Posts

Showing posts from September, 2021

खपली गहू / Emmet Wheat- आरोग्यास महत्त्व

खपली गहू / Emmet Wheat- आरोग्यास महत्त्व खपली गहू हे भारतीयांना मिळालेले एक वरदान आहे एक वैशिष्ट्यपूर्ण अशी गव्हाची जात.  सध्याच्या काळात बाजारात सहज उपलब्ध नसल्यामुळे ह्या उपयुक्त गव्हाचा वापर कमी झाला आणि विसर पडला आहे.  मानवी शरीरासाठी खुप उपयुक्त असा हा खपली गहू ...  ह्या गव्हाच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर खपली गव्हाची जात ही ५००० हजार वर्षांपूर्वी ची आहे असे आढळते. निसर्गत:च खपलीमध्ये कणखरपणा आहे. खपली गहू मधुमेह, हृदयविकार, आतड्यांचा कॅन्सर, बद्धकोष्ठता इत्यादी आजारांत आहारासाठी योग्य आहे. धारवाड कृषी विद्यापीठात केलेल्या एका अभ्यासानुसार खपलीचा आहारात वापर केल्यामुळे मधुमेही रुग्णांच्या Total lipid,Triglycerides and LDL Cholesterol मध्ये लक्षणीय घट झाली. म्हणजेच या आजारातील धोका बर्‍यापैकी कमी झाला. याशिवाय  परदेशात केलेल्या अशाच संशोधनात Type 2 मधुमेह व वयानुसार कमी होणार्‍या दृष्टिर्‍हासात खपलीचा आहारातील उपयोग चांगला दिसून आला. खेळाडूंच्या दैनंदिन आहारातील खपलीचा उपयोग क्षमता टिकवून धरण्यासाठी उपयोगी पडतो. काही भागाताल जुनी मंडळी अजुनही खपली गहू खातात. या ...

प्लेटलेट्स म्हणजे काय? प्लेटलेट्स कसे वाढवायचे ?

Image
  प्लेटलेट्स म्हणजे काय? प्लेटलेट्स कसे वाढवायचे ?  ‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’⚡ हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.  हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात. या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे. या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे. रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात.* लालपेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी) आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते. प्लेटलेट्स या मोठया हाडांतील रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात. त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात. ⚡ प्लेटलेट्सचं कार्य⚡ रक्तवाहिन्यांतून वाह...

पारिजातक (हरसिंगार) प्राजक्त झाडाचे महत्त्व

Image
  पारिजातक (हरसिंगार) प्राजक्त :-  हे झाड दहा ते पंधरा फूट उंच वाढते. हे झाड समुद्रमंथनातून निघाले असा पुराणात उल्लेख आहे. तसेच माता कुंतीने पांडवांच्या अज्ञातवासात असताना सत्यभामेच्या वाटिकेतून पारिजातक भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी आणला होता ते ठिकाण उत्तरप्रदेशातील बारांबाकी जिल्ह्यातील किन्नूर हे गांव आहे. तसेच इंद्रदेवाच्या शापामूळे याला फळ येत नाही असे पौराणिक उल्लेख आहेत. असो. याची फुले फार सुकुमार असते, सुवासिक असते. फुले रात्री फुलतात व सकाळी गळून पडतात. याचा दूरवर सुगंध पसरतो. पारिजातकाची पाने, फुले, साल, व बिया औषधांत वापरतात.  औषधी उपयोग:-  पोटात जंत झाल्यास याच्या पानांचा अंगरस खडीसाखरे बरोबर दिल्यास जंत मरतात. कफरोग आणि दमारोगात सुकलेली साल एक ते दोन गुंजा या प्रमाणात नागवेलीच्या पानातून दिवसातून तीन ते चार वेळेस द्यावी. केसांत कोंडा झाल्यास बियांची पेस्ट करून लावावी. याने लगेच फरक पडतो. लघवीला सारखी होत असल्यास पारिजातकाची साल, पाने व फुले यांचा काढा करून सात दिवस प्यावा. सात दिवसात फरक पडतो. गालगुंड झाल्यास पारिजातकाचा पाला, वेळूचा पाला एकत्र वाटून स...

Farmer Producer Organization (FPO- Farmer Producer Organization)

Image
  Friends, today let us try to find out what is a Farmer Producer Organization (FPO- Farmer Producer Organization). So, first of all, let's understand whether farmers need to create a producer organization or a company. Roughly speaking, the answer to this question is more yes than yes ...... The reason is that, according to the new Agricultural Reforms Act 2020, it is necessary if the farmer wants to survive in the market. Our farmers are small and unorganized, so they don't get much respect in the market anymore, and anyone tries to break it, be it shopkeepers, traders or anyone else. We all know the power of unity. If the thorns are tied together, it is difficult to break, and if the stick is different, it is easily broken. That story applies to farmers in our rural areas. Your farmer is small, he has few resources, he cannot fight the market alone, the farmer alone cannot break the market lobby, and so if your farmer wants to dominate the market, by forming a farmer organiz...

