल देखील आढळते. सब्जा हे  विटामिन ए आणि विटामिन के चा उच्च स्त्रोत आहे. सब्जामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ल्युटिन, जीएक्सॅथिन, ब...