Posts

Showing posts from October, 2021

कोमट पाणी पिण्याचे फायदे

 कोमट पाणी पिण्याचे फायदे, बरेच रोग होतात दूर  सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोमट पाणी पिल्यामुळे शरीराची घाण साफ होते. कोमट पाणी पिण्यामुळे, शरीरातील विषारी द्रव मूत्रमार्गे बाहेर पडतात. सकाळी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीर शुद्ध होते. जाणून घ्या फायदे. आपले शरीर बहुतांश पाण्याने बनलेले आहे. जर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर बरेच रोग शरीरात घर करू लागतात, याचाच अर्थ पाणी आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. कोमट पाणी एक औषध म्हणून कार्य करते. बहुतेक लोक दिवसाची सुरुवात गरम चहा किंवा कॉफीने करतात, जेणेकरून शरीराला ताजेतवाने वाटेल. त्याच वेळी, पाणी पिताना, सामान्य किंवा थंड पाणी पितात. आयुर्वेदानुसार हे चुकीचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सर्दी पडश्यात लाभदायक सर्दी झाल्यावर कोमट पाणी पिण्याने कफ वितळतो. दिवसातून तीन किंवा चार वेळा कोमट पाणी घेतल्यास थंडीत आराम मिळेल. कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या केल्याने देखील खोकला बरा होऊ शकतो. कोमट पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होते वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्याचा व...

खोकला घरगुती उपाय

 घरगुती उपचार  खोकला  ज्यांना खुप जास्त खोकला येत असेल औषधांनी तेवढ्यापुरता थांबुन परत - परत तोच त्रास होत त्यांनी हा उपाय करायला हरकत नाही गुण येईल.  अगदी थोडी हळद पावडर तोंडाच्या एकदम आत मध्ये जे छोटेसे मांसाचे लोलक असते त्यास लावावी, चटकवावी. हाताने शक्य नसेल तर छोट्या चमचीस तुप लावुन त्या चमचीस हळद पावडर लावा व त्याने केले तरी चालते, दिवसातून तीन तार वेळेस लावले तर उत्तम, लाभ त्वरीत होतो.  निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

चहा

 चहा ☕ मग सकाळी उठल्यावर चहा प्यावा की नाही ?   अगदी सकाळी उठल्यावर तोडं धुतले की  लगेचच चहाची गरजही नसतेच !  वास्तविक रिकाम्यापोटी घेतलेला चहा  हा काही वेळाने लागणार्या भूकेलाही नाहीशी करतो.  म्हणजेच चहा प्यायचा टाळला  तर नाष्ट्याची भूक कडकडून लागते.  हा अनुभव प्रत्येकाने घेतला तरच कळतो…  चहा न घेता तसेच राहीले असता..  पित्ताचा काळ हा सकाळी १० ते दुपारी २ असल्याने  ह्या काळात चांगली भूक लागते.  चहा हे पेय शीतप्रदेशाचे पेय आहे.  थंड प्रदेशात गारठा कमी व्हावा म्हणून  चहा/कॉफी पाना ची पद्धती आहे.  ▪ आपल्याकडे फारतर पावसाळ्यात व हिवाळ्यात चहा/कॉफी प्यायला हरकत नाही परंतु तो गोदुग्ध युक्त असावा.  ▪अति तुरट किंवा कडू रसात्मक असा नसावा.  ▪परंतु जे पित्तज प्रकृती आहेत, ज्यांना पित्ताचे विकार संभवतात त्यांनी चहा शक्यतो अतिप्रमाणात टाळावा.  त्यांना ऐवजी गोदुग्ध + गोघॄत (गाईचे तूप) + साखर घ्यायला हवे. ▪ चहा बनवताना त्यात सुंठ व वेलची पावडर टाकावी म्हणजे पचनास मदत होते,  पित्त वाढत नाही व इंद्रियांचा जडा...

हेमंत ऋतूत काय खावे ? काय खाऊ नये

 आला हेमंत ऋतू.... या ऋतूत काय खावे ? काय खाऊ नये ?  *   १. ऋतूचे नाव - हेमंत   २. काळ - ऑक्टोबरचा उत्तरार्ध,  नोव्हेंबर पूर्ण, डिसेंबरचा पूर्वार्ध  ३. दोष प्रकोप - त्रिदोष संतुलीत असतात म्हणूनच याला आरोग्यदायी ऋतू म्हणतात.  ४. योग्य आहार रस - गोड, आंबट, खारट  ५. अयोग्य आहार रस - कडू, तिखट, तुरट  ६. हे खावे -  तूप, लोणी, तेल, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, दूध घातलेली तांदळाची खीर, उडीद, खडी साखर, रबडी, मलई, मध, ऊसाचा रस, हलवा, डाळी, मोड आलेले हरभरे, मोड आलेली कडधान्ये, मूग, गहू, ज्वारी, जुना तांदूळ, आवळा, संत्रे, मिठाई, सुका मेवा, मांसाहार, च्यवनप्राश, मोरावळा, गरम पाणी, गरम अन्न भाजी - पडवळ, वांगी, कोबी, लाल टोमॅटो, गाजर, मटार, पालक  ७. हे खाऊ नये -  कोरडे पदार्थ, आईस्क्रिम, थंड पेय व थंड पदार्थ, चिंच, आमसूल, आंबट दही, आंबा लोणचे, पातळ पदार्थ  ८. हे करावे -   👉 रोज सकाळी ब्रश झाल्यावर चहाच्या चमच्याने अर्धा चमचा हिरडा चूर्ण आणि अर्धा चमचा सुंठ चूर्ण एक कप दुधात उकळून किंवा पाण्यात काढा करुन घ्यावे. 👉 सूर्योदय...

दाताचे आरोग्य

 घरगुती उपचार  🦷 दात  आपले दात म्हणजे आरोग्याचा महामेरूच, जेवण व्यवस्थित चावुन खाल्यास पचन व्यवस्थित होते व पचनशक्ती चांगली असेल तर आरोग्य हे निश्चितच येते. दातांवरील काही समस्येवर घरगुती उपाय सुचवत आहे, करून पहा व निरोगी रहा.  🦷 दातदुखी  - लसणाची पाकळी दाताखाली ठेवल्यास ठणक येऊन दुखत असल्यास थांबते.  - तुळशीची पाने व काळेमिरी एकत्र बारीक करून त्याची गोळी करून दाताखाली दाबून धरल्यास वेदना थांबतात. 🦷 दाताची किडे  - तुळशीच्या पानांचा रस करून त्यात थोडासा कापुर टाकुन ते दातांवर ठेवल्यास किडे मरतात.  - सकाळी अनोश्यापोटी पालक चा रस करून त्याची चुळ भरावी तसेच तो रस थोडा वेळ ठेवुण प्यावा, किडे होत नाहीत !  🦷 पायरिया  - मुळ्याच्या रसाने दिवसातुन ५ वेळेस गुळण्या कराव्या आराम होतो. - पुदिना स्वच्छ धुवुन हळुहळु चावुन खाल्यास त्वरीत आराम मिळतो.  - आवळा चावुन खाल्यास आराम मिळतो.  🦷दातातील किड  - मधाने दाताची हळुहळु मसाज केल्यास किड व दुर्गंधी जाते. - लवंगाची पावडर व लिंबुचा रस एकत्र करून दातांवर लावल्यास किड जाते.  - बाभळीच्य...