फक्त स्रीयांकरीता -घरगुती उपचार

 फक्त स्रीयांकरीता -घरगुती उपचार  ज्यांची जास्त चिडचिड होते, अतिशय राग येतो, चेहर्यावर बारीक फोड ( पिपल्स ), कोणत्याही कामात लक्ष लागत नाही, मानसिक तणाव वाढतो, कारण नसताना इतरांवर बोलणे, असे जर होत असेल तर साधारणता त्या माता-बहिणींना आरामाच्या दिवसाची अनियमितता हे मुख्य कारण असु शकते, काही वेळा घरात इतर लहान मोठ्या व्यक्तींसमोर सांगणे शक्य नसते पण असहनीय त्रास हा इतर काही कारणांने बाहेर येतो, ज्यांनी समज़ुन घ्यावा ते सुध्दा कधी कधी हे विसरतात, खाली काही माहिती सांगत आहे, ती माहिती ज्यांना चांगला गुण आला आहे त्यांचे कडुन घेऊन आपणांस देत आहे, जास्त माहिती उपचार हवे असल्यास मेसेंजर वर मेसेज करू शकता, वय १४ ते ४५ कधीही असे त्रास जाणवतात.  1. रोज सकाळी व रात्री अख्खी मेथीचे १५ दाणे अनोशा पोटी व झोपायच्या ३० मि. आधी गिळुण घेणे. ( ७ दिवसानंतर १८ दिवस नियमित ) ३ महिने. 2. रोज एक लहान चमचा गुलकंद दुधामध्ये टाकुन घ्यावे. केव्हाही एकावेळेस.  3. अशोकारिष्ट ( सांडू कं) 20ml रोज दोन वेळा पाण्यात टाकुन ते पाणि पीणे , सोबत Alert Capsule ( Vasu) रोज रात्री एक, चंद्रप्रभा वटी 2-2 सकाळ...

मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी १० घरगुती उपाय

 मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी  १० घरगुती उपाय               मासिक पाळी नियमित असणे आरोग्यासाठी योग्य असतं. अनेक स्त्रियांची पाळी येण्याची वेळ निश्चित नसते त्यामुळे अनेक समस्यांना सामोरा जावं लागतं. अनेकांना कधी कधी पाळी लवकर येते तर कधी उशिरा तर कधी-कधी दोन-तीन महिने उलटले तरी येतच नाही. पाळीवेळेवर येणे निरोगी असण्याचे लक्षणे असतात.         पाळीचे चक्र 21 किंवा 35 दिवसाचे असते. अश्यावर जर पाळी वेळेत यावी असं वाटत असेल तर येथे  आम्ही काही उपाय सांगत आहोत. १) आलं    आल्याचा चहा प्यायल्याने पाळी लवकर येते. पूर्वीच्या काळी बायका पाळी आणण्यासाठी आल्याचा वापर करत असे. हे उपयोगी असते. २) हळद     दुधात हळद टाकून घेतल्यास पाळी लवकर येण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी आणि अजून ही पारंपरिक उपचार साठी हळदीचा वापर केला जातो. हळदी चे गुणधर्म औषधी असतात. हळद उष्ण प्रकृतीची असते. ३) ओवा आणि गूळ     ओवा आणि गुळाचे सेवन केल्याने मासिक पाळी लवकर येते. रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ओवा आणि गूळ टाका आणि ते पाणी...

बद्धकोष्ठतेच्या समस्येची काही कारणे आणि उपाय

 बद्धकोष्ठतेच्या समस्येसाठी काही कारणे आणि उपाय  आपले पोट नेहमी साफ आणि चांगले असणे खूप महत्वाचे आहे. आपले पोट साफ नसेल तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यासाठी या गोष्टी करणे गरजेचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा बद्‍धकोष्ठताची समस्या निर्माण होते. किंवा तिला आमंत्रण मिळते. बद्‍धकोष्ठतेतून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय केले तर त्यातून तुमची सुटका होते. ही समस्या सहजपणे दूर केली जाऊ शकते. त्यासाठी खालील गोष्टी करणे गरजेचे आहे. बद्‍धकोष्ठता होण्याचे मुख्य कारण 1. पाणी  कमी प्यायल्यामुळे बद्‍धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. 2.  जास्त तेल आणि मसाल्यांचे पदार्थ सेवन केल्याने या समस्येला आमंत्रण मिळते. तसेच पोटाचे अन्य आजार उद्धभवतात. 3. सतत एकाच ठिकाणी बसून राहिल्याने बद्‍धकोष्ठता या सारखी समस्या निर्माण होते. कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना या समस्येचा जास्त सामना करावा लागतो.  4. वजन कमी करण्यासाठी कमी खाणे हे देखील बद्‍धकोष्ठतेचे कारण आहे. त्यामुळे संतुलित प्रमाणात आहार घेणे आवश्यक आहे. 5. पोट दुखी होत असेल तर पेन किलर टॅबलेट घेणे टाळा. पेन किलरचा जास्त ...

स्रीयांच्या आजारावर काही गुणकारी आणि वीनाखर्चाचे असे घरगुती उपचार

  स्रीयांच्या आजारावर काही गुणकारी आणि वीनाखर्चाचे असे घरगुती उपचार  आज वेगवेगळ्या फक्त स्रीयांच्या आजारावर काही गुणकारी आणि वीनाखर्चाचे असे उपाय आपणांसोबत शेअर करत आहे.  ➡️ श्वेतप्रदर  # लाजाळू चे बी चे चुर्ण करून सकाळ - संध्याकाळ दुधामध्ये टाकुन घ्यावे. ( अर्ध्या चमची पेक्षा कमी )  # जीरे भाजुन साखरेसोबत घ्यावे दोन वेळेस.  ➡️ मासिक त्रास  = कांद्याचे सुप करून त्यामध्ये थोडा गुळ टाकुन प्यावे रोज एक वेळेस.  = तुळशीच्या मुळ्या सावलीत वाळवुन त्याची पावडर पाण्यात टाकुन रोज एकदा घ्यावी. ( ह्यासाठी हिरवी तुळस तोडु नये, सुकलेली तुळस असावी )  = पिकलेले केळे रोज १ गाईच्या तुपासोबत घ्यावे. ( दुपारी १२ च्या आत )  ➡️ गर्भनिरोधक  = मासिक जाल्यानंतर तुळशीच्या पानांचा काढा करून ३ दिवस नियमित घेतल्यास गर्भधारणा होत नाही.  = १ लिंबोळी चावुन गाईच्या दुधासोबत गिळुन एकदाच घेतल्यास १ ते १/५ वर्ष गर्भधारणा होत नाही.  ➡️ योनी चा त्रास  = आवळ्याचा रस व मध एकत्र करून घ्या. जळजळ, आग होणे, खाज येणे हे त्रास कमी होण्यास मदत होते. = लिंबोळी + एर...

