Posts

Showing posts from August, 2021

सोयरासिस (अ‍ॅक्ने) सारख्या त्वचाविकारांवर परिणामकारक आयुर्वेदीक उपाय

 सोयरासिस (अ‍ॅक्ने) सारख्या त्वचाविकारांवर परिणामकारक आयुर्वेदीक उपाय रक्तामधील अशुद्धीमुळे अ‍ॅक्नेचा त्रास अधिक वाढतो. म्हणूनच ब्रेकआऊटचा त्रास कमी करण्यासाठी रक्तशुद्धीचा पर्याय सर्वप्रथम सुचवला जातो. रक्तासोबत शरीरात टाकाऊ घटक आणि कार्बन डायऑक्साईडचादेखील प्रवाह होतो. त्यामुळे या घातक घटकांना बाहेर काढणे आवश्यक असते.  काही नैसगिक उपायांनी रक्तातील अशुद्धता कमी करण्यास मदत होते. यामुळे सोयरासिस, गजकर्ण (eczema)यासारखे अनेक त्वचाविकार कमी करण्यास मदत होते. फळं :   संत्री, रास्पबेरी, किवी, अ‍ॅव्हॅकॅडो, द्राक्षं या सारखी मुबलक पाण्याचा समावेश असणारी फळं आहारात घ्या. यामध्ये रक्त शुद्ध करण्याची क्षमता असते. यामुळे त्वचा तजेलदार होते. हर्बल टी :   चहा पिणे चांगले की वाईट हा अनेकांसाठी वादाचा मुद्दा आहे. मात्र त्यामध्ये काही हर्ब्स मिसळल्यास शरीरातील घातक घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. काही हर्बल टी पसंतीनुसार घरी बनवता येतात. आलं, पेपरमिंट  हर्बल टी घरी देखील बनवता येतात. हर्ब्स - : पळस, बदाम, अळशी, बभूळ  यांची पानं नैसर्गिकरित्या औषधी असतात. यामुळे र...

निरोगी राहण्याकरिता घरगुती उपचार

Image
  निरोगी राहण्याकरिता घरगुती उपचार  आज थोडा वेगळ्या विषयावर माजा स्वताचा आलेला अनुभव आपणां सर्वांन सोबत शेअर करत आहे, शक्य असल्यास करून बघा, गुण आल्यास मानव सेवेचे कार्य करा.  ( फक्त १ चिमूट ) आंघोळीच्या पाण्या सोबत काय टाकल्याने काय फरक पडतो हे करून पहा, हा प्रयोग २१ दिवस नियमित करावा.  🔘पाण्यात भीमसेन कापुर टाकल्यास अंग हळवे होते, थकवा जातो, पित्त कमी होते. 🔘हळद टाकल्यास त्वचेचे विकार थांबण्यास मदत होते, शिवाय मन व शरीर स्वस्थ राहते. 🔘भिमसेन कापुर व हळद टाकल्यास, केस गळणे कमी होते, जखम असल्यास लवकर बरी होण्यास मदत होते. 🔘खस पावडर व हळद टाकल्यास शरीरास थंडावा मिळतो. 🔘केसर व गुलाब पाणि टाकल्यास सर्दी कमी होण्यास मदत होते. 🔘लैंगीक समस्या स्री/पुरूष वेलची व लवंग पावडर करून टाकावी.  🔘मानसिक आजार असल्यास चिंचपावडर व गुलाब पाणि टाकावे, विचार कमी होतात.  🔘त्वचारोग असल्यास लिंबाचा पाला व खडेमिठ टाकावे.  🔘आर्थिक समस्या असल्यास भिमसेन कापुर, खस पावडर, व हळद टाकावी ( ४० दिवस ) पहिल्या दिवसापासुन फरक पडतो.  अजुन अनेक समस्यांवर आंघोळीच्या पाण्यात चिम...

अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Image
  अंजीर खाण्याचे  आरोग्यदायी  फायदे                 अंजीर मध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. अंजीर थंड असले तरी ते पचण्यास थोडे जड असते. हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये किंवा मिठाईमध्ये वापरले जाते. पण सुक्या अंजीरपेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते. ताज्या अंजीराच्या सेवनानं पोषक घटक जास्त प्रमाणात मिळतात, तर सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात.    अंजीर खाण्याचे फायदे : १) अंजीर पित्त विकार, रक्त विकार, वात व कफ विकार दूर करणारे आहे. ताज्या अंजीरामध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असतात, तर सुक्या अंजीरामध्ये अनेक प्रकाराचे उपयोगी क्षार आणि जीवनसत्त्वे असतात. २) अंजीरात लोह घटक अधिक असतो. यामुळे आमाशय जास्त क्रियाशील बनते; त्यामुळे भूक फार लागते म्हणूनच रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) या आजारामध्ये अंजीर सेवन करावे. अंजीरामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत राहण्य...

मणिपूर चक्र आणि रामरक्षा

  मणिपूर चक्र आणि रामरक्षा--- एक अभ्यास!  हे चक्र नाभिस्थानाजवळ असते. ह्याला दहा पाकळ्या असून सत्वगुणात्मक सृष्टीचे पालन करणारा विष्णु याची अधिष्ठात्री देवता आहे. २) शरीराचा मध्य बिंदू अर्थात गुरुत्वमध्य ह्याच चक्रात असतो.  ३) ह्या चक्रावर धारणा केल्याने चित्तात सत्वगुण वाढून ते स्थिर होऊ लागते. ४) धारणा म्हणजे काय? चित्ताची स्थिरता म्हणजे धारणा... धारणा, ध्यान आणि समाधी या तीन्ही भिन्न गोष्टी आहेत. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर धारणा म्हणजे concentration... किंवा एकाग्रता ५) चित्त शरीरांतील एखाद्या भागावर स्थिर ठेवण्याचा अभ्यास करणे म्हणजे धारणेचा अभ्यास करणे होय ६) महत्त्वाचं--- एकदा आपल्याला आपल्या चक्रांचं शरीरातील स्थान माहीत झाले की त्या स्थानावर धारणा केली (त्या स्थानावर आपलं चित्त एकाग्र केलं) की त्या चक्रावर ती धारणा केली असं म्हणतात. ७) ज्या नाडीचक्रावर आपण चित्त स्थिर केलं (धारणा केली) की त्या चक्रांतील नाड्यांचे आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे व्यापार सुसूत्रपणे चालू लागतात. उदाहरणार्थ , आपल्या शरीरातील खालील अवयव/ग्रंथी मणिपूर चक्राच्या नियंत्...