कोरोना नंतर घ्यावयाची काळजी

 श्वसनक सन्निपातानंतर ( Covid 19) येणारा थकवा आणि फुफ्फुसांची हानी भरून काढण्यास उपयुक्त आहार:   शाकाहारी व्यक्तींसाठी-  शेवग्याच्या पानांची भाजी/सूप, शेवगा शेंगांची आमटी, लाह्यांचे पाणी वा लापशी, खजूर व कोकम पाण्यात कोळून त्यात मीठ + खडीसाखर घालून घेणे.   मांसाहारी व्यक्तींसाठी-  देशी गायीच्या तुपाची फोडणी दिलेले आणि कमी मसाल्याचे मटण सूप. गेल्या दीड वर्षाच्या प्रत्यक्ष रुग्णानुभवानंतरच अधिकाधिक लोकांना लाभ व्हावा म्हणून जाहीरपणे सांगत आहे. सोबतच आयुर्वेदीय औषधं घेतल्यास अधिक लाभ होईल. करून पहा!  - वैद्य विश्राम माळाकोळीकर  श्रीराम आयुर्वेदिक 7350911888,9420242484 आनंदी रहा, निरोगी रहा!!

सूर्यापासून मिळणारं ऊन आपल्या आरोग्यात महत्त्वाची कामगिरी बजावतं.

 सूर्यापासून मिळणारं ऊन आपल्या आरोग्यात महत्त्वाची कामगिरी बजावतं.         थंडीच्या दिवसांत याचे महत्त्व अधिकच वाढते. कारण हुडहुडी भरणाऱ्या थंडीत उन्हामुळे शरीराला गरम वाटते, पण मनात एक प्रश्न येतोच, उन्हाचा उत्तम फायदा कसा घ्यावा ? याच्या नुकसाना पासून वाचण्यासाठी काय करावं ? सूर्यप्रकाशात असे चमत्कारिक गुण आहेत, ज्यामुळे शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग होण्याची शक्‍यता कमी होते. उन्हाच्या सेवनाने शरीरात श्‍वेत रक्त कणांची निर्मिती पुरेशा प्रमाणात होते. जे आजार निर्माण करणाऱ्या कारकांशी लढण्याचे काम करते. आपल्याला तंदुरुस्त ठेवणे. आजार दूर राहतात. सूर्याची किरणं रोगनिवारक आहेत, ज्याच्या सेवनाने आपलं शरीर अनेक आजारांपासून दूर राहते. » कर्करोगापासून बचाव : – सूर्यकिरणांमध्ये अँटिकॅन्सखर घटक असतात, जे कर्करोगाचा धोका टाळतात. ज्यांना कर्करोग आहे त्यांना उन्हामुळे आजारात आराम वाटतो. संशोधनांती हे सिद्ध झाले आहे की, जेथे ऊन कमी वेळासाठी असते किंवा ज्या व्यक्ती उन्हात कमी वेळ घालवतात, त्यांना कर्करोग होण्याची शक्‍यता वाढते. » रक्तसंचारात सुधारणा : – रक्तसंचार ...

तीळाचे महत्त्व

  तीळाचे महत्त्व सामान्यता जवळपास प्रत्येकाच्या शरिरावर तीळ असतात, परंतु आपणांस माहित आहे का !? तीळ शरिरावर कुठे असल्यास त्याचा काय परिणाम असतो !? तीळ हे माणसाच्या प्रारब्ध व भविष्यावर आधारित एक नैसर्गिक देण आहे. तर आज आपण काही सामान्य ज्ञानांची माहिती घेऊया.  शरिरावर कुठे तीळ असल्यावर त्याचा मनुष्याचा स्वभावावर व जीवनावर काय परिणाम होतो हे बघुया.  १) मानेपासुन वर चेहर्यावर तीळ असल्यास ती व्यक्ती शांत, हुशार, संयमी व कोणत्याही परिस्थितीत स्वताला व परिवाराला त्यातुन धैर्याने बाहेर काढते. २) मानेवर तीळ असल्यास बोलण्यात हुशार व समोरच्यावर प्रभाव टाकु शकणारी. ३) मानेपासुन कमरेपर्यंत पुढील भागांत कोठेही तीळ असल्यास ती व्यक्ती परिवारातील प्रिय तसेच सदैव हसतमुख आणि सर्वांना एकत्र करणारी व्यक्ती ठरते.  ४) पाठीवर तीळ असल्यास ती व्यक्ती स्वाभिमानाने राहणारी, परिस्थितीशी जुळवुन घेणारी, पण स्वताचे खरे करणारी असते.  ५) कमरेपासुन खाली पायांच्या पंज्यापर्यंत तीळ असल्यास मनाने अतिशय निर्मळ पण रागीट, सदैव दुसर्याचे चांगले करण्यासाठी तत्पर, कोणतेही कार्य करण्यास समर्थ असते. ...

झाडांची उपयोगिता

 काही उपयुक्त माहिती  आपल्या घराच्या जवळपास अनेक प्रकारची झाडे, वनस्पती, फुलांची झाडे येतात किंवा आपण लावतो, त्या प्रत्येक झाडाचे स्वताचे काही गुणधर्म असतात, काहींचे गुणधर्म हे अत्यंत उपयुक्त असतात, काहींचे सामान्य तर काही आपण स्वताहुन लावु नयेत असे असतात, कारण प्रत्येक झाड चांगले असतेच पण त्यांच्या प्रत्येकाच्या मान-मर्यादा व त्यांची उपयोगिता असतात, कळत - नकळत जर ते पाळले गेले नाही किंवा उपयोग चुकला तर जीवनात रोगराई, मानहानी, धनहानी, परिवारीक मतभेद येतात.  कोणतेही झाड तोडु नयेत पण त्याने स्वताचे व आरोग्याचे संरक्षण कसे करावे, व ते उपयोगात कसे आणावे ते बघुया.  🌿 तुळस - अत्यंत बहुगुणी, अत्यंत उपयुक्त  🌿 पिंपळ - घरा भोवती स्वता लावु नये पण आले असल्यास त्यास पिवळा धागा बांधावा.  🌿 वड - घरा भोवती लावु नये पण आले असल्यास त्यास सफेद धागा बांधावा.  🌿 औदुंबर - घरा भोवती लावु नये पण आले असल्यास त्यास पिवळा धागा बांधावा.  🌿 कडुलिंब - उपयुक्त बहुगुणी आहे. महिन्यातून किमान एकदा त्याचा रस प्यावा.  🌿 शेरा चे काटेरी झाड नसावे, त्याच्या चिकाने सुज येते...