गुलाबी बोंडअडी - फेरोमोन ट्रॅप

Image
गुलाबी बोंडअडी ही कापूस पिकाची प्रमुख कीड आहे. गुलाबी बोंडअडी ही कीट विविध हवामान, विविध परिस्थितीशी अत्यंत जुळवून घेतो आणि गुलाबी बोंडअडीच्या अळ्या कापूस बोंडात/ बियाण्यात लपुन बसतात व त्यात ते संरक्षित असतात आणि कित्येक महिने जिवंत राहतात.  एका हंगामापासून दुसऱ्या हंगामात ह्या कीडीचा संचार बोंडे, माती आणि वनस्पतींच्या अवशेषातून होत असतो.    ही एकमेव कीड आहे, जी कापूस वेचणीच्या वेळेस खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. पिकाच्या वाढीच्या अवस्थेत अळ्या ह्या पात्यांमध्ये छिद्र करतात आणि आतील भाग खातात, ज्यामुळे आतून बोंडे सुकून जातात आणि कोरडे होतात. नंतर ह्या अळ्या कळ्या आणि बोंडावर हल्ला करतात.  अळ्यांनी खराब केल्यामुळे संक्रमित फुलांच्या कळ्या पूर्णपणे उघडण्यास अपयशी ठरतात, ज्यामुळे डोंबकळ्याचे (रोझेट ब्लूमचे) स्वरूप येते, आणि उत्पादनात घट होते.  अडी ही बोंडामध्ये छिद्रे करून नुकसान करतात आणि बिज आणि धागा नष्ट करतात. संक्रमित बोंडे बुरशीजन्य रोगाच्या संसर्गास आमंत्रण देऊन रोगग्रस्त होतात.   ह्या गुलाबीबोंड अडीच्या बंदोबस्तासाठी फेरोमोन ट्रॅप अतिशय महत...

आरोग्यदायी तुळस - तुळस एक खूप गुणकारी आणि औषधी वनस्पती आहे.

Image
 आरोग्यदायी तुळस - तुळस एक खूप गुणकारी आणि औषधी वनस्पती आहे.  तुळशीच्या झाडाला धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्व देखील प्राप्त झाले आहे तसेच तुळस एक सुगंधित वनस्पती देखील आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात तुळशीचे झाड असते. तुळशीची पूजा देखील केली जाते. परंतु ज्याप्रमाणे तुळस धार्मिक, आरोग्य आणि औषधीसाठी उपयुक्त त्याचप्रमाणे तुळशी आपल्या सौदर्यासाठी देखील फायदेशीर आहे.  ▪️त्वचेसाठी आणि केसांसाठी तुळशीची पाने वापरू शकता.  ▪️अशा गुणकारी तुळशीचे फायदे आपण जाणून घेऊ. ✅त्वचा नितळ आणि चमकदार होते जर तुमच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये तुळशीचे रोप असेल तर तुम्ही तुमची त्वचा नेहमी स्वच्छ ठेऊ शकता, कारण तुळशीच्या पानांमध्ये तुमच्या त्वचेला मुळापासून स्वच्छ करण्याचे गुणधर्म असतात. जर तुमची त्वचा धुळ, माती आणि प्रदूषणामुळे निस्तेज दिसत असेल तर तुळशीच्या पानांनी निस्तेजपणा दूर होईल. विशेष  म्हणजे तुळस एक आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम देखील होत नाहीत. उलट यामुळे त्वचा निर्जंतुक होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला तुळशीची पाने घावे लागतील आणि त्यांना वाटून त्यांची पेस्...

वरण भाताचे आयुर्वेदिक महत्त्व

वरण भाताचे आयुर्वेदिक महत्त्व प्रिय मैत्रजनहो,  वरणभात ही पाककृती आपण वर्षानुवर्षे करत/ खात आलो आहोत.मग आज विशेष काय ? मलाही आधी हाच प्रश्न पडला होता.. आहार हा अत्यावश्यक.मात्र तोंडाची चव गेली असेल.प्रचंड अशक्तपणा आला असेल.  अनुभव share करतोय, मी रुग्णाला प्रेशर कुकरमधलं अन्न त्यांना देऊ नका असं सांगितलं .जो काही वरणभात खायचा आहे तो थेट अग्निप्रक्रिया केलेला द्या.हवेशी अन्नाचा संपर्क येऊद्या असं सांगितलं. वास्तविक समजायला लागल्यापासून प्रेशरकुकर हा घरातला अटळ घटक आहे..त्याचे फक्त फायदेच आहेत अशीच सर्वांची अजूनही रास्त समजूत . रूग्णांसाठीचा भात करण्यासाठी तांदूळाच्या चौपट पाणी घालून थेट गॕसवर उकळत ठेवा.तोपर्यंत गावठी तांदूळ किंवा चांगल्या प्रतिचे कोणतेहि तांदूळ धुवून निथळत ठेवा. पाण्याला आधण आल्यावर त्यात तांदूळ टाका.तांदूळ बोटचेपे शिजल्यावर वरची जास्तीची निवळ बाजूला काढा.गॕस बारीक करून लोखंडी तवा ठेवून तो शिजत आलेला भात वाफ यायला ठेवा.दणदणीत वाफ आल्यावर भात मऊ लुसलुशीत आणि तरीही मोकळा होईल. भाताची निवळ हिंग मीठ तूप घालून रूग्नाला पिण्यासाठी द्या. वरणासाठीची अर्धी तूर डाळ आणि अ...

पक्षी थांबे - नैसर्गिक कीड नियंत्रणाची पारंपारिक व मोफतची पद्धती

Image
  कोणत्याही पिकात नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण करून आपण रासायनिक फवारणी वरील खर्च कमी करू शकतो त्याचबरोबरच अतिशय महत्वाचे आहे ते पर्यावरणाचा आणि मानवी आरोग्याचा तसेच जनावरांच्या आरोग्यावर होणारे परिणाम आपण टाळू शकतो व आपली जमीनिची सुपीकता जास्त काळ टिकवून ठेवू शकतो.  नैसर्गिक कीड नियंत्रनाचा असाच एक प्रयोग म्हणजे- पक्षी थांबे पक्षी थांबे म्हणजेच, आपल्या शेतामध्ये पक्ष्यांना विश्राम करण्याकरिता बसण्याची व्यवस्था करणे, जेणेकरून पक्षी आपल्या शेतात येऊन बसणार आणि शेतात पिकावर असलेली कीड, त्याची पतंगे यांना खाणार, कारण ती त्यांची भक्ष आहेत. असे केल्यास बऱ्यापैकी आपल्याला किडीवर नियंत्रण करता येऊ शकतो आणि किडींची पुढची पिढी खूप मोठ्या प्रमाणात कंट्रोल होत असते.  अश्याप्रकारचे पक्षी थांबे उभारण्यास काहीही खर्च येत नाही. साधारणता पिकापेक्षा थोड्या उंच काठ्या घेऊन त्याला टी- आकारात बांधू शकतो. पिकापेक्षा उंची जास्त असल्यामुळे पक्ष्यांना दूरवरचे किडे पण दिसणार आणि ते त्याला अलगत खाऊ शकणार.  ज्या ठिकाणी काठ्या कमी प्रमाणात उपलब्ध आहेत त्या ठिकाणी एकेरी काठीवर सुद्धा टी- आकारा...

टाचा दुखीवर घरगुती उपाय

 टाचा दुखीवर घरगुती उपाय करून बघा नक्की दुखणे थांबेल .......             आजकालची जीवनशैली अतिशय धावपळीची आणि गुंतागुंतीची आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. धावपळीमुळे पाय दुखणे, तळवे, टाचा दुखणे किंवा त्यांना सुज येणे अशा समस्या उद्भवतात. तर कधी खूप वेळ उभे राहील्याने, वजन अधिक असल्यास किंवा चूकीचे चप्पल, बूट घातल्यास टाचा दुखी लागतात. मात्र हे दुखणे अतिशय असह्य होते. या घरगुती उपयांनी टाचांच्या दुखण्यावर आराम मिळेल.  बर्फाचा शेक      टाचा दुखत असल्यास बर्फाने शेकवा. बर्फाच्या थंडाव्यामुळे पेशीत निर्माण झालेला ताण, त्रास कमी होण्यास मदत होते. परिणाम दुखणाऱ्या टाचांपासून आराम मिळतो. त्यासाठी १५ मिनिटे बर्फाने शेकवा. तेलाची मालिश         टाचांचे दुखणे कमी करण्यासाठी तेलाची मालिश हा उत्तम उपाय आहे. यामुळे दुखण्यावर लगेचच आराम मिळतो. मसाज केल्याने मसल्स रिलॉक्स होतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. यासाठी खोबरेल तेल, मोहरीचे तेल इत्यादीने टाचांना मसाज करा. दिवसातून ३ वेळा १०-१० मिनिटे मसाज केल्याने दुखण्याव...

आघाड्याचे उपयोग

 आघाड्याचे उपयोग (देवपूजेतील एक वनस्पती)   माझे  कडील पेशंटना आघाड्याच्या पाण्याने आलेले अनुभव -- ● आघाड्याच्या पाण्याने मुतखडा पडून जायला फायदा होतो. माझ्याकडील  एका कामगाराला मुतखड्याचा त्रास होता. त्याला मी रोज आघाड्याचे पाणी दिले. एक महिन्यात फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. खडा पडून गेला होता. ● आघाड्याच्या पाण्याने किडनी फेल, किडनी आकसणे( श्रिंक होणे) यावर उपयोग होतो असा माझा अनुभव आहे. मी बऱ्याच पेशंटना हे पाणी दिले आहे त्यांचे क्रिएटिनिन कमी व्हायला फायदा झाला. ●काहींच्या अंगावरील सूज कमी व्हायला फायदा झाला ● अंगावर रँश उठला, लाल फोड आले ,  आघाड्याचे पाणी घेण्यास सांगितले एका दिवसातच तिचा त्रास गेला. आघाडा ह्या वनस्पतीची किडनी संबंधातील उपयोगता आमच्या पूर्वजांना माहिती आसावी. म्हणून समाजहितासाठी तिचा श्रावणातील पूजेत उपयोग करण्याची पद्धत पाडली असावी. श्रावण महिन्यात पूजेसाठी फुले विकणां-याकडे आघाडा विकायला येतो. तरी किडनीच्या सेफ्टी साठी वर्षातून एकदा तरी हे पाणी प्यावे.  आघाड्याचे पाणी करणे  आघाड्याची पाच ते आठ पाने (काडी सकट) घेऊन अगदी बारीक ...

कोड -घरगुती उपचार

कोड -घरगुती उपचार  ज्यांना कोड आहे किंवा अंगावर पांढरे चट्ठे आहेत त्यांनी हे पदार्थ शक्य असल्यास बंद करावे, आणि शक्यतो त्यांना खुप जास्त प्रमाणात असे पदार्थ आवडतात तेव्हा जर काही महिने (२४) प्रामाणिकपणे नियम पाळले तर फरक अनुभवु शकता.  कांदा/बटाटा एकत्र भाजी.  जेवणात दुध व कांदा सोबत असणे.  चहा सोबत बेकरी चे पदार्थ. अतितीखट सोबत अतिगोड.  दुधी व कारले सोबत. उन्हामध्ये जाऊन पाणी पिणे. दुग्धजन्य पदार्थासोबत कोथींबीर किंवा मेथी खाणे. शेंगदाणे सोबत पापड खाणे.  दुधाचे कोणतेही पदार्थ खाल्यावर मुळा खाणे. नोनव्हेज जास्त खाणे. वांगे व गाजर सोबत खाणे. हे काही ठराविक विरूध्द पदार्थ आहेत, शक्यतो ज्यांना कोड आहे किंवा सुरू होतोय त्यांना ह्याची आवड जास्त असते, त्यांना इतरांपेक्षा राग लवकर व जास्त येतो, जर असे विरूध्द पदार्थ बंद केले तर त्यावर त्वरीत कंट्रोल येऊ शकतो, ज्यांना त्रास आहे त्यांनी पोट साफ होण्यावर जास्त लक्ष दिले पाहिजे, हा एक रक्त अशुध्दीचा प्रकार आहे वेळीच काळजी घेतली गेली तर १००% फरक पडतो.  ज्यांना कोड आहे त्यांनी वैयक्तिक मेसेज करावा एक सोपा घरगुती उपा...

भूक लागत नाही....या समस्याचे उपाय

 भूक लागत नाही....या समस्याचे  उपाय                 भूक न लागणे, हा सुद्धा एक आजाराच आहे. परंतु, यामध्ये काळजी करण्यासारखे काहीच नाही. यावर तुम्ही घरगुती उपाय करून सहज मात करू शकता. शिवाय, या उपायांमुळे तुम्हाला चांगली भूक लागू शकते.        करा हे उपाय १.     हिंगाष्टक चूर्ण गरम पाण्याबरोबर, ताकामध्ये घालून किंवा भाताच्या पहिल्या घासाबरोबर तूपासोबत खाल्ल्यास चांगली भूक लागते. शिवाय अन्न पचनही होते. २.     सुंठ, मिरी, दालचिनी, पिंपळीसारखे भूक वाढवणाऱ्या पदार्थांचे चूर्ण करुन मधाबरोबर चाटल्यास भरपूर भूक लागते. ३.      जेवणात चटणी आवश्य खा. लसूण, पूदिना, भोपळ्याची चटणी, कढीपत्त्याची चटणी, आले तीळाची चटणी खावू शकता. यामुळे पचन चांगले होते. पोटातले जंत मरतात. ४.      जेवणात साजूक तूप आणि जेवणानंतर ताक घ्या. यामुळे भूक नक्की वाढते. ५.       गरम पोळीला तूप लावून त्यावर लसूण किंवा पुदिन्याची चटणी खा. ६.       बैठे काम करत ...

पांगारा ( पारिभद्र,मन्दार, रक्तकुसूम):-

Image
पांगारा ( पारिभद्र,मन्दार, रक्तकुसूम):- हा काटेरी वृक्ष आहे. यामध्ये सफेद आणि तांबडा असे दोन प्रकार आहेत. त्यातील सफेद दुर्मिळ आहे. तांबडा बहूतेक ठिकाणी जसे रस्त्याच्या कडेला, डोंगरात, समुद्रालगतच्या जंगलात आढळतो. शोभेसाठीही याची लागवड करतात. तांबड्या पांगार्यास मोठी, लाल रंगाची व गंधरहित फूले येतात. फुलांमध्ये मध भरपूर असल्याने अनेक पक्षी, भुंगे नेहमी याच्याजवळ असतात. शेंगा काळ्या रंगाच्या, दोन ते तीन इंच लांब व वाकड्या असतात. फांद्यांवर शंकुच्या आकाराची बारीक काटे असतात. यास काटे असल्याने कंपाऊंड साठीही लागवड करतात. याची साल  गुळगुळीत, करड्या किंवा पिवळट असते. याचा लाकूड हलके असते. याची फांदी लवकर रुजते व वाढही लवकर होते. त्यामूळे लागवड करणे सोपे जाते. यामध्ये कटु, उष्ण, वात, कफ नाशक, शोधनाशक, मेदनाशक, कृमीनाशक, ज्वरघ्न, पित्तघ्न, इ. तसेच कर्णरोगावर उपयोगी असे गुणधर्म असतात. औषधी उपयोग:- काविळीवर पांगार्याच्या सालीचे चूर्ण  तांदूळाच्या धुवणातून द्यावे. पोटातील कृमीवर पानांचा स्वरस दहा मिली. प्रमाणे द्यावा. झोप येत नसल्यास याच्या सालीचे चूर्ण अल्प प्रमाणात पाण्यातून द्यावे. स...

पांढरे केस काळे आणि मजबूत करण्याचे ७ नैसर्गिक उपाय !

पांढरे केस काळे आणि मजबूत करण्याचे ७ नैसर्गिक उपाय  !                           दाट, मुलायम केस असावेत, असे प्रत्येकाला वाटते. मात्र वेळेपूर्वी केस पांढरे झाले तर चिंता वाढते. आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर आपण निरनिराळे उपाय करु लागतो. खरंतर मेलेनिन पिग्मेंटेशनच्या कमतरतेमुळे केसांचा रंग पांढरा होऊ लागतो. त्याचबरोबर धूळ, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे केसांचे पोषकतत्त्व कमी होऊ लागते. याव्यतिरिक्तही तणाव किंवा अनुवंशिक आजारांमुळे केस पांढरे होऊ लागतात. यावर काही नैसर्गिक उपायही आहेत. त्यामुळे केस पुन्हा काळे होण्यास मदत होईल. पेरुची पाने पेरुची पाने वाटून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट केसांना लावल्याने केस काळे होण्यास मदत होते. पेरुच्या पानात व्हिटॉमिन बी, सी असते. त्यामुळे केसगळती रोखण्यास आणि केस पुन्हा उगवण्यास मदत होते. कडीपत्ता कडीपत्ता फक्त पदार्थाचा स्वाद वाढवत नाही तर त्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म ही आहेत. कडीपत्ता खोबरेल तेलात घालून रोज त्या तेलाने केसांना मसाज करा. रात्रभर ठेवा आणि द...

मुळव्याध - घरगुती उपचार

मुळव्याध - घरगुती उपचार  ह्यावर बरीच औषध उपचार आहेत पण आज यांवर पुर्णपणे घरगुती उपाचार बद्दल माहिती घेऊया.  ➡️ लिंबु कापुण त्यावर सैंधव मीठ लावुन ते चाटावे, रक्त पडणे थांबते. ➡️ भाजलेले गरम हरभरे खावे ह्याने उत्तम लाभ होतो. ➡️ मुगाच्या पिठात लिंबाच्या पालाच्या पकोड्या २१ दिवस रोज खाव्यात.  ➡️ २ चमचे कारल्याच्या रसात थोडी साखर टाकुन घेतल्यास लगेच गुण येतो. ➡️ जिरे व मिर्याचे चुर्ण करून मधासोबत घेतल्यास वेदना कमी होतात. ➡️ लिंबोळीच्या बी कुटुन त्याचा लगदा करून त्यात थोडी हिंग टाकुन रोज घेतल्यास गुण येतो.  ➡️ काळेतीळ व मलई एकत्र करून रोज घेतल्यास चांगला गुण येतो.  ➡️ सकाळ चे स्वमुत्र वाटीत घेऊन मुळव्याधाच्या जागी कापसाने लावल्यास त्वरीत आराम होतो. ( स्वमुत्र लावताच थोडी आग होते )  ➡️ दुधासोबत लिंबाचा रस एकत्र करून घेतल्यास वेदना व रक्त थांबते. ( दुध फुटू नये यासाठी दुध वाटीत टाकत असताना लिंबाचा रस सोबत टाकावा )  ➡️ रोज सकाळी अनोश्या पोटी साजुक तुप १ चमचा घ्यावे. त्यावर १ तास काही घेऊ नये.  वरील उपचार हे गुण आलेले व दुष्परिणाम मुक्त आहेत, प्रत्येकाच्य...

व्हिटॅमिन सी’चा स्त्रोत ‘लिंबू’, रोगप्रतिकारक शक्तीसह अनेक समस्यांवर गुणकारी!

 व्हिटॅमिन सी’चा स्त्रोत ‘लिंबू’, रोगप्रतिकारक शक्तीसह अनेक समस्यांवर गुणकारी!                                                                               लिंबू आणि लिंबाच्या साली वापर करण्यासाठी काही टिप्स  1- लिंबु कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. 2-अजीर्ण झाल्यास लिंबू कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव मीठ घालून गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. 3- पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत प्यावे. त्याने भूक वाढते आणि अन्न नीट पचते. 4 -आरोग्य व सौंदर्य रक्षणासाठी लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून त्याने चेहरा धुवावा. कांती तेजस्वी होते आणि सुरकुत्या नाहीशा होतात. त्वचेचा रुक्षपणा निघून जातो. (Vitamin C source Lemon benefits and uses tips) 5- रस काढल्यानंतर लिंबाच...

दमा असणाऱ्यांसाठी महत्वाचे...

 दमा असणाऱ्यांसाठी महत्वाचे...  १. दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी थंड पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावेत. २. दही, दूध, ताक, मिठाई हे पदार्थ सहसा दम्याच्या त्रासाला आमंत्रण देतात, त्यामुळे या पदार्थांचे सेवन टाळा. ३. थंडीत छातीत कफ साचल्याने दम्याचा त्रास वाढतो. अशावेळी रूग्णांनी कोमट पाणी प्यावे. ४. सुंठ व मध किंवा आल्याचा रस व मध एकत्र करून प्यायल्याने थंडीत दम्याच्या रूग्णांना आराम मिळतो. ५. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी आंघोळ करण्यापूर्वी छातीला तीळाचे तेल लावून शेक घ्या. यामुळे छातीतील कफ नाहीसा होतो. ६. दोन ते तीन कप पाणी घेऊन त्यात तुळस व अडुळशाची दोन पाने घाला. त्याला उकळी देऊन त्याचा काढा बनवा. हा काढा रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी घेतल्यास दमा कमी होतो. ७. प्राणायाम किंवा कपालभाती यासारखे श्वसनसंस्थेशी संबंधित व्यायम करा. ८. कोबी गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घ्या. ९. आहारात लसूण, पडवळ, दुधी भोपळा, चवळी इ. भाज्यांचा समावेश करावा. १०. सकाळी व संध्याकाळी दमा रुग्णाने मोकळ्या हवेत फिरावे. संधर्भ-  वैद्य श्री. माळाकोळीकर,  नाडी परीक्षण तज्ञ श्रीराम आयुर्वेदिक...

डोळ्यांचा कोरडेपणा दूर करणे- घरगुती उपाय

 डोळ्यांचा कोरडेपणा दूर करणे : अनेक लोकांचे डोळे कोरडी होतात ज्यामुळे डोळ्यात जळजळ होते. पण देसी तूप कोमट करून नाभी वर लावल्याने डोळे कोरडे पडण्याची समस्या दूर होते आणि डोळ्यांची नजर चांगली होते. या सोबतच रोज सकाळी उठल्यावर आपली लाळ डोळ्यात काजळ लावतात तशी लावणे, फक्त रात्रीं झोपतांना ब्रश करावा. यामुळे आपली नजर सुध्दा चांगली होते.  गुलाबजल वापरले तरी चालते कोणत्याही कंपनीचे . कोरडेपणा येण्याची अनेक कारण आहेत,  इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा  अतिवापर, वात प्रकृती, स्ट्रेस.. आनंदी रहा, निरोगी रहा!! संधर्भ-  वैद्य श्री. माळाकोळीकर,  नाडी परीक्षण तज्ञ श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ.   मोबाईल क्रमांक- 7350911888 अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

डोळेदुखीवर काही घरगुती उपाय

Image
  डोळेदुखीवर  काही घरगुती उपाय              डोळेदुखी बऱ्याचदा केवळ डोळे लाल राहण्यावरही थांबते. अगदी डोळा ठुसठुसत नाही. कोणत्याही प्रकारची डोळेदुखी असू शकते. मग अशावेळी तुम्ही घरच्या घरीही डोळ्यांच्या या दुखण्यावर इलाज करू शकता. मध (Honey) मध हे जीवाणूविरोधी आणि नैसर्गिक घटक असणारे औषध आहे. मधामध्ये आढळणारे घटक हे डोळ्यांमध्ये  लालसरपणा कमी करून डोळ्यांना अधिक थंडपणा देतात. तसंच मध हे सर्वांच्या घरातील एक अविभाज्य भाग असतो. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये मध उपलब्ध असते. अतिशय सोपा आणि खिशाला परवडण्याजोगा हा उपाय आहे. डोळे दुखणे घरगुती उपायांमधील हा सोपा उपाय आहे. डोळ्याच्या प्रभावित क्षेत्रामध्ये मधाचा एक थेंब टाकावा सुरूवातील जळजळ झाल्यासारखे वाटेल पण नंतर तुम्हाला त्याचा योग्य परिणाम दिसून येईल  डोळ्याला त्वरीत आराम हवा असेल तर तुम्ही मधाचा वापर करून घेऊ शकता . गुलाबपाणी (Rose Water)       डोळ्यांची जळजळ, डोळे दुखणे आणि डोळ्यांमध्ये खाज येत असेल तर गुलाबपाणी हा त्यावरील उत्तम उपाय आहे. यामध्ये विटामिन ए आणि सी चे प्रमाण...

घसादुखी , टॉन्सिलदुखीवर घरगुती आयुर्वेदिक उपाय

  घसादुखी , टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपाय  जंतुदोषापैकी घसासूज व टॉन्सिलसूज या आजारांची कारणे व उपचार बरेचसे सारखे असल्याने हे एकत्र घेतले आहेत. हे आजार (विशेषतः टॉन्सिलसूज) बहुधा लहान मुलांत जास्त प्रमाणात येतात. परंतु नुसती घसासूज कोणत्याही वयात आढळते. या आजारात घसा, टॉन्सिल लालसर होतात, सुजतात. त्याबरोबर ताप, अंगदुखी, इत्यादी लक्षणे दिसतात. याबरोबर घसा दुखणे, गिळायला त्रास होणे. मधून मधून कोरडा खोकला येतो. घशात/ टॉन्सिलमध्ये टोचल्यासारखे वाटणे या तक्रारी प्रमुख असतात.     कारणे विषाणू किंवा जिवाणूमुळे घसादुखी, टॉन्सिलसूज होतात. ब-याच वेळा सर्दी-पडशानंतर हे दुखणे येते. हा आजार सांसर्गिक आहे. याशिवाय रासायनिक प्रदूषण, वावडे (उदा. विशिष्ट खाद्यतेलामुळे), घशास ताण (खूप बोलणे), इत्यादी कारणांमुळे घसा सुजतो.     रोगनिदान घसा सुजला तर घशाची पाठभिंत लालसर दिसते. टॉन्सिलच्या गाठी सुजल्या असतील तर त्या नेहमीपेक्षा मोठया दिसतात. गाठींचा पृष्ठभाग लालसर दिसतो. कधीकधी टॉन्सिलवर पांढरट (पू) ठिपके दिसतात. घसासूज असो की टॉन्सिलसूज, गळयातल्या रसग्रंथी सुजणे, दुखणे...

मुतखडा/किडनी स्टोन यांवर अत्यंत प्रभावी घरगुती उपाय

  मुतखडा/किडनी स्टोन- घरगुती उपचार  मुतखडा/किडनी स्टोन यांवर अत्यंत प्रभावी व त्वरीत आराम मिळेल असा सोपा उपाय. कणीस/मका घ्या स्वीट कोण किंवा साधे मका चालेल, मक्यावरील जे केस असतात त्याला मक्याचे केस किंवा मक्याच्या मिशा देखील म्हणतात, ३ किंवा ४ मक्याचे वरचे सर्व केस घेऊन २ लीटर पाण्यात टाका व ते पाणि १ लीटर होई पर्यंत उकळू द्या, नंतर ते दिवस भरात थोडे थोडे करून प्या, असे ४ किंवा ५ दिवस रोज करा, मुतखडा वितळुन जाईल किंवा बाहेर पडेल, दुखण्याचा त्रास २ दिवसात थांबतो. नुकसान काहीच नाही.  निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼 संधर्भ-  वैद्य श्री. माळाकोळीकर,  नाडी परीक्षण तज्ञ श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ.   मोबाईल क्रमांक- 7350911888 अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

क्रोध/राग कमी करण्याकरिता घरगुती उपाय

 क्रोध/राग - घरगुती उपाय काही लोकांना ( स्री/पुरूष/लहान मुलं ) त्वरीत राग येतो, अगदी अनावर होतो, रागाच्या भरात नको ते बोलले जाते, कधी - कधी नातेसुध्दा तुटण्याची वेळ येते, अशावेळी कोण चुक किंवा कोण बरोबर हे महत्वाचे नसते पण नेमक त्याच कारणाने मग व्यक्ती अनावर होतो, सगळ शांत जाल्यावर बर्याच वेळांनी कळते कि जे घडले ते चुकिचे घडले पण तो पर्यंत बराच काळ निघुन जातो. अश्या वेळी काही शारिरीक घडामोडी ( हार्मोन्स ) देखील कारणीभूत असतात, हे सत्य आहे त्यावर काही उपचार देखील आहेत जे पुर्वी पासून वापरात होते, राग अनावर होण्याआधी मनुष्यास त्यांचे बदल कळतात पण त्याकडे लक्ष देत नाही. म्हणतात ना कळते पण वळत नाही. खाली उपाय आहेत मोफत आहेत करून पहा.  ♻️ कपभर पाण्यात २ इलायची उकळुन घ्या व ७ दिवस नियमित घेतल्यास राग लवकर येत नाही. ♻️ कांदा, लसुण, बीट, मुळा हे तामसी पदार्थ आहेत याचे सेवन कमी केल्यास राग लवकर येत नाही. ♻️ ज्यांना दारू, सिगारेट, तंबाखु याचे व्यसन आहेत त्यांना राग लवकर येतो व ते याचे सेवन जास्त करतात अश्यावेळी जेवण जाल्यावर साधे पान खालल्यास चांगले परिणाम मिळतात.  ♻️ दिवस भरा...

तोंडात व्रण, छाले, वेदना असणे - घरगुती उपाय

 तोंडात व्रण, छाले, वेदना असणे  १) धने पाण्यात उकळवून, थंड करून त्याने गुळण्या करा. २) वेलचीचे चूर्ण मधात मिसळून आतून लावा व लाळ गळू द्या. ३) जाईच्या झाडाची पाने चावल्याने छाले बरे होतात. ४) पेरूच्या झाडाची पाने उकळवून त्या पाण्याने गुळण्या कराव्या. ५) हळद पाण्यात घोळून, मग गाळून या पाण्याने गुळण्या करा. ६) खोबरे चावून खावे व लाळ तोंडात फिरवावी. ७) ज्येष्ठमध खावे व याच्या पाण्याने गुळण्याही करा. ८) मध पाण्यात मिसळून गुळण्या करा. ९) तुळशीची दोन-तीन पाने चावून खा. १०) विड्याच्या पानाचा रस काढून, त्यात तूप टाकून तो लेप व्रणांना, छाल्यांना लावा. ११)  ग्लिसरिन लावा. १२) खाण्याच्या पानाचे चूर्ण करून त्यात थोडा मध टाकून हे चाटण तोंडात आतून लावा. वेदना थांबतील संधर्भ-  वैद्य श्री. माळाकोळीकर,  नाडी परीक्षण तज्ञ श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ.   मोबाईल क्रमांक- 7350911888 अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

वांग- घरगुती आयुर्वेदिक उपचार

Image
  🌹 वांग, 🌹 वांग-उपचार - शरीरातील हार्मोन्स कमी - जास्त झाल्याने चेहऱ्यावर व मानेवर काळसर डाग व पुळ्या येतात त्याला वांग म्हणतात. गरोदरपणात महिलांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात हार्मोसची निर्मिती होत असते तेव्हा वांग येण्याचे प्रमाण जास्त असते-                                                  उपचार- 1) दररोज कच्चा बटाट्याचे वेफर्स करून वांग वर दिवसातून 3 वेळा 10 मिनिटे दाब देऊन चोळावे                       2) चंद्रप्रभा वटी गोळी दररोज नास्ता च्या अगोदर सकाळ- जेवण्या अगोदर दुपार  व जेवणाच्या अगोदर रात्री  1 ह्या प्रमाणे घ्यावी. 50 वर्ष वरील व्यक्तीनी सकाळी-दुपारी व सायंकाळी 2 गोळ्या                                  टीप-गरोदरपणात ह्या गोळ्या घेऊ नये तर बाळंतपण झाल्यावर 2 महिन्या नंतर घ्याव्यात    ...