खडीसाखर खाण्याचे फायदे

Image
 सतत थकवा येतो?  मग खडीसाखर खाण्याचे हे फायदे नक्की घ्या जाणून...            खडीसाखर प्रत्येकाच्या घरी असतेच. खडीसाखरेचे खडे हे ओबढधोबड आकाराचे असतात. रिफाईंड साखरेपेक्षा कमी गोड असलेली खडी साखर तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. शिवाय आयुर्वेद शास्त्रातील अनेक औषधांमध्ये खडीसाखरेचा वापर केला जातो. रिफांईड साखर खाणं जरी आरोग्यासाठी हितकारक नसलं तरी खडीसाखर मात्र काही प्रमाणात खाण्यास काहीच हरकत नाही. शिवाय खडीसाखरेत रिफांईड साखरेपेक्षा कमी प्रमाणात कॅलरिज असतात.  * कोणताही गोड पदार्थ करायचा असला की साधारणपणे गुळ, साखर यांचा वापर सर्रास केला जातो. परंतु, कोणत्याही पदार्थाचं अतिरिक्त सेवन योग्य नाही असं देखील म्हटलं जातं. * हि गोष्ट गोड पदार्थांच्या बाबतीतही लागू होतं. कोणताही गोड पदार्थ जास्त खाल्ला की त्याचा त्रास हा जाणवूच लागतो. त्यामुळे गोड पदार्थ हे कायम नियंत्रणात खावे.  मात्र, काही गोड पदार्थने अनेक  शारीरिक तक्रारी दूर होतात. * खडीसाखर खाण्याचे फायदे :  ▪ जुनाट खोकला असेल तर खडीसाखर खाल्ल्यामुळे तो बरा होतो. ▪ हिमोग्ल...

जवस खाण्याचे महत्त्व

Image
 जवस घेण्याचे महत्त्व   यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी, कानडीत अल्सी आणि आलसी आणि संस्कृतमध्ये अलसी, अतसी, अतसिका, हैमवती, मदगंधा, मलीना, तैलोत्तमा, नीलपुष्पी, उमा किंवा क्षुमा म्हणतात. जवसाचे तेल वापरून तैलरंग, व्हॉर्निश, सौम्य साबण, छपाईची शाई वगैरे बनते. वंगणे, मलमे आणि चामड्याचे पॉलिशसाठीही अळशीच्या तेलाचा उपयोग होतो. तेल काढून उरलेली पेंड, गुरांच्या सकस खाद्यासाठी अणि खत म्हणून वापरतात. पशुवैद्य या तेलाचा उपयोग दुभती जनावरे आणि घोडे यांच्याकरिता रेचक म्हणून करतात. बियांच्या वापराने पित्तभावना, पाठदुखी आणि दाह-क्षोभ आदी कमी होते. व्रण आणि लघवीच्या त्रासावर गुणकारी. खोकल्यावर आणि मूत्रपिंडाच्या विकारांवर आराम पडण्यासाठी जवसाच्या बिया चांगल्या असतात. साल आणि पाने परम्यासाठी उपयोगी, तर जाळलेली साल भळभळ वाहणारे रक्त थांबवते आणि जखमा भरण्यास उपयोगी पडते. फुले मेंदू आणि हृदयासाठी पौष्टिक. युनानी वैद्य अंतर्गत जखमांसाठी बियांचे सेवन करण्यास सांगतात तर त्याच बियांचा गजकर्णादी वापर त्वचारोगांवर बाह्योपचाराने करतात. चुन्याच्या निवळीत मिसळलेले तेल हा कातडीच्...

सब्जाचे बी खाण्याचे फायदे !

Image
चिया सीड्स किंवा सब्जाचे बी खाण्याचे फायदे ! सब्जा म्हणजे चिया सीड्स हे भारतीय तुळशीचा एक प्रकाराचा असलेल्या वनस्पतीपासून मिळणारे बी आहे. सब्जाचे अनेक आयुर्वेदिक औषधी फायदे आहेत. प्राचीन काळापासून अंगातील उष्णता कमी करण्यासाठी सब्जाच्या बियांचा वापर केला जातो. सब्जाच्या बियांना फालुदा बीज,  तुक्मरिया बीज, गोड तुळशीचे बी (Chia Seeds In Marathi) असे देखील म्हटले जाते!  सब्जा हे मुळात भारतीय तुळशीच्या संवर्गातील वनस्पतीचा एक प्रकार आहे.   सब्जा (Chia Seeds In Marathi) चे आरोग्यासाठी होणारे फायदे  सब्जामध्ये अनेक पौष्टिक तत्वे आहेत. सब्जामध्ये उच्च प्रतीचे फायबर, ओमेगा थ्री फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात आहे. सब्जाच्या बियांमध्ये फायटोकेमिकल्स आहेत तसेच पॉलीफेनोलिक फ्लैवोनोईड्स जसे ओरिएंटिन, विसिनीन अशा प्रकारचे अँटीऑक्सीडेंट देखील आहेत. सब्जामध्ये नैसर्गिक तेल देखील आढळते. यामध्ये सायट्रल, लिमोनेन, युजीनॉल,सायट्रोनेलोल, टेरपीनॉल असे नैसर्गिक तेल देखील आढळते. सब्जा हे  विटामिन ए आणि विटामिन के चा उच्च स्त्रोत आहे. सब्जामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ल्युटिन, जीएक्सॅथिन, ब...