क्रियेटीनीन लेव्हल मध्ये ठेवण्यासाठी उपाययोजना

  क्रियेटीनीन लेव्हल मध्ये ठेवण्यासाठी उपाययोजना. किडनी संबधीत आजारात हे प्रमाण वाढले की किडनी फेल्युअरचा धोका तयार होतो यासाठी उपाययोजना १) मक्याच्या केसांना रोज उकळून ते पाणी कपभर प्या. २) कोथिंबीर रस घ्या. ३) कोबीचा रस घ्या. ४) दालचिनी पावडरचा काढा एक चमचा मध घालून घेणे. ६) पाणी भरपूर पिणे, (३ ते ४ लिटर) ७) हलका व्यायाम करणे. ८) मासाहार टाळावा. ९) केमोमाईनच्या पानांचा काढा घेणे १०) नेटल लीफ टी घेणे. ११) मुळ्याच्या पानांचा रस एक चमचा घ्या. (रोज) १२) रोज उशीरासव घेणे तीन वेळा दोन चमचे समभाग पाण्यात. १३) चंद्रप्रभा वटी व मुत्रदोष नाशक वटी घेणे. १४) ब्राम्ही च्या पानांचा रस व काळीमिरी एकत्र घेणे. १५) जेवणातील प्रोटीन मात्रा बंद करून प्रोटीन फ्री डायट देणे. १६) उच्च रक्तदाब कंट्रोल मध्ये आणणे. १७) नशा, चहा, काँफी बंद करणे. १८) पुनर्नवासव घेणे. ( ९ व १० मध्ये नमूद केलेली केमोमाईन व नेटल लिफ ही झाडे नर्सरीतून मिळतील) किडनीचे आजार.  किडनी फेल्युअर विकारांवर अथवा किडनी अंशतः काम करते किंवा डायलेसिस सुरू असलेली मंडळी ही हे उपाय करु शकतात. ही संपुर्ण पणे आयुर्वेदिक पध्दती असून याचे सा...

घरगुती उपचार - डिप्रेशन/मानसिक त्रास

  घरगुती उपचार  👤 डिप्रेशन/मानसिक त्रास  नमस्कार 🙏🏼 … आत्ताच्या या जलदगती युगात बहुतांश वेळेस आपण डिप्रेशन ने ग्रासलेले व्यक्ती फार प्रमाणात पाहतो, तसे डिप्रेशन हा रोग नसुन एक विशिष्ठ वेळेत मेंदुवर अतिप्रमाणात विचारांचा ताण किंवा जीवनात अशी एखादी घटना ज्याने व्यक्ती पुर्णता नैराश्येने ग्रासुन जातो, आणि नंतर सुरू होते डिप्रेशन ची वाताहात. जर योग्य वेळेस त्यावर काही उपाय न जाल्यास व्यक्ती पुर्ण आयुष्य त्यामध्येच राहतो. जास्तकरून याचे प्रमाण हे विवाहीत स्रीवर्ग, तरूण वयातील प्रेमप्रसंग, कामधंद्यात मोठे नुकसान, किंवा वैवाहिक जीवनातील तणाव ह्याच्या जास्त तक्रारी असतात, तसे याची अनेकानेक कारणे असतात पण या जलदगती युगात हे सर्रास पाहायला मिळतात.  तसे यावर डॅाक्टरी, आयुर्वेदीक उपाय भरपुर आहेत पण आज आपण काही मोजके घरगुती उपचार पण जाणुन घेऊया.  ➡️ याची लक्षणे :- गॅस - पित्त वाढणे, सतत विचारांत राहणे, सतत चिडचिड होणे, अतिशय राग येणे, रात्री झोप न येणे किंवा कमी झोप, बोलतांना आपले म्हणने स्पष्टपणे सांगता न येणे, अनामिक भीती वाटणे, याशिवाय अनेक लक्षणे असतात पण मुख्यता हि ल...

लसणासोबत हे घ्या- हार्ट अटॅक येणार नाही

  लसणासोबत हे घ्या. हार्ट अटॅक येणार नाही, Bp ची गोळी बंद होऊ शकते, ब्लॉकेजेस निघतील, गुडघेदुखी कमी होईल, मुंग्या येणे बंद होईल. लसूण हा आपल्या रोजच्या जेवणामध्ये नेहमी वापरला जाणारा हा पदार्थ यालाच आयुर्वेदामध्ये महाऔषधी म्हंटले जाते कारण घरातील हा पदार्थ कसल्याही प्रकारचा हृदयरोग असेल, हृदया संबंधी कसल्याही तक्रारी असतील तर या सर्व तक्रारी कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतोच. सोबतच बऱ्याचशा व्यक्तींना सांधेदुखी असते , सांध्यांमध्ये कटकट आवाज येत असेल, हातापायांना बधिरता येत असेल, हातापायांना वारंवार मुंग्या येत असतील अशा सर्व समस्या, सोबतच बऱ्याच व्यक्तींना छातीमध्ये जळजळ , घाबरल्या सारखे होते , BP चा त्रास , शुगर या सर्व समस्यांवर खालील उपाय गुणकारी ठरणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम् लागणार आहे ते म्हणजे लसूण. मित्रानो लसणामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्परस, पोटॅशियम, आयर्न, आयोडीन, व्हिटॅमिन A, C असे अनेक घटक आढळून येतात. ज्यामुळे साधारण आजारापासून दुर्धर आजार नष्ट करण्याची क्षमता या लसणामध्ये आहे. मित्रानो सोबतच लसणामध्ये ऑलेसिन नावाचा घटक आहे तो अँटीबॅक्ट...

कंबरमोडी_ आयुर्वेदीक महत्त्व

Image
  कंबरमोडी_ आयुर्वेदीक महत्त्व माझ्या बालपणीच्या अनुभवातून, साधारणतः ३-४ वर्गात असतानाची गोष्ट आहे. लहान असतांना सुट्टीच्या दिवशी आजी बरोबर शेतात जायचे आणि झाडाखालील थंड हवेत खेळत बसायचे.  असेच लहान भावाबरोबर विहीर तयार करण्याचा खेळ खेळत असतांना, अचानक भावाने हातावर विळा  मारला आणि त्यामुळे हात कापून पूर्णपणे रक्तबंबाळ झाला. मोठं मोठयाने रडणे सुरु झाले आणि लगेच आजी धावत आली. रक्त पाहून आजीने लगेच जवळचा कंबरमोडीचा पाला तोंडला व त्याला थोडे बारीक करून जखमेवर बांधून दिले. आणि साधारणतः २-३ दिवसाचे आत घाव भरून आला व जखम पूर्णपणे बारी झाली. कोणत्याही डॉक्टर कडे जायची गरज  भासली नाही. ही होती कंबरमोडीच्या अर्काची कमाल. मित्रांनो हि कंबरमोडी आपल्या आजूबाजूला, शेतात, भारतातील कुठल्याही भागात बघायला मिळते. आपण बरेचदा शेतात काम करतांना, किंव्हा घरी काम करतांना काही धारदार अवजार लागल्याने जखम होत असते. त्यावेळेस नक्कीच तुम्हाला याचा वापर करून घरगुती उपायाने जखम भरून काढता येईल.  कधी वापर केला तर अनुभव जरूर सांगा.  धन्यवाद...   याबरोबरच वैध साहेबांचे अनुभव खाल...

खोकला - घरगुती उपचार

खोकला - घरगुती उपचार  ज्यांना खुप जास्त खोकला येत असेल औषधांनी तेवढ्यापुरता थांबुन परत - परत तोच त्रास होत त्यांनी हा उपाय करायला हरकत नाही गुण येईल.  अगदी थोडी हळद पावडर तोंडाच्या एकदम आत मध्ये जे छोटेसे मांसाचे लोलक असते त्यास लावावी, चटकवावी. हाताने शक्य नसेल तर छोट्या चमचीस तुप लावुन त्या चमचीस हळद पावडर लावा व त्याने केले तरी चालते, दिवसातून तीन तार वेळेस लावले तर उत्तम, लाभ त्वरीत होतो.  निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

कोमट पाणी पिण्याचे फायदे

 कोमट पाणी पिण्याचे फायदे, बरेच रोग होतात दूर  सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोमट पाणी पिल्यामुळे शरीराची घाण साफ होते. कोमट पाणी पिण्यामुळे, शरीरातील विषारी द्रव मूत्रमार्गे बाहेर पडतात. सकाळी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीर शुद्ध होते. जाणून घ्या फायदे. आपले शरीर बहुतांश पाण्याने बनलेले आहे. जर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर बरेच रोग शरीरात घर करू लागतात, याचाच अर्थ पाणी आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. कोमट पाणी एक औषध म्हणून कार्य करते. बहुतेक लोक दिवसाची सुरुवात गरम चहा किंवा कॉफीने करतात, जेणेकरून शरीराला ताजेतवाने वाटेल. त्याच वेळी, पाणी पिताना, सामान्य किंवा थंड पाणी पितात. आयुर्वेदानुसार हे चुकीचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सर्दी पडश्यात लाभदायक सर्दी झाल्यावर कोमट पाणी पिण्याने कफ वितळतो. दिवसातून तीन किंवा चार वेळा कोमट पाणी घेतल्यास थंडीत आराम मिळेल. कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या केल्याने देखील खोकला बरा होऊ शकतो. कोमट पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होते वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्याचा व...

फिट येणे उपाय

 फिट येणे यांवर उपयुक्त ४० दिवसाचा उपचार.  विछीया नावाचे एक बी मिळते त्याला दोन काटे असतात व ते कडक बी असते, आयुर्वेदीक दुकानात ते मिळु शकेल ते काळे दिसते. यासाठी समुद्राचे चे पाणि काचेच्या बरणीमध्ये घ्यावे ( इतर पाणि चालत नाही ) प्लास्टिक चा स्पर्श नको. त्यात विछींया चे ४० बी भिजत घालावे, त्यानंतर ७ दिवसांनी प्रयोगास सुरूवात करावी, रोज एक बी काढुन त्याला फोडावे त्यामध्ये छोटे बारीक तांदळासारखे किंवा त्याहुन बारीक बी निघतील ते बी साध्यापाण्यासोबत दुपारी एकदा गिळुन घ्या, रोज एक याप्रमाणे ४० दिवस रोज नियमित घ्यावे, कोणताही साईड इफेक्ट नाही पण हा उपचार ९९.९९% लाभदायक आहे.  टीप : तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावं  श्रीराम आयुर्वेदिक   7350911888  निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

पाण्यातील आक्सिजन वाढविणे- घरगुती उपाय

 घरगुती उपचार  कृपया एकदा हा प्रयोग करून पहा.. आम्ही हे करतोय व चांगला अनुभव आहे, याचा वैज्ञानिक आधार किंवा प्रमाण नाही परंतु नुकसान ही नाही, प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते, तरीही आज आमचे घरात वय २० ते वय ७८ पर्यंत चे लोक आहेत व याचा गुण आहे.  १ मग ( स्टील, तांबे, प्लास्टीक कोणताही जग ) पाणी भरून घ्या, दुसरा मग खाली ( रिकामा ) घ्या, एकातून दुसर्यात व परत दुसर्यातून पहिल्यात असे ४५/५० ( पंचेचाळीस ते पंन्नास ) वेळेस करा, व दिवसभरात १/१.५ लीटर ( एक ते दिड ) ते पाणी प्या, ॲाक्सीजन चे योग्य प्रमाणात संतुलन राहते, कोणतेही वयातील व्यक्ती हे घेऊ शकतात, याचे कोणतेही नुकसान नाही, एकदा केलेले पाणी एक दिवस चालते, जेव्हा पाणी वर खाली कराल तेव्हा त्यामधील अंतर साधारणता २:५/३ ( अडीच ते तीन) फुटाचे ठेवावे. ६० दिवस नियमित घ्यावे, इतर लहान मोठे आजारावर गुण लवकर येतो.   वैद्य विश्राम माळाकोळीकर   श्रीराम आयुर्वेदिक   7350911888,9420242484  निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

स्मरणशक्ती- घरगुती उपचार

 घरगुती उपचार   स्मरणशक्ती 🧠 आजकाल बहुतेक घरात लहान / मोठे सर्वांना कोणतीही गोष्टीचा विसर लवकर पडतो, अगदी सकाळ चे संध्याकाळीही आठवत नाही, हा काही आजार नाही पण भरपुर दिवस जर यावर दुर्लक्ष झाले केले तर याचे आजारात रूपांतर नक्कीच होऊ शकते, याची काही कारणे व काही जुन्या पण उपयुक्त पध्दतीने उपचार घेतले तर त्याचे अतिशय उपयुक्त परिणाम मिळतात.  कारणे :- अशांत झोप, सतत विचार, पौष्टिक जेवणाचा अभाव, पाणि कमी पीने, मानसिक तणाव, सतत व्यस्तता, अतिशय हळवा स्वभाव ( जास्त करून स्रीयांचा ), मनातील अस्थिरता. उपाय:-  •ब्राम्हीवटी रोज रात्री २ गोळ्या. •किमान ८ तास झोप. •लहान मेंदु ( डोक्याचा मागील भाग ) यांस बादाम तेलाचे हळवे मालीश करणे. ५/१० मिनीट रोज. •रोज रात्री पाण्यात ३ बदाम, १ अक्रोड भिजवुन सकाळी खाणे. •तळपायाची खोबरेल तेलाने १०/१५ मालीश करणे. •मानेपासून कमरे पर्यंत रोज तेल मुरेपर्यंत खालून वर अश्याप्रकारे मालीश करणे. खोबरेल तेलात एक लवंग + हिंग टाकुन गरम करून घेणे व नंतर त्याचा वापर करणे.  •पचनास जे हळवे पदार्थ असतील ते घ्यावे.  •रोज एक खारीक भिजवलेले खावे. •बाहेरी...

पनीर फुल- आयुर्वेदिक महत्त्व

 मराठी: पनीर फुल  Latin: Withania coagulans संस्कृत: ऋष्य गंधा Originally from : पंजाब हिमाचल उत्तरांचल Viral झालेला उपयोग: १००% diabetes cure....🧐🤔 याचे कार्य रक्तशर्करा कमी करणे असे दिसून येते. (Oral hypoglycaemic agent). या वनस्पतीचा आयुर्वेदात उल्लेख बृंहणीय आणि मधुर असा आहे. (म्हणजेच वजन वाढवणे) त्यामुळे डायबिटीस होऊन ज्यांचे वजन कमी झाले आहे त्यांनी याचा वापर करण्यास हरकत नाही. तरीही सर्वांनाच याचे सेवन केल्याने फरक पडेल किंवा शुगर साठी चालू असलेली औषधे बंद होतील असे सांगता येत नाही.

सीताफळ- औषधी उपयोग

 सीताफळ:-   सर्वांना परिचीत असलेली व संपूर्ण भारतभर आढळणारी वनस्पती. सीताफळ साधारण 15 ते 20 फुटांपर्यंत वाढते. याचे फळ अतिशय मधुर असते. फळांमध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात. याची लागवड बियांपासून करतात. * सीताफळामध्ये मधुर, शीत, पित्तनाशक, कृमीनाशक, दाहनाशक, हृदयाला हितकर, रक्तपित्तघ्न इ. गुणधर्म असतात.  औषधी उपयोग:-  * केसांमध्ये उवा झाल्यास सीताफळाच्या बिया चांगल्या बारीक वाटून केसांना लेप करावा; म्हणजे उवा व त्याची अंडी सर्व मरून जातात. लेप करताना डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे डोळ्यांना दुखापत होऊ शकते. * व्रणावर बिया वाटून लेप केल्याने कृमी मरून व्रण बरे होतात. * मुत्राघातावर सीताफळाच्या झाडाची मुळी थंड पाण्यात वाटून द्यावी; म्हणजे बंद झालेली लघवी सुटते. * छातीत, पोटात जळजळ होत असल्यास सीताफळ खाण्यास द्यावे.  * हृदयासंबंधी आजारामध्ये सीताफळाचे सेवन फायदेशीर असते. * शरीरात अशक्तपणा आल्यास सीताफळाचे सेवन करावे. * शरीराचा दाह होत असल्यास सीताफळाचे सेवन करावे. *कोणत्याही वनस्पतीचा औषधी उपयोग करण्याच्या अगोदर तज्ञांचा सल्ला घ्यावा.  ...

सीताफळ खाण्याचे गुणकारी फायदे

 सीताफळ खाण्याचे हे गुणकारी फायदे  सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. सीताफळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. बाहेरून थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असणाऱ्या सीताफळाचे खालील फायदे नक्की वाचा.    1)  सीताफळामध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. त्याने आपल्या शरीराला ताकद मिळते.   2)  सीताफळामध्ये व्हिटामिन बी-6चं प्रमाणात जास्त असतं. त्यामुळे अस्थमाचा त्रास रोखण्यात मदत होते.   3)  हृदयाचे त्रास असणाऱ्यांनी सीताफळ नियमित खावे. हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ हे अतिशय फायदेशीर आहे.   4)  सीताफळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि रिबोफ्लेविन हे पदार्थ असतात. त्याने दृष्टिदोष कमी होण्यास मदत होते.   5)  सीताफळामध्ये तांबे-लोहं असल्यामुळे त्याचा गर्भवती महिलांसाठी देखील खूप फायदा आहे. त्याच्या आहारामुळे गर्भधारणेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होतात.   6)  नियमित सीताफळ खाल्याने पचनक्रिया सुधारते. शरीरात रक्ताची योग्य पातळी राखण्यास मदत होते.   ...

स्पॉन्डिलाइटिस घरगुती उपाय

 मन्यास्तंभ ( Spondylitis , spondylosis )  मन्यास्तंभ कसा होतो हे सांगताना चरकाचार्य म्हणतात,  मन्ये संश्रितो वातो यदा अन्तर्नाडीः प्रपद्यते तदा मन्यास्तंभं कुर्यते । ....   चरक चिकित्सास्थान  दुष्ट झालेला वातदोष जेव्हा मानेतील नसेत जातो तेव्हा मन्यास्तंभ होतो.  प्रत्यक्षात हा अनुभव आहे मानेवर सतत ताण अशा अवस्थेत म्हणजे झुकून काम करणे , कॉम्प्युटरवर तास न् तास बसणे, आहारात पोषक व स्निग्ध पदार्थाचा अभाव वगैरे कारणांनी शरीरातील वातदोष असंतुलित होतो व त्याचे पर्यवसान स्पॉण्डिलायटीस मध्ये होते. विश्रांती घेणे, कॉलर नेकच्या साहाय्याने मानेला आधार देणे, वेदनाशमक औषधे घेणे, तीव्र अवस्थेत ट्रॉक्शन घेणे वगैरे उपचार पद्धती प्रचलित असल्या व त्यांचा तात्पुरता योग्य उपयोग होत असला तरी स्पॉन्डिलाइटिस, स्पोंडीलोसिस खऱ्या अर्थाने बरा करण्यासाठी मुळावर उपचार करायला हवेत.  लहान मुल मान धरायला लागते तेव्हापासून त्याचा कणा वापरत असतो. म्हणजे साध्या साध्या हालचालीही उदा. मान वर करून पाहणे, झुकणे, वळवणे, बसणे,उठणे, चालणे, वाकणे या सर्व शारीरिक क्रिया पाठीच्या कण्याच्या...

स्पोंडीलायटीस उपचार

स्पोंडीलायटीस उपचार मागील पोस्ट मध्ये स्पॉण्डिलायटीस म्हणजे काय व इतर बाबींचा विचार केला. आपण यामध्ये उपचाराबद्दल पाहू सदरील उपचार तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत .. * गोक्षुर, शतावरी,बला,अश्वगंधा वगैरे वनस्पती पासून बनवलेले रसायन चूर्ण दूध- साखरेबरोबर किंवा तूप- साखरेबरोबर घ्यावे तसेच सिंहनाद गुग्गुळ, अमृतादी गुग्गुळ वगैरे गोळ्या सेवन कराव्यात  * मानेला, पाठीला शास्रोक्त सिद्ध तेलाचा नियमित अभ्यंग करावा ( कुंडलिनी तेल). शक्य असल्यास शास्त्रीयदृष्ट्या मानेचे सखोल ज्ञान असणाऱ्या व्यक्तीकडून मालिश करून घ्यावी.(कुंडलिनी मसाज).  * शेक करणे हाही वेदना कमी करण्यासाठी व वात संतुलनासाठी एक उत्तम उपाय होय. अगोदर तेल लावलेल्या जागी निर्गुडीचा किंवा एरंडाचा पाला वापरून शेक करावा. (मागील एका पोस्ट मध्ये सांगितले आहे)  * वातशमन करण्यासाठी सर्वश्रेष्ठ उपचार म्हणजे बस्ती. स्पॉन्डिलाइटिस मध्ये बस्ती चा उत्तम उपयोग होताना दिसतो. दशमूळादि औषधी द्रव्यापासून तयार केलेल्या तेलाचा किंवा दुधाचा बस्तीसाठी वापर करता येतो.  * मान व पाठीचा कणा लवचिक व कार्यप्रवण राहण्यासाठी खालील साधी योग...

आवळा आयुर्वेदिक महत्त्व

 आवळा आयुर्वेदिक महत्त्व   नीसर्गाने कीती सुंदर वनस्पती आसपास दिल्या .त्यातीलच आवळा हा आवर्जून सांगांव लागेल .रोग होउ नये यासाठी उपाययोजना करण्यात आवळा महत्त्वाचा आहे. व्हायरल आजार संसर्गजन्य आजार रोखण्यात आवळ्यासारख औषध नाही. आयुर्वेदात त्रीफला खुप महत्व आहे( बेहडा हीरडा आवळा )हे तीनही वात पीत्त कफ नाडी संतुलीत ठेवतात .अगदि डोळ्यापासुन सर्व अवयव छान ठेवन्यात यांचा वाटा अप्रतीम आहे. इं . - Emblic myroblan एंब्लिक मिरोब्लन . लॅ . - Phylanthus amblica  भरतखंडांत आंवळीची झाडे पुष्कळ ठिकाणी होतात . हे झाड बरेंच उंच असते . याची पानें शमीच्या पानांसारखी असतात . आंवळीस कार्तिकमासी आंवळे येतात . हे फळ साधारण सुपारीएवढे असते . आंवळ्यांत दोन जाती आहेत . रान - आंवळा व पांढरा आंवळा .  आंवळ्याचा मुरंबा करितात . तो पित्तावर चांगला आहे . त्याचे लोणचे होते .   आंवळे सुकविले म्हणजे याची आंवळकठी होते .  आंवळीच्या लांकडापासून पांढरा कात होतो .  आंवळकठी वाटून अंगास लावतात . आंवळकठीचे रायतें होतें . वैद्यकांत ज्यास त्रिफळा म्हणतात त्यांत आंवळकठी येते . हिरडा , बेहडा ,...

जीभेचा रंग आणि शरिराच्या स्थितीचा अंदाज

 अनेकदा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. कधी तुम्ही हा विचार केला आहे का की तुमची जीभ पाहून  डॉक्टरांना आजाराचं निदान कसं काय होत असेल?  पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की  डॉक्टर जीभ का बघतात.  जीभचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पाहा काय आहे जीभेच्या रंगामागचं खरं कारण. काय सांगते तुमची जीभ.  १. गुलाबी रंग - गुलाबी रंगाची जीभेवर जर कोणत्याही प्रकारचे डाग नसतील तर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित आहात.  २. तुमच्या जीभेवर जर सफेद रंगाचा थर असेल तर तुमच्या पचन क्रिया व्यवस्थित नाही. तुमच्यात अशक्तपणा आहे. काही वेळेस हे वायरल इन्फेक्शनचा ही प्रकार असू शकतो.  ३. पिवळा रंग - पिवळा रंग सांगतो की तुम्हाला सर्दी, वायरल इंफेक्शन किंवा तुमच्या शरिरात हिट वाढली आहे. काही वेळेस हा पचन न होण्याच्या समस्येचंही संकेत देतो.  ४. लाल रंग - लाल रंगाची जीभ ताप, रक्तात उष्णता वाढणे किंवा अंतर्गत जखम आणि इंफेक्शनचं संकेत देते.  ५. कोरडी जीभ - जीभ कोरडी पडणे आणि पिवळी पडणे म्हणजे काविळ, अशक्तपणा, कमी...

दही- आयुर्वेदात महत्त्व

 दही :  दुधाला सामान्यतः आदल्या दिवशीच्या दह्याचे किंवा ताकाचे विरजण लावून दही करतात. दूध मंदाग्नीवर चांगले तापवून ते कोमट असताना त्याला विरजण लावतात. दूध तापविल्यावर त्यावर दाट साय जमते तिला लोण्यासाठी वेगळे विरजण लावतात व उरलेल्या दुधाला वेगळे विरजण लावतात. विरजणाचे प्रमाण दुधाच्या १–५% एवढे असते आणि ते लावताना दुधाचे तापमान सु. ३२° से. असावे लागते. दही तयार होण्यास लागणारा काळ साधारणतः १०–१२ तासांचा असतो. हिवाळ्यात दही लागण्यास जास्त काळ लागतो. त्यासाठी दही लावलेले भांडे चुलीशेजारी कपड्याने झाकून किंवा अन्य उबदार जागी ठेवतात. याउलट उन्हाळ्यात दही लावलेले भांडे थंड ठिकाणी ठेवले म्हणजे विरजण फसफसत नाही. दह्याला मधूर आंबटपणा आला म्हणजे ते वापरण्यास व लोणी काढण्यास योग्य समजतात. विरजण जास्त शिळे झाल्यास दही फार आंबट होते, फार फसफसते, त्याला वाईट वास येतो व कडवट चव येते. दही कडू, मळमळीत, पांचट, बुळबुळीत असल्यास अगर त्यास तार येत असल्यास ते दूषित झाले असे समजावे व ते कोणत्याही कामासाठी वापरू नये. अदमुरे दही खाण्यास चांगले असते तसेच सायीसकट विरजलेले दही खाण्यास उत्तम असते. गोडे दह...

दहीबाबत आयुर्वेदाच्या दृष्टीने समज गैरसमज

 आयुर्वेदसमजगैरसमज_   प्रश्न: आयुर्वेदाच्या दृष्टीने दही हे वाईट असतं का?   उत्तर : दही हा आयुर्वेदाचा फार मोठा शत्रू आहे असं अनेकांना वाटतं. प्रत्यक्षात मात्र तसं मुळीच नाही. नीट विरजलेले सायीचे दही हे शरीराला स्निग्धता देते, जिभेची चव वाढवते, वात कमी करते आणि शुक्रधातू वाढवते असे आयुर्वेद सांगतो.  तरीही दही हा ‘नियमितपणे’ आणि रात्री खाण्याचा पदार्थ नाही हा झाला दही खाण्यासाठीचा मूलभूत नियम. अदमुरे दही { अदमुरे म्हणजे अर्धवट लागलेल्या दह्याला ‘मंद दही’ असे म्हणतात.} कित्येकजण आवडीने खातात. ते गोड असल्याने चांगलं असा त्यांचा समज असतो. मात्र प्रत्यक्षात जी गोष्ट धड दूधही नाही आणि दहीदेखील नाही अशी त्रिशंकू गोष्ट आरोग्याला चांगली कशी असेल बरं? पिढ्यान् पिढ्या गैरसमजातून उत्तम समजलं जात असलं तरी अदमुरं दही खाऊ नका. ते शरीरातले तिन्ही दोष वाढवतं.  दही घेताना छान फेटून घ्या. याला दह्याचं Structure demolition * असं म्हटलं जातं* . तसं केल्याने ते पचायला सोपं जातं. त्यात साखर, मीठ, मिरपूड किंवा आवळा पूड घालून घेतलं तर हे दही बाधत नाही. दही गरम गोष्टींत मिसळायच...

रक्तचंदनाची बाहुली

 रक्तचंदनाची बाहुली….  पूर्वी घराघरांत असायची…..आता नावालाही दुर्लभ झाली आहे! बहुतांश रुग्णांकडे आताशा नसतेच. प्रचंड उपयुक्त असलेलं आणि बहुगुणी औषध असल्याने पूर्वी प्रत्येक घरात आवर्जून ठेवली जायची.  काही महत्वाचे उपयोग नमूद करतो. (थेट वैद्यकीय सल्ला नव्हे; वैद्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन मगच उपचार घ्यावे)  * मुका मार लागला/ रक्त साकळलं असलं की गरम लेप घालणे.  * डोळ्यांचे रांजणवाडी/ अंजुर्लीसारखे विकार असता लेप लावण्यास. * गळू झाल्यावर ते बसावं वा फुटावं म्हणून दोषस्थितीनुसार गरम वा थंड लेप लावण्यास.  * नागिणीसारख्या विकारात लेप लावण्यास व पोटात घेण्यास. किडा वगैरे चावल्याने आलेली सूज उतरविण्यासाठी लेप व पोटातून घेण्यास.  * त्वचा विकारांवर उपयुक्त.  * सांधेदुखी, पाय मुरगळण्यावर गरम लेप उपयुक्त.  * उत्कृष्ट विषशामक असल्याने अन्नातून विषबाधा झालेली असल्यासही पोटात घेण्यास उपयुक्त.  * उलटी, पक्वातिसार यांना थांबवण्यासाठी लाभदायक. फ्रॅक्चर लवकर भरून येण्यास वा भाजले असल्यास बाहेरून लावण्यास उपयुक्त. * श्वसनक सन्निपातातील 'वास न येणे' या ...

रक्तचंदनाचे फायदे

 रक्तचंदन  ------------------  “रक्त चंदन” म्हणजे नेमके काय ?   काय आहेत त्याचे फायदे?  ” रक्त चंदन ” म्हटले की बहुतेक जणांना  चंदनाचाच प्रकार असावा, असे वाटते. परंतु खूप कमी लोकांना याची माहिती असल्याने येथे आवर्जून त्याची माहिती द्यावीशी वाटते…   सफेद चंदनाचे फेस पॅक, अगरबत्ती , किंवा औषधी गुणधर्म सर्वानाच परिचित आहेत. परंतु रक्त चंदन आणि सफेद चंदन यात जमीन असमानाचा फरक आहे. तो कसा ते आपण जाणून घेऊयात… रक्त चांदनाला वैज्ञानिक भाषेत टेरोकार्पस सेंटनांस असेही संबोधले जाते. मुळात रक्त चंदनाच्या झाडात लाल रंगाचा द्रव पदार्थ असतो, त्यामुळेच या झाडाला “रक्त चंदन” असे म्हटले आहे. या झाडाचे वाळलेले लाकुडही लाल रंगाचेच असते.  चंदन सुवासिकतेसाठी प्रसिद्ध आहे पण या चंदनाप्रमाणे रक्त चंदनाच्या झाडाला मुळीच सुगंध येत नाही.  रक्तचंदनाचे लाकूड लाल रंगाचे असल्यामुळे हा वृक्ष मौल्यवान मानला जातो. रक्तचंदन वृक्ष सु. ८ मी. पर्यंत उंच वाढतो. तो कमी मातीच्या जमिनीत वाढत असून त्याची वाढ जलद होते. तीन वर्षांत सु. ५ मी.पर्यंत त्याची उंची वाढते. त्याचे खो...

वास्तु शास्त्र- झोपण्याच्या पद्धती

 वास्तु शास्त्र - भाग १  वास्तु मध्ये दिशेप्रमाणे झोपण्याचे सुध्दा काही आरोग्यदायी नियम आहेत, जर आपण तश्या प्रकारे झोपण्याची दिशा बदलली तर शारीरिक व मानसिक स्वास्थ नक्कीच लाभते, तसेच स्वस्थ शरीर हे प्रगतीचे चे उगमस्थान आहे.  १) पुर्वेस डोके व पश्चिमेस पाय - असे झोपल्यास आपल्या शरिरात जेवढी झोप आवश्यक आहे तेवढीच झोप मिळते. ( उत्तम )  २) दक्षिणेस डोके व उत्तरेस पाय - असे झोपल्यास शारिरीक व मानसिक स्वास्थ लाभतेच शिवाय अतिशय गाढ जोप लागते. ( सर्वोत्तम )  ३) पश्चिमेस डोके व पुर्वेस पाय - असे झोपल्यास व्यक्ती नेहमी, काहिना काही चिंतेत - तणावात जोपतो तसेच तणावातच उठतो, हे मानसिक दुर्बलता तसेच आर्थिक बाजु कमकुवत करू शकते. ( सामान्य )  ४) उत्तरेस डोके व दक्षिणेस पाय - असे झोपल्यास शारिरीक त्रास - मानसिक त्रास - भय - चिंता - दडपण - तसेच आर्थिक दुर्बलतेचे प्रतिक मानले जाते. ( असे झोपु नये )  # येणार्या पुढील भागांत ४ उपदिशेचे महत्व जाणुन घेऊया !!   ह्या बद्दल शास्त्रीय कारण काय आहे, हे देखील सांगितले जाईल  टिप - आजारी व्यक्तीने पर्याय २ प्रमाणे झोप...

कडुलिंबाचाजीवन रस- घरगुती उपचार

 घरगुती उपचार  आपल्या सर्वांना माहित असेल असा सरळ व सोपा उपाय, म्हणजे कडुलिंब.. होय मित्रांनो ज्यांना पण अंगात खाज येणे, त्वचारोग, जळजळ होणे, पोटदुखणे, ताप येणे, पित्त होणे, डोके दुखणे, शुगर असणे, पोटात जंत असणे... असे अनेक आजारावर एक रामबाण घरगुती औषध - कडुलिंब होय.  रोज सकाळी एकदा कडुलिंबाचा ताजा व स्वच्छ पाला धुऊन घ्या, साधारण एक चहाचा कप होईल इतका, मिक्सर मध्ये थोडे पाणि व पाला टाकुन ज्युस करा व कपामध्ये गाळून घ्या व त्यावर अगदी थोडे मीठ टाकुन ते पिऊन घ्या, ( यावर पाणि साखर वगैरे घेऊ नये ) त्यानंतर १ तास काही घेऊ नये, फक्त ५ ते ६ दिवस नियमित घ्या, त्यानंतर गरज असल्यास १५ दिवसानंतर परत हाच प्रयोग करावा. सलग १५ दिवस घेऊ नये, त्याचे काही वयोमर्यादेनुसार नियम असतात. *५ ते ६ दिवस सर्वांसाठी चालेल .*   वैद्य विश्राम माळकोळीकर ,  श्रीराम आयुर्वेदिक   7350911888,9420242484  निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

उपवासाचे महत्त्व

 उपास ? उपवास ? की उपाशन  ??  एकादशी दुप्पट खाशी... आज माझं व्रत आणि दिवसभर चरतं... सुट्टी कशासाठी असते हो ? काम करुन थकलेल्या शरीराला विश्रांती मिळावी म्हणून , राहीलेली कामे करता यावीत म्हणून..... अनुशेष भरुन काढणे बॅकलॉग भरुन काढणे !   पचनसंस्थेला विश्रांती मिळावी म्हणून उपवास =>  अर्थात्‌ उपवास स्वरुपी लंघनाने अनेक आजार बरे होऊ शकतात ! मूळात कितीजण हा शास्रीय उद्देश सफल होऊ देतात का ? मूळात उपवास भूक सहन करणे जमते का ?  उपास शब्दच अयोग्य !  योग्य शब्द = उपाशन = उप +अशन  = नेहमीचे मुख्य जेवण सोडूण इतर हलके पदार्थ खाणे. नुसते भूकेले राहून शरीराचे शोषण हा उपवास नाहीच !  *दूध, तूप, मध, पाणी, फळ , कंदमूळ, इ. लघु आहार अपेक्षित सत्वगुणप्रधान  दही, केळी, रताळी*,  म्हणून पचन विलंबाने  म्हणून एकदा खाल्ल की लवकर भूक लागणार नाही  म्हणजे भूकेचे व्यवधान नको व जप तप होण्यासाठी... पण संसारी माणसासाठी नको ! त्याने जडपणा व सुस्ती येणार !  आजचे उपवासाचे पदार्थ काय आहेत ????  साबुदाणा, बटाटे, शेंगदाणे, वनस्पतीतूप, मिरची, ...

आपटा - अत्यंत बहुगुणी औषधी वनस्पती

 दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही आपट्याची पाने किती गुणकारी आहेत, याची माहिती करुन घेऊया. आपटा ही एक अत्यंत बहुगुणी औषधी वनस्पती असून या झाडाची पाने, शेंगांच्या बिया, फुले, साल औषध म्हणून वापरली जाते. आपट्याच्या सालीपासून दोरखंडही बनवले जातात. तसेच आपट्याच्या झाडापासून डिंकही मिळतो. आपट्याला ' अश्मंतक ' म्हणूनही ओळखले जाते. 'अश्मंतक' म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. अशा या आपट्याची मुळे जमिनीत खोलवर रुजतात. ही मुळे खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक फुटतात. त्यामुळे खडकाळ, उघड्या टेकड्यांवर हमखास आपट्याच्या झाडाची लागवड केली जाते. तसेच ' अश्मंतक ' याचा दुसरा अर्थ मुतखडा होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा. धन्वंतरीने 'निघण्टू'मध्ये आपट्याच्या झाडाचे आणखी औषधी उपयोग विशद केले आहेत.    अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण ।   इष्टानां दर्शनं देही कुरू शत्रुविनाशनम् ॥  या श्लोकानुसार, आपट्याचे झाड हे महावृक्ष असून ते अनेक महादोषांच्या निवारणाचे काम करते. इष्ट(देवतेचे) दर्शन घडवितो व शत्रूंचा विनाश करतो. अशाप्रकारे पुराणांमध्ये आणि आयुर्वेदातही आप...

तेजोवलय- Positive Energy

 तेजोवलय  आपण आपले तेजोवलय खालील उपायांनी  रोजच्या रोज शुद्ध ठेऊ शकतो.   1 . मीठाचा वापर  हा फार छान त्वरित results देणारा उपाय आहे. बाजारात खडा मीठ (sea salt) मिळतं.  अतिशय स्वस्त असतं आणि सहज उपलब्ध आहे. नाहीच मिळालं तर साधं मिठ सुधा चालेल.  मिठामधे नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची मोठी शक्ती आहे.  घरात खूप कलह, वादविवाद चाललेत, आजारपणं संपत नाहीयेत, नकारात्मकता जाणवतेय, अडचणी येतायत, किंवा यापैकी काहीही नसल्यास प्रतिबंधात्मक म्हणून रोज सुद्धा.. हे मीठ काचेच्या छोट्या छोट्या बाऊल्स मधे भरून घरात/ ऑफिसमधे प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात ठेवा. आजारी माणसाच्या उशाशी, पायाशी ठेवा. जर नकारात्मक ऊर्जा असेल तर मिठाला लगेच पाणी सुटेल, ते काळं पडेल, किंवा खराब होईल. आशा वेळेस ते इतरत्र कुठेही न सांडवता टॉयलेट मधे टाकून द्या. कमीतकमी 3 महिने हा उपाय सतत करत राहावा. मिठाच्या पाण्याने रोज लादी ही पुसू शकता. जेव्हा कधी खूप depress किंवा अकारण उदास, दुःखी, एकटेपणा, भीती, किंवा कसलं वाईट वाटत असेल त्या वेळेस दोन्ही मुठीं मधे खडा मीठ घ्या, आणि दोन्ही पाय साधारण ग...

वात, पित्त, कफ आयुर्वेदिक उपाय

 आयुर्वेदामध्ये तीन प्रकारच्या  प्रकृती सांगितल्या आहेत वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती       वात  प्रकृती  * शरीराची शरीराची ठेवण उंच व बारीक . * राठ व जाड केस. * लहान व ठिसूळ हाडे * खरखरीत,  रुक्ष, काळपट व फुटणारी त्वचा . * सहज दिसणाऱ्या शिरा. * जलद व अस्थिर हालचाली. * कर्कश किंवा घोगरा आवाज. * धांदरट स्वभाव . वातदोष असंतुलित झाला असता,  मानसिक व चेतासंस्थेचा त्रास होऊ शकतो, वजन खूप वाढते वा कमी होते, रक्ताभिसरणाचे समस्या येऊ शकतात.   अपथ्य   मटार ,हरभरा ,पावटा,चवळी,राजमा, उडीद,कोबी, फ्लॉवर, अळू, कच्चा कांदा, शिळे व कोरडे पदार्थ ,थंड पाणी, शीतपेये.  पित्तप्रकृती   * मध्यम व नाजुक अंगयष्टी. * मऊ शिथिल व मस्से असणारी त्वचा. * लालसर, पिवळसर चेहरा. * पिंगट रंगाचे व लवकर गळणारे केस. * पिंगट ,लालसर डोळे. * जास्त घाम येण्याची सवय. * तहान व भुकेचे प्रमाण अधिक. * हुशार, सरळ - साधा स्वभाव. * चटकन राग येण्याचा स्वभाव . * तीव्र भावना.   पित्त दोष असंतुलित झाला असता, शरीरातून वाफा निघाल्याची भावना होते, तसेच त्व...

जलसंजीवनी - एक दिव्य औषध* .

 जलसंजीवनी - एक दिव्य औषध* . पाणी हे एक दिव्य अद्भुत औषध आहे.  बेशुद्धाला शुद्धीवर आणण्यासाठी पाणी. अंतिम समयी पाणी. तहान लागली की पाणी. काही सुचत नसले की पाणी. हात पाय धुवायला पाणी. आंघोळीसाठी सप्त नद्यांचे पाणी. बाहेरून आलेल्याचे स्वागत करायला पाणी. अन्न शिजवायला पाणी प्रोक्षण करण्यासाठी पाणी कपडे धुवायला पाणी. भांडी घासायला पाणी. शरीर अवयव स्वच्छ करायला पाणीच. मल मूत्र विसर्जनानंतर पाणी. औषधं, गोळ्या घ्यायला पाणी.  शाप देण्यासाठी अभिमंत्रण करण्यासाठी किंवा आशीर्वाद देण्यासाठी फक्त पाणीच वापरले जाते. प्रकुपित झालेला अग्नि, अग्नीचा दाह कमी करायला पाणी !  शरीर आणि मन यांच्या अंतर्बाह्य शांततेसाठी पाणीच.  थकलेल्या जीवाला पाणी. घाबरलेल्या जीवाला पाणी. दमलेल्या जीवाला पाणी जिथे पाणी हवे तिथे पाणीच !  दुसरं काहीही चालत नाही. माणसं चंद्रावर, मंगळावर चालली आहेत. का कशासाठी?  पाणीच शोधायला.  कारण पाणी हेच जीवन आहे. पाण्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. देवाच्या अभिषेकाचे पाणी तीर्थ म्हणून आपण प्राशन करतो. आचमन करताना तीन पळ्या पाणीच. आणि जेवण संपल्यावर एक पळीभर प...