Posts

आयुर्वेद समज/गैरसमज

 आयुर्वेद समज/गैरसमज  1) रोज सकाळी उठल्यावर गार पाणी ,साधे पाणी  कोमट पाणी ,लिंबू पाणी,गरम पाणी मध लिंबू,पंचामृत असे पिल्यास शरीर शुद्ध होते आणि अनेक छोटे मोठे त्रास कमी होतात असे कुठे ही आयुर्वेदात म्हणलेले नाही.. 2)गरम पाणी आणि मध एकत्र करू नये. 3)आयुर्वेदात शाम्पू,conditionar,साबण,फेस पॅक बनवण्याची कृती लिहिलेली नाही. 4) कडधान्ये खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते हा अजून एक गैरसमज आहे. 5)एका आठवड्यात ३ पंचकर्म असे आयुर्वेद सांगत नाही 6)रोज ३,४ लिटर पाणी पिल्यास बाथरूम धुतल्याप्रमाने किडन्या पण धुतल्या जातात..हे आयुर्वेद सांगत नाही. 7)तहान लागेल तेवढेच पाणी प्यावे..जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यावे. 8)आयुर्वेदात बिस्किटांची कृती नाही. आयुर्वेदीक बिस्किटे असा प्रकार अस्तित्वात नाही.ते एक निव्वळ थोतांड आहे  9)स्पा आणि wellness center म्हणजे आयुर्वेद नव्हे. 10)मासिक पाळी च्या वेळी लोणच्याला हात लावू नये ..लोणचे खराब होते हा अजून एक गैर समज आहे. 11) कोणत्याही वस्तूच्या मागे किंवा पुढे आयुर्वेद शब्द जोडला की वस्तू विकण्यास सोपी होते.हा केवळ मार्केटिंग चा फंडा आहे...आयुर...

निरोगी आरोग्य- घरगुती उपचार

निरोगी आरोग्य- घरगुती उपचार  आज थोडा वेगळ्या विषयावर माजा स्वताचा आलेला अनुभव आपणां सर्वांन सोबत शेअर करत आहे, शक्य असल्यास करून बघा, गुण आल्यास मानव सेवेचे कार्य करा.  ( फक्त १ चिमूट ) आंघोळीच्या पाण्या सोबत काय टाकल्याने काय फरक पडतो हे करून पहा, हा प्रयोग २१ दिवस नियमित करावा.  🔘पाण्यात भीमसेन कापुर टाकल्यास अंग हळवे होते, थकवा जातो, पित्त कमी होते. 🔘हळद टाकल्यास त्वचेचे विकार थांबण्यास मदत होते, शिवाय मन व शरीर स्वस्थ राहते. 🔘भिमसेन कापुर व हळद टाकल्यास, केस गळणे कमी होते, जखम असल्यास लवकर बरी होण्यास मदत होते. 🔘खस पावडर व हळद टाकल्यास शरीरास थंडावा मिळतो. 🔘केसर व गुलाब पाणि टाकल्यास सर्दी कमी होण्यास मदत होते. 🔘लैंगीक समस्या स्री/पुरूष वेलची व लवंग पावडर करून टाकावी.  🔘मानसिक आजार असल्यास चिंचपावडर व गुलाब पाणि टाकावे, विचार कमी होतात.  🔘त्वचारोग असल्यास लिंबाचा पाला व खडेमिठ टाकावे.  🔘आर्थिक समस्या असल्यास भिमसेन कापुर, खस पावडर, व हळद टाकावी ( ४० दिवस ) पहिल्या दिवसापासुन फरक पडतो.  अजुन अनेक समस्यांवर आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर काही घर...

वातप्रकोपाची लक्षणे

 वातप्रकोपाची लक्षणे  * सांधा निखळणे किंवा गर्भाशयासारखा अवयव खाली घसरणे . * एखाद्या अवयवाचा आकार वाढणे उदा. पायाच्या शिरा फुलणे . * हात ,पाय ,सुन्न होणे . * कोणत्याही प्रकारची वेदना उदा. ठणकने, सुई टोचल्याप्रमाणे दुखणे, त्रिशूल भोसकल्याप्रमाणे दुखणे, पिरगाळले गेल्याप्रमाणे दुखणे वगैरे सर्व प्रकारच्या वेदना होणे. * खांदा ,पाठ , मान वगैरे अवयव जखडून जाणे. * कारण नसतानाअंगावर काटा येणे. * थरथर, कंप सुरू होणे. * त्वचा, डोळे, तोंड, योनी वगैरे अवयवांच्या ठिकाणी कोरडेपणा जाणवणे. * डोळा फडफडणे किंवा शरीरावर इतरत्रही आंतून स्पंदन जाणवणे.  * त्वचा काळसर , कोरडी व निस्तेज होणे. * हाडे ठिसूळ होणे. * शरीर शुष्क होणे, वजन कमी होणे. * आवाज कर्कश होणे. * मन अतिशय चंचल व अस्वस्थ होणे. * झोप न येणे. * थकवा जाणवणे व त्यामुळे काम करण्यास उत्साह न वाटणे. * मलप्रवृत्ती कडक होणे,पोटात वायू धरणे . * गरम तापमानाच्या गोष्टी खाण्याची इच्छा होणे .  अशी लक्षणे दिसत असल्यास वात वाढलेला आहे असे समजावे .   याऊलट वात प्रमाणापेक्षा कमी झाला तर,     * शारीरिक हालचाली मंदावतात...

आयुर्वेद हेंल्थ टीप्स

आयुर्वेद हेंल्थ टीप्स १) तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावे. २) जास्तीचे पाणी पिल्यास kidney वर लोड येतो. ३) उपवास करू नयेत. शाबुदाना,शेंगदाणे,वरी हे सगळे पित्त वाढवणारे पदार्थ आहेत. ४) जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात..दुपारी १२ पर्यंत आणि रात्री ८ पर्यंत जेवण करावे. ५)दोन्ही जेवणानंतर शत पावली घालावी म्हणजे अन्न पुढे सरकण्यास आणि पचनाला मदत होते. ६)लोणचे,पापड,अति तिखट,तेलकट, खारट अन्न पदार्थ खाऊ नयेत. ७)रात्री च्या वेळी दही खाऊ नये. ८)रोज ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा. ९) मधल्या भुकेच्या वेळेत त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारे फळ,राजगिरा लाडू,साळीच्या लाह्या,खजूर हे खावे...फरसाण,बिस्कीट,शेव हे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ आहेत. ८) आपण जिथे राहतो तिथे कोणत्या स्थानिक भाज्या पिकतात,फळे मिळतात ते खावे.. ९) रोज रिकाम्या पोटी ३ ते १२ सूर्य नमस्कार घालावेत. १०)जेवणात २ चमचे तुपाचा समावेश असावा. ११)दिवसा झोपू नये. १२)गरम पाणी आणि मध एकत्र करू नये..मधाचे अपचन होते..साधे पाणी आणि मध एकत्र करून पिण्यास हरकत नाही. १३) संडास,लघवी ,उलटी या वेगांचे धारण कधीही करू नये..लागल्यास लगेच जावे. १४)पाळीच्य...

हळद (हरिद्रा,रजनी,निशा,गौरी)

Image
  हळद (हरिद्रा,रजनी,निशा,गौरी):- हळद माहिती नाही अशी व्यक्ती भारतात सापडणे जवळजवळ मुष्किल आहे. भारतात तसेच महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी हळदीचे उत्पन्न घेतले जाते. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, परभणी, नांदेड इ. ठिकाणी हळदीची लागवड केली जाते. यातील सांगलीला मोठी बाजारपेठ आहे. हळद नाव असणारी अनेक वनस्पती आहेत, जशी दारूहळद, काळी हळद, आंबेहळद, कापूरहळद इ. परंतू त्या सर्व वेगवेगळ्या वनस्पती आहेत. हजारो वर्षापासून आपल्या पूर्वजांनी हळदीचे महत्व ओळखून तिला मांगल्य, सौभाग्य, देवदेवतांच्या आशिर्वादाचे प्रतिक मानले. जेजूरीच्या खंडोबा यांना आवडणार्या हळदीला देवघरापासून ते स्वयंपाकघरापर्यंत ते वैद्यांच्या बटव्यापर्यंत स्थान मिळाले आहे.  हळदीमध्ये कटु, उष्ण, रूक्ष, कफ, पित्त, व्रणरोपक, व्रणशोधक, कृमिघ्न, त्वचारोगनाशक, आंत्रकृमीनाशक, ग्राही, पाचक, वेदनाशामक, प्रमेहघ्न, पाण्डूरोगनाशक इ. गुणधर्म असतात. औषधी उपयोग. अचानक एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल आणि आपल्याला इस्टंट ग्लो हवा असेल तर हळद, दुधावरची ताजी साय आणि गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट बनवावी. ती पेस्ट लावून काही वेळाने थंड पाण्याने च...

आरोग्यासाठी लाभदायी "काळी हळद "

Image
 आरोग्यासाठी लाभदायी "काळी हळद "  आपल्या आरोग्यासाठी हळद किती फायदेशीर आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. आत्तापर्यंत तुम्हाला केवळ पिवळ्या हळदीबद्दल माहित असे, पण आपल्याला माहित आहे का की काळी हळद देखील उपलब्ध आहे आणि ती आपल्या भारतात देखील आढळते. काळ्या हळदीचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत,या वनस्पतीची लागवड बंगालमध्ये होते. याचे ताजे गठ्ठे फिक्कट पिवळे असतात. मुख्य गठ्ठ्याचे बाजूचे गठ्ठे आल्यासारखे दिसतात. बाजारांत मिळणारे गठ्ठे काळसर करडे असून त्यांवर गोल कडीं असतात. आंतून करडा काळा रंग, फारच कठीण व शिंगासारखे, याच्या पातळ चकत्या करड्या नारिंगी रंगाच्या किंवा निळ्या रंगाच्या असतात. वास व रुची कापरासारखी असते. बंगालमधे ताजे गठ्ठे हळदीसारखे वापरतात.ही हळद केवळ स्वयंपाकासाठीच नाही तर औषध म्हणून देखील वापरली जाते. त्यात अँटी-बायोटीक गुणधर्म देखील खूप जास्त आहेत. याव्यतिरिक्त, ही हळद त्वचेवर खाज सुटणे, मुरगळ आणि जखमांसारख्या आजारांना बरे करण्यासाठी वापरली जाते.    यकृत    ही हळद तुमच्या यकृताला डिटॉक्स करण्याचे काम करते. तसेच आपले यकृत संबंधित अनेक रोग प्रतिबंध...

संधिवात

 संधिवात  संधिवात नावावरून लक्षात येते की सांध्याच्या ठिकाणी वातदोष वाढल्याने संधिवात होतो. व्यवहारात संधिवात असा शब्द रूढ असला तरी आयुर्वेदात त्याला संधिगतवात असे नाव दिलेले आहे.  वातपूर्णदृतिस्पर्श: शोध: सन्धिहते ङनिले ।   *प्रसारणाकुच्ञनयोः प्रवृत्तिश्च सवेदना ।। .. चरक चिकित्सास्थान  जेव्हा वायू प्रकुपित होऊन सांध्यांचा आश्रय घेतो तेंव्हा सांधे सुजतात, सांध्यांचे आकुंचन प्रसरण वगैरे हालचाली वेदनामय होतात व सांध्यांचा स्पर्श हवेने भरलेल्या पिशवीप्रमाणे जाणवावयास सुरुवात होते. यालाच संधिगतवात म्हणतात. * स्नेहन : विशिष्ट औषधांनी सिद्ध तेल बाहेरून लावणे व खाण्यासाठी तूप वापरणे. * स्वेदन  : आयुर्वेदिक पद्धतीने बाष्पस्नान घेणे किंवा शेक करणे. * चवीला गोड, आंबट, खारट, स्निग्ध व उष्ण वीर्य असलेले पदार्थ खाणे. * वात वाढलेला ठराविक भाग हाताने दाबणे किंवा कपड्याने घट्ट बांधून ठेवणे.  * वातशामक द्रव्यांनी बनवलेल्या काढ्याने स्नान करणे. * चिंता व शोक वगैरेंचा त्याग करून सुखात व आरामात जगणे. * ताजे , गरम व पचायला हलका स्निग्ध असा आहार घेणे. *थंड व दमट वाताव...