तुप व तुपाचे महत्त्व- घरगुती उपचार

Image
  तुप व तुपाचे महत्त्व- घरगुती उपचार  आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात एक संजीवनी सारखे व उपयोगात येणारे, सर्वगुण संपन्न, तसेच पौष्टिक व अत्यंत गुणकारी, दिव्यापासून - उपचारापर्यंत सर्वत्र कामी येणारा पदार्थ म्हणजे तुप … घरगुती व त्यात हि गाईचे असल्यास सर्वोत्तम असे तुपाचे अनेक गुण आहेत, कोणत्याही आजारास तुप चालते, पचन शक्ती सुधारते, मधुमेहास थांबवते, बुध्दी - स्मरणशक्ती वाढवते. तुप कसे घ्यावे - याची अत्यंत सोपी पण चमत्कारिक पध्दत आपणांस सुचवत आहे !!  # दररोज सकाळी अनोश्यापोटी १ चमचा तुप तसेच घ्यावे, त्यावर १ तास काही घेऊ नये,  कॅालेस्ट्रोल + डायाबीटीस + बीपी + चरबी + पोटाचे विकार + पोट साफ न होणे + मुळव्याध + त्वचेचे विकार + अशक्तपणा + वंधव्य ह्या व यांशिवाय अनेक त्रासांवर फक्त १ चमचा तुप नियमित घेतल्यास त्याचे परिणाम हे काही दिवसातच जाणवतात.  तसेच जेवणात वरून अर्धाचमचा तुप घेतल्यास जेवण लवकर पचते. गुळ + तुप घेतल्यास हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. अंगावर पित्त उठणे - खाजवणे यांवर तुप लावल्यास त्रास थांबतो.  रोज देवघरात - तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्यास आर्थिक बा...

अंधारी येणे- घरगुती उपचार

 घरगुती उपचार  चालताना, उठतांना, बसतांना, काही कामात मग्न असतांना कधीकधी डोळ्यांना अचानक अंधारी येते, डोके जड होते, छाती भरल्यासारखी होते व डोक्यात कळा येतात असे केव्हातरी किंवा वारंवार होत असेल तर काही घरगुती उपायाने आपल्याला २ दिवसात त्यातुंन आराम मिळु शकतो.  थोडीशी काळेमिरीची पावडर, मिठ व लिंबु एक ग्लास पाण्यात टाकुन पिल्यास लगेच आराम होतो.  शेवग्याची शिंग पाण्यात २ तास भिजवुन नंतर गरम करून त्याचे पाणि पिल्यास आराम होतो.  मोसंबीचा ज्युस व कोथींबीर एकत्र करून ग्लासभर घेतल्यास आराम होतो.  ग्लासभर पाण्यात तांब्याचे नाणे टाकुन पिताना २ थेंब लिंबु टाकुन पिल्यास आराम होतो.  बीट व ड्रॅगन फळाचे ज्युस घेतल्यास वारंवार होणारा त्रास थांबतो. चालताना अचानक अंधारी आल्यास त्वरीत ५ पावले मागे यावे व बसावे त्रास लगेच थांबतो.  चक्कर येत असल्यास एका पायाचा तळपाय दुसर्या पायावर ठेवुन ऊभे राहिल्यास चक्कर थांबते.  दोन्ही हाताचे पंजे एकमेकांना जोरात घासुन जी ऊब तयार होते ती डोळ्यांवर लावल्यास चक्कर, मळमळ थांबते.  ३ वेळेस जोरात तोंडावाटे हवा बाहेर फेकल्यास अ...

नाभी किंवा बेंबी वर तूप लावण्याचे फायदे

 बेंबी मध्ये तेल घातल्याने कुठले फायदे होतात? गुडघेदुखी , सर्दीपडसे तसेच त्वचाविकार. यामुळे त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी बेंबीजवळ वेगवेगळ्या तेलांपैकी विशिष्ट तेल लावून झोपले तर अक्षरशः चमत्कारीक फायदे दिसतात. ही तेले नेहमी आपल्याकडे असतात. पण बेंबी मध्ये दोन तीन थेंब टाकून, बेंबीच्या जवळ फक्त दोन तीन थेंब लावून झोपल्यास बरेच विकार चुटकीसरशी दूर होऊ शकतात. मात्र कोणत्या तेलामुळे कोणते रोग बरे होतात त्याची माहिती फारशी कुणाला नसते. 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 1)सांधेदुखी असेल, ओठ फाटले असतील तर सरसोंचे (मोहरी)तेल घेऊन त्याचे दोन तीन थेंब बेंबीत टाकावेत,दोन थेंब बेंबीजवळ लावायचे. हा उपाय करताना थोडा चमत्कारीक वाटेल खरा, पण तो प्राचीन उपाय आहे. त्यामुळे सांधेदुखी आणि ओठ फाटने कायमचे बरे होईल. 2. ). सर्दी-पडसे तर कधीही होते. काहीही केलं तरी सर्दी बरी होत नाही. पण अशावेळी कापसाचा बोळा अल्कोहोलमध्ये (homeopathy remedies). बुडवून तो आपल्या बेंबीजवळ फिरवायचा.सर्दीपडशावर हा रामबाण इलाज आहे. करून पहाच एकदा. जुन्यातील जुनी सर्दीही या लहानशा उपायाने बरी होते. 3) मुलगी असो की मुलं तारुण्यात चेहऱ्यावर...

थायरॉईड ग्रंथीचे आजार-घरगुती उपाय

 थायरॉईड ग्रंथीचे आजार कशामुळे होतात, त्यात घेण्याची काळजी आणि घरगुती उपाय थायरॉईड कशामुळे होतो, त्याचे कोणते प्रकार असतात आणि त्यात कोणती काळजी घ्यायची हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा आपल्या शरीरात होणाऱ्या चयापचय क्रियेला लागणाऱ्या थायरॉक्सीन या होर्मोनची निर्मिती आपल्या थायरॉईड या ग्रंथीमध्ये होते. थायरॉईड ग्रंथी आपल्या गळ्याच्या खालच्या बाजूला असते. दोन भिवयांच्या मध्ये असलेली पिटयुटरी ग्रंथी ही थायरॉईड स्टीम्यूलेटिंग हार्मोनचे (TSH) उत्पादन करते. ज्यामुळे आपल्या थायरॉईड ग्राठी थायरॉक्सीन या हार्मोनचे उत्पादन होते. सर्वसाधारणपणे या ग्रंथीत आपल्या शरीराला लागेल, गरज असेल तेवढेच हार्मोन निर्माण केले जाते ज्यामुळे आपली चयापचय क्रिया, म्हणजेच मेटाबॉलीझम योग्य तऱ्हेने पार पडते. कधीकधी काही कारणाने थायरॉईड ग्रंथी द्वारा होर्मोन्स खूप जास्त प्रमाणात स्त्रवली जातात तर कधी गरजेपेक्षा कमी प्रमाणात. यामुळे थायरॉईड ग्रंथीच्या समस्या सुरु होतात.  याची विभागणी मुख्यत: दोन प्रकारात केली जाते.  १. * हायपरथायरॉईडीझम* – या प्रकारात थायरॉईड ग्रंथी ही होर्मोनचे उत्पादन गरजे...

“शतावरी” -शंभर फायदे

Image
मित्रांनो, आपल्या शेताच्या आजूबाजूला किंव्हा जंगलाशेजारी बरेचदा आपल्याला शतावरीचे छोटे झुडूप बघायला मिडते, तसेच विधर्भामध्ये तान्हा पोळ्याच्या दिवशी शेतातून किंव्हा जंगलातून आणून एकमेकांच्या घरी जाऊन भिंतीवर खोचतात आणि भोजारा (पैसे) मागतात, अशी परंपरा चालत आली आहे. ती शतावरी आपल्या जीवनात खूप महत्वाची वनस्पती आहे. आपण घरगुती पद्धतीने त्याचे कल्प / पावडर तयार करून सेवन केल्यास खूप सारे आपल्या आरोग्यास फायदे आहेत. बाजारात खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ब्रांडनी ते खूप जास्त किमतीत उपलब्ध केलेली आहेत. ती आपल्याला शुद्ध रुपात शेतावर, किव्हा आजूबाजूला उपलब्ध होऊ शकते. शतावरी कल्पाचे शंभर फायदे आहेत. त्यातील काही खालील प्रमाणे : 1. शतावरी एक उत्तम औषध असून, स्त्रियांच्या प्रजनन संबंधित अवयवांसाठीही उपयुक्त आहे. 2. बहुतांश महिलाना मासिक पाळी येण्यापूर्वी खूप त्रास होतो. पाळीदरम्यान पोट दुखणे, पाठ दुखणे किंवा डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवत असतील तर शतावरी घेतल्यास नक्कीच लाभदायक ठरेल.  3. स्मरणशक्ती कमी होणे तसेच रजोनिवृत्तीच्या काळात जळजळ होणे आदि समस्यांवर उपाय म्हणून शतावरी वापरता येते....

पोटात किंवा ओटीपोटात दुखणे- घरगुती उपचार

 घरगुती उपचार  नमस्कार मित्रांनो 🙏🏼 आजच्या धावपळीच्या युगात सामान्यता माणसाला ना जेवायला वेळ ना बसायला वेळ, पण आपल्या शरीराचे पण काही नियम असतात ते आपण विसरतो आणि मग हळुहळु त्रास व्हायला सुरवात होते, तर असाच एक छोटा उपाय पण अत्यंत गुणकारी आहे.  आपल्याला अचानक पोटात किंवा ओटीपोटात दुखते, काहीवेळेस असह्य वेदना होतात, सामान्यता घरातील स्रीयांना जास्त त्रास असतो कारण सतत धावपळ होत असते, अचानक काही जड वस्तू उचलने, वाकने, उभे राहुन पाणि पीणे असे प्रकार होत असतात व लक्षात येत नाहीत, त्याला आपल्या सोप्या भाषेत नळ भरला असे देखील म्हणतात.  एक कपभर पाणि घ्या त्यात एक चमचा तुप टाका व चहा सारखे गरम जाले कि त्यात चिमूटभर मीठ टाका व गरम असेपर्यंत प्या, साधारण दिवसातून २ वेळेस घेतले कि त्रास थांबतो, २ दिवस नियमित घ्या.  निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼 संधर्भ-  वैद्य श्री. माळाकोळीकर,  नाडी परीक्षण तज्ञ श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ.   मोबाईल क्रमांक- 7350911888 अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

निरोगी आयुष्य जगण्याकरिता घरगुती उपचार

निरोगी आयुष्य जगण्याकरिता घरगुती उपचार  आठवड्यातुन किमान एकवेळेस फक्त एक कपभर खालील ज्युस घेतल्यास कोणत्याही औषधाची गरज पडणार नाही.  ♻️ कोथींबीर चे ज्युस त्यात थोडे काळेमिठ. ♻️ पालक + कोथींबीर + मेथी + लिंबुचे ४ थेंब.  ♻️ कांद्याची पात + एक लसुण पाकळी. ♻️ पत्ताकोबी + पालक + अर्धा लिंबु. ♻️ कडुलिंब + थोडेसे मिठ ( अनोश्या पोटी )  ♻️ गाजर + बीट + पालक. ♻️ कारले + गाजर + १ खारिक. ♻️ दुधी भोपळा + कोबी + मेथी.  ♻️ कडीपत्ता + कोथींबीर + लिंबु + काळेमिठ. ♻️ शेपु + मेथी + पालक + काळेमिठ + लिंबु. ♻️ जीरे + पत्ताकोबी + लिंबु. ♻️ शेवग्याचा पाला + काळेमिठ + लिंबु वरील पैकि कोणतेही ज्युस घेऊ शकतो, रोज वेगवेगळे घेतल्यास उत्तम, आपल्या शरिरास योग्य ते सर्व बाबी यातुन आपणांस सहज मिळु शकतात. जेवढे शक्य तेवढे घरगुती उपाय केल्यास बर्याच अंशी फरक त्वरीत जाणवतो, लहान मुलांना व स्रीयांना अत्यंत उपयुक्त.  15 दिवसासातून एकदा कोथिंबीर चा रस कपभर घेणे सोबत चंद्रप्रभा वटी,2-2 घेणे एक महिना व Ural Alk 1 दिवसातून एकदा घेणे दोन महिने , असं होणं सांगत आहे शरीर की आपल्या शरीरात uric acid वा...

हात भाजणे- घरगुती उपाय

Image
  प्रश्न-  पंधरा दिवसापूर्वी हात तेलाने भाजला होता.हातावर भाजल्याचे व्रण तसेच आहेत. त्यासाठी काही रामबाण उपाय असेल तर सुचवा. वय पाच वर्ष. वैधराज यांचे उत्तर- त्यासाठी उपचार आहे युनानी औषध  लुकमाणे हयात तैल कोणत्याही मेडिकल मध्ये मध्ये मिळते, आपणास कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल तर म्हणजे कापले, भाजले ,पोळले, मार लागून जखम झाली तरी 3-४ दिवसात लागलीच आराम मिळतो, घरात नेहमीच आसवे असे औषध म्हणून लुकमाणे हयात तेल युनानी आहे पण 100% गुणकारी संधर्भ-  वैद्य श्री. माळाकोळीकर,  नाडी परीक्षण तज्ञ श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ.   मोबाईल क्रमांक- 7350911888 अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

लघुशंका / लघवीला त्रास- घरगुती उपचार

लघुशंका / लघवीला त्रास- घरगुती उपचार  लघवीला त्रास होणे, जळजळ, कमी होणे, जास्त होणे, थोड्या - थोड्या वेळाने वारंवार जाणे, लघवीला वास येणे, लघवी होतांना दुखणे… असे बरेच त्रास होण्याचे प्रमुख कारण म्हणजे लघवीला आल्यावर लघवी थांबवने, बर्याच वेळाने जाणे. ह्या कारणाने मग हळुहळु त्रास सुरू होतो व नंतर त्याचे आजारात रूपांतर होते. लघवी होणे हि एक शारिरीक व नैसर्गिक क्रिया आहे, आपले शरिर हे जेवढे पोषक तत्वे हवी आहेत तेवढे घेऊन ज्यामधुन शरिरास हानी होईल अशी तत्वे लवघी वाटे, घामा वाटे, शौचावाटे बाहेर टाकते, त्यास जर मज्जाव केला तर शरिरात इतर आजारास वाढ होण्यास मदत होते म्हणुन कधीही कुठेही केव्हाही लघवी किंवा शौचास आल्यास वेळ लावु नये. त्याने शरिर निरोगी राहतेच शिवाय आजार होत नाही. काही १००% घरगुती उपचार सुचवत आहे ज्यांना याचा त्रास आहे त्यांनी करून पहा व निरोगी रहा.  🔹दिवसातुन किमान एकदा ताक घ्यावी, आंबट नसावी व शक्यतो दुपारी घ्यावी.  🔹 ताकावरील जे पाणि असते त्यास ताकपरास म्हणतात, लघवीला होणार्या कोणत्याही समस्येवर ते पाणि अत्यंत गुणकारी असते, अंगावरील सुज पण त्याने उतरते. 🔹 तुरट...

उंबर -औषधी उपयोग

Image
  उंबर -औषधी उपयोग 1)लहान मुलांमध्ये गाल सुजली असता त्यावर उंबराच्या चिकाचा जाड लेप लावावा. 2)कोणत्याही गाठी वर उंबराच्या चिकाचा लेप लावावा त्या गाठी कमी होतात. 3) लहान मुलांना आव झाली असेल तर उंबराच्या चिकाचे पाच ते सहा थेंब साखरेत एकत्र करून खाण्यास द्यावे. 4)उंबराच्या पानावरील फोड वाटून त्याची चटणी व मध साखर हे औषध दिवसातून दहा ते बारा वेळा घेतले असता तोंड आले आहे ते कमी होते. 5)उंबराची पिकलेली फळे खडीसाखर सोबत रोज सकाळी खाल्ल्यास शरीरातील उष्णता कमी होते. 6)सारखी तहान लागत असेल तर उंबराचे साल किंवा कच्ची फळे पाण्यात उगाळून दिली असता तहान कमी होते. 7)खोकला लागला असता उंबराचे चिक टाळूवर लावले असता खोकला कमी होतो. 8)लघवीची आग होणे, तिडीक लागणे ठणका,लघवीच्या जागेवरील जखम, इत्यादीवर उंबराच्या सालीचा काढा घेतला असता फायदा होतो.  9)उंबराच्या सालीच्या काढ्याने जखम धूतली असता ती लवकर बरी होते. 10)गोवर व कांजण्या या आजारांमध्ये उंबराच्या सालीचा फायदा होतो. 11)औदुंबर जल हे औषध पोटशूळ वरती उत्तम औषध आहे. दोन ते तीन थेंब औषध सकाळी व संध्याकाळी पाण्यातून घेतली असता उदर शूल कमी होते.उंबर...

बीट एक गुणकारी सलाद...!!

Image
  बीट एक गुणकारी सलाद...!! बीट म्हटलं की आपल्याला रक्त आठवतं. बीट खाल्याने रक्त वाढतं असा लहानपणी समज होता. तो पूर्णपणे चुकीचा नाही. बीट हे आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांवर गुणकारी आहे. जसे की उच्च रक्तदाब कमी, मधुमेह, स्मरणशक्ती, इत्यादी. बीटमध्ये आणखी काय काय गुणधर्म आहेत ज्याचा आपल्या आरोग्याला फायदा होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. आधी बीटमध्ये असलेल्या पोषक घटकांबद्दल जाणून घेऊया. बीटचा रंग लाल असतो कारण त्यात ‘बेटालिन’ हे रंगद्रव्य आढळतं. या गुणधर्मामुळे खाण्याचा रंग तयार करण्यासाठी बीटचा वापर होतो. १०० ग्राम बीटमध्ये ८७.५८ ग्राम पाणी आणि  ४३ कॅलरीज असतात.  आरोग्यासाठी फायदे १. रक्तदाब कमी होतो बीटमध्ये नायट्रेट असतं. नायट्रेट संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह सुरळीत करण्याचं काम करतं. नायट्रेट हे शरीरात जाऊन नायट्रिक ॲसिडमध्ये रुपांतरीत होतं. नायट्रिक ॲसिडमुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावत असल्यामुळे रक्तदाब वाढत नाही. रक्तदाब कमी करण्यासाठी बीटचा रस प्यायलास उत्तम. २. हृदयासाठी गुणकारी बीटमधला नायट्रेट हा घटक हृदयासाठी पण तेवढाच फायद्याचा असतो. हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका ...

पित्त, आंबट ढेकर, हायपर ॲसिडीटी ( अतिपित्त ) -घरगुती उपचार

Image
घरगुती उपचार  पित्त, आंबट ढेकर, हायपर ॲसिडीटी ( अतिपित्त )  यांवर काही परिणाम कारक उपाय आपल्या घरातच आहेत व ते आपण रोज वापरतो पण ते योग्य रितीने वापरले तर नक्कीच आपल्याला आराम पडतो.  रोज सकाळी अनोशा पोटी शुध्द तुप ( गरम न करता तसेच ) १ चमची घ्यावे त्यावर १ तास काही खाऊ पिऊ नये.  सायंकाळी १ चमची कच्ची सौफ, १ चमची खडीसाखर, १५ काळे मणुके, २ बदाम, थोडे सब्जा बी हे सर्व एक मोठ्या वाटी पाणि घेऊन भिजवावे व सकाळी तुप घेतल्यानंतर १ तासाने हे हळुहळु करून खावे व पाणि पिऊन घ्यावे.  दुपारी व रात्री जेवणाआधी १० मिनीटे, काळीमिरी ची पावडर थोडी, अर्धा लिंबु, व मिठ ग्लासभर पाण्यात टाकुन प्यावे.  एवढे नियमित रोज १५ दिवस केल्यास कितीही पित्त, हायपर ॲसिडीटी, गेस, अपचन वगैरे सर्व त्रास बंद होतात.  मित्रांनो हे सर्व उपाय आम्ही स्वता करतो फरक पडतो नंतर तुमचे बरोबर शेअर करतो, तरी हि प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते, फरक पडण्यास वेळ लागु शकतो, पण घरगुती उपायाने कधीच दुष्परिणाम होत नाही, सर्व रोगांचे मुळ कारण आपली पचन क्रिया असते, पचन क्रिया चांगली असेल व पोट साफ होत असे...

पित्ताशयातील खडे

 पित्ताशयातील खडे पित्ताशयातील खडय़ांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. काय आहेत त्यावरच्या उपाययोजना? बदलत्या जीवनशैलीमुळे आपले जीवनमान बदलले आहे. त्याच्या अनेक परिणामांपैकी एक म्हणजे पित्ताशयातील खडय़ांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. काय आहेत त्यावरच्या उपाययोजना? हल्ली बऱ्याचदा असे रुग्ण येतात की ज्यांनी इतर कोणत्या तरी कारणांसाठी पोटाची सोनोग्राफी केली असताना त्यांच्या पित्ताशयामध्ये खडे आहेत असे निदान केले गेलेले असते. म्हणूनच आपण हे खडे का व कसे तयार होतात, त्यामुळे काय त्रास होऊ शकतो, हे टाळता येणे शक्य आहे का व त्यावर काय उपाय उपलब्ध आहेत हे समजावून घेऊ या. पित्ताशयात खडे का होतात? आपल्या शरीरात पित्तरसाची निर्मिती ही यकृतामध्ये (लिव्हरमध्ये) होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला पित्ताशय (Gall bladder) नामक एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते, जिचे काम असते जास्त तयार झालेले पित्त साठवून ठेवणे व प्रत्येक जेवणाच्या वेळी ते पित्तनलिकेवाटे लहान आतडय़ात सोडणे. खाल्लेल्या अन्नाच्या पचनासाठी याची गरज असते. हे पित्त जेवणानंतर ठरावीक प्रमाणामध्ये पचनक्रियेसाठी हा पित्तरस लहान...

मोड आलेल्या कडधान्य- 'सुपरफूड'

Image
 मोड आलेल्या कडधान्याला 'सुपरफूड' असं म्हटलं जातं. कडधान्यात असलेल्या अनेक उपयुक्‍त घटकांमुळे शरीराला भरपूर फायदा होतो. त्यामुळे शरीर सुदृढ आणि आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर तुमच्या आहारात नियमित मोड आलेली कडधान्ये असालयाच हवीत. मोड आलेली कडधान्ये खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सर्वच प्रकारची कडधान्ये पचायला सारखी नसतात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी. त्यानंतर मूग आणि चवळी. नंतर उडीद आणि हरभरा, कडू वाल आणि पावटा हे पचायला सर्वात कठीण असतात. १: मोड आलेली कडधान्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आढळतात. 2 - मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्व असतं. 3 - मोड आलेलं कडधान्य खाल्ल्याने वातुळपणा कमी होतो.मोड आणल्यामुळे टॅनीन आणि फायटीक अ‍ॅसीड यांचे निरूपद्रवी द्रव्यात रूपांतर होतं. ज्यामुळे शरीराला चांगला फायदा होतो. 5 - मोड आणल्यामुळे कडधान्य हलकं होतं आणि सहज पचतं. मोड आलेली कडधान्ये वाळवल्यानंतर त्यातल्या कर्बोदकांचं आणि ‘क’ जीवनसत्वाचं प्रमाण वाढतंमोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांची पाचकता लक्षणीय वाढते. 8 - मोड ...

अंगात वात असणे, सुज येणे- घरगुती उपचार

  अंगात वात असणे, सुज येणे, भरपुर गॅस असणे, काहींना दिवसभर अंगाला सुज येते व रात्री नॉर्मल होते असे होत असेल तर आपल्या घरातील काळीमिरी यावर प्रभावी उपाय ठरू शकते.  रोज रात्री ३ किंवा ४ अख्खे काळीमिरी चे दाणे कोमट पाण्यासोबत गिळुन घ्या, असे १२ दिवस ते १६ दिवस नियमित घ्यावे, त्यानंतर परत गरज असल्यास १ महिन्यानंतर करावे.  काळेमिरी घेताना १ तास आधी जेवण करून घ्यावे, त्यानंतर जेवण वर्ज्य. ( फक्त पाणि चालेल ) निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼 संधर्भ-  वैद्य श्री. माळाकोळीकर,  नाडी परीक्षण तज्ञ श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ.   मोबाईल क्रमांक- 7350911888 अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

निरोगी दात - घरगुती उपचार

Image
निरोगी दात  आपले दात म्हणजे आरोग्याचा महामेरूच, जेवण व्यवस्थित चावुन खाल्यास पचन व्यवस्थित होते व पचनशक्ती चांगली असेल तर आरोग्य हे निश्चितच येते. दातांवरील काही समस्येवर घरगुती उपाय सुचवत आहे, करून पहा व निरोगी रहा.  🦷 दातदुखी  - लसणाची पाकळी दाताखाली ठेवल्यास ठणक येऊन दुखत असल्यास थांबते.  - तुळशीची पाने व काळेमिरी एकत्र बारीक करून त्याची गोळी करून दाताखाली दाबून धरल्यास वेदना थांबतात. 🦷 दाताची किडे  - तुळशीच्या पानांचा रस करून त्यात थोडासा कापुर टाकुन ते दातांवर ठेवल्यास किडे मरतात.  - सकाळी अनोश्यापोटी पालक चा रस करून त्याची चुळ भरावी तसेच तो रस थोडा वेळ ठेवुण प्यावा, किडे होत नाहीत !  🦷 पायरिया  - मुळ्याच्या रसाने दिवसातुन ५ वेळेस गुळण्या कराव्या आराम होतो. - पुदिना स्वच्छ धुवुन हळुहळु चावुन खाल्यास त्वरीत आराम मिळतो.  - आवळा चावुन खाल्यास आराम मिळतो.  🦷दातातील किड  - मधाने दाताची हळुहळु मसाज केल्यास किड व दुर्गंधी जाते. - लवंगाची पावडर व लिंबुचा रस एकत्र करून दातांवर लावल्यास किड जाते.  - बाभळीच्या जाडाचे दातवण रोज सक...

सतेज व सुंदरता - घरगुती उपचार

सतेज व सुंदरता  मागील १०/१५ वर्षात वांग येणे, चट्ठे येणे, अंगावर वांगासारखे डाग दिसणे, यांसारखे सतत चिंतित करणारे प्रश्न पडतात, काही वेळा विशिष्ट असे वांग असतात कि ते सांगणे हि शक्य नसते तर कधीकधी अंगावरील अश्या भागांत असतात कि त्याबद्दल सांगणे देखील अवघड होते. आधी हे पाहुया कि ते येतात का !? कारण आपल्या आहारातील बदलांमुळे रक्तातील जे दोष असतात ते तसेच राहिल्याने त्वचेवर दिसतात. रक्त शुध्द असेल तर वांग होत नाही, ऐरवी सर्वात आधी रक्त शुध्द होणे, पोट साफ होणे व त्यानंतर काही पथ्य व घरगुती उपाय केल्यास नक्कीच परिणाम कारक असे त्वचेमध्ये सतेजता येते, सुंदरता येते आणि तीपण अगदी वीनामुल्य.  १) तुरटी दुधात बुडवुन वांगावर लावावी.  २) डाळिंब व टमाटर चे सुप रोज एकवेळेस ८ दिवस. ३) त्वचेवर दुधात कापुस भिजवुन वांगावर लावावे. ४) कोथींबीर चे ज्युस १५ दिवसात एकदा घ्यावे. कपभर, किमान ४ वेळेस !!  ५) कोरफड चा गर व ताक याचा लेप करून लावावा. ६) काळीमाती मैद्यासारखी बारिक करून त्याचे विहिरीच्या पाण्यात चिखल करून ३ दिवस भिजवुन ठेवावी नंतर ती लेप किंवा क्रिम प्रमाणे रोज लावावी. प्रत्येक २ दि...

आरोग्यदायी जीवन - घरगुती उपचार

Image
आरोग्यदायी जीवन - घरगुती उपचार  मित्रांनो आपण सध्याच्या वातावरणात काही पुर्वीचे व सोपस्कार असे प्रयोग जर घरच्याघरी अगदी मोफत असे असलेले केले तर नक्कीच चांगले परिणाम आपण त्यातुन मिळवु शकतो.  पुर्वीचे लोकांच्या बर्याच क्रिया ह्या आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात.अधीक माहिती हवी असल्यास वैयक्तिक मेसेंजर वर माहिती विचारावी. जे त्यांनी केले ते आपण करूया.  १) महिन्यातुन किमान सलग पाच दिवस जमीनीवर बसुन व पत्रावळीवर जेवण करावे. परिणाम सांगण्यापेक्षा स्वताहा अनुभव करावा.  २) केळीच्या पानावर सकाळचा नाष्टा करावा. ३) शक्य असेल तेवढे जमीनीवर बसुन जेवावे. ४) पाणि नेहमी बसुन व हळुहळु प्यावे. ५) चटणी / ठेचा असे पदार्थ शक्यतो दगडी खलबत्यावर / परपटा वर करावे.  ६) मातीचा कप वापरात घ्यावा. ७) रात्री ७ पर्यंत जेवावे व १० पर्यंत जोपावे. ८) पहाटे पहिल्या प्रहरी उठावे, सुर्योदयापुर्वी नित्यकर्म उरकुन, सुर्योदया सोबत देवपुजा करावी. ९) प्रत्येक सणवारा प्रमाणे जिन्नस करावे.  १०) अमावश्या व पौर्णिमा असल्यास त्यांचे नियमांचे पालन करावे.  ११) कोणत्याही शारिरीक व्याधींवर सर्वात आधी गाई...

गुळघे दुखीवर घरगुती रामबाण उपाय -

गुळघे दुखीवर घरगुती रामबाण उपाय - हळद , सुंठ, मेथी समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण करावे, एक कप पाण्यात एक चमचा टाकून पाऊण कप होईपर्यंत उकळावे त्यात उकळताना थोडा गूळ घालावा, व घ्यावे दिवसातुन एकदा. फक्त पंधरा दिवस सोबत रोज दुपारी जेवण झाल्यावर चिमूटभर खाण्याचा सोडा पाण्यासोबत घ्यावा. संधर्भ-  वैद्य श्री. माळाकोळीकर,  नाडी परीक्षण तज्ञ श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ.   मोबाईल क्रमांक- 7350911888 अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

वजन कमी होणेसाठी.- घरगुती उपचार

Image
  वजन कमी होणेसाठी.- घरगुती उपचार अत्यंत साध्या सोप्या व जुन्या पध्दतीने वीनामुल्य वजन कमी कसे करता येते ते पाहुया. जेवणाचे काही बदल आपणांस वजन लवकर व कायमस्वरूपी कमी करता येऊ शकते आणि तेही कोणत्याही प्रकारचे दुष्परिणामा शिवाय.  १) नाष्टा किंवा जेवणात कोणतेही प्रकारचे लिक्वीड पदार्थ घेऊ नये. उदा. चहा, दुध, डाळ, ताक, पातळ भाजी, कढी व इतर...!!  २) नाष्टा किंवा जेवण जाल्यानंतर १ तासांनी वरील लिक्वीड पदार्थ घेऊ शकता. ३) नाष्टा किंवा जेवणाच्या १ तास आधी व १ नंतर पाणि पीऊ नये. ४) पोळी, भाकरी, चपाती सोबत सुकी भाजी खावी. ५) जेवण सावकाश व हळुहळु करावे. ६) जेवण झाल्यावर गुळ, सौफ, ओवा यापैकी काहीही अगदी थोडे घ्यावे. ७) ताक पिताना त्यात थोडे जीरेपुड टाकुन प्यावी.  ८) ज्यांना दुपारी जेवणानंतर झोपण्याची सवय आहे त्यांनी शक्यतो डाव्याकुशीवर झोपावे. ९) रात्रीचे जेवणानंतर अर्धा ग्लास पाण्यामध्ये मिरीपुड व मिठ टाकुन प्यावे. ( चिमुटभर )  १०) रोज सकाळी अनोश्यापोटी १ चमचा तुप घ्यावे.  ११) किमान ८ तास शांत झोप होणे आवश्यक.  १२) रात्री ८ नंतरचे जेवण बंद केल्यास परिणाम त्वरीत ...

मुक्का मार लागणे- घरगुती उपचार

Image
मुक्का मार लागणे.-घरगुती उपचार  यावर घरगुती उपाय भरपुर आहेत, पण काही त्वरीत आराम दायक उपाय सुचवत आहे.  हळद, मीठ व पाणि मिक्स करून त्याचा लेप त्वरीत लावल्यास ठणक कमी होण्यास व सुज कमी होण्यास मदत होते.  मीठाच्या पाण्याचा शेक केल्यास वेदना कमी होतात.  बजरंग लेप पण उपयुक्त आहे.  खोबरेल तेल, कपुर वड्या ३/४, एक काळिमिरी त्यात टाकुन गरम करावे व मार लागलेल्या जागी हळुवारपणे तेल मुरवल्यास त्वरीत आराम मिळु शकतो.  खोबरेल तेल व हिंगाचा लेप हि उपयुक्त आहे.  हळद, मिठ, पाणी,आणि वारूळ ची माती एकत्र करून गरम करून लेप केल्याने लवकर आराम मिळतो🙏🏻 कधीही मुक्का मार लागला व त्यावर सूज आली तर म्हणजे ती जागा गरम पडते व ligament dammage होतात पण शरीर 3तें 4 दिवसांत dammage भरून काढते, कोणत्याही औषधाशिवाय, फक्त आपणास सूज उतरवण्यासाठी औषधी वापरावी लागतात, त्यासाठी गरम झालेल्या जागी गरम औषधी लावणे म्हणजे कोणत्याही प्रकारची तेलं, किंवा मलम आगीत तेल ओतल्यासारखे होते. त्यासाठी आवश्यक असते ती जागा थंड करणे म्हणून त्याठिकाणी बर्फाचा शेक देने, बर्फ एखाद्या कापडात घेणे व हळुवार पणे त्...

काळी माती चे महत्त्व

Image
  काळी माती -घरगुती उपचार  सर्वात उत्तम व अत्यंत प्रभावी असे काळ्या मातीचे काही प्रयोग करून आपण शारिरीक त्रास घालवू शकतो शिवाय मानसिक स्वास्थ देखील मिळवु शकतो. आपले घरातील जुने जाणते लोक ह्या उपचारांचे प्रयोग करून निरोगी राहत होते आपणही तेच उपाय करून निरोगी राहण्याचा, फायदेशीर आणि वीणाखर्चाचा घरगुती उपचार करूया. काळीमाती मैद्यासारखी बारीक करून ती शक्य असल्यास विहीरीच्या पाण्यात २ दिवस भिजवुन नंतर त्याचा वापर केल्यास उत्तम परिणाम मिळतात. विहिरींचे पाणि नसल्यास कोणतेही पाणि चालेल.  (१) अतिशय पित्त, पोटाचे विविध त्रास, अपचन, गॅस ह्यांचे त्रास असतील त्यांनी मातीची भाकरी पातळ करड्यावर बनवुन ते पोटावर नियमित १५ दिवस रोज १ वेळेस ठेवावी, ती पुन्हा वापरू नये. (२) ज्यांना डोके दुखी, अर्धशीसी, अर्धे डोके, फक्त कपाळ दुखणे असे त्रास असतील त्यांनी पातळ कपड्यावर चौरस मातीची भाकरी बनवुन ठेवल्यास त्वरीत आराम मिळतो. नियमित १० दिवस. (३) युरीक ॲसीड चा ज्यांना त्रास आहे त्यांनी एक टब मध्ये काळी माती व त्यामध्ये गौमुत्र टाकुन त्यात पायांचे पुर्ण पंजे बुडवुन ठेवावे. ३०/४५ मि. असे रोज ८ दिवस केल...

मधमाशी चावली तर उपाय

Image
  मधमाशी चावली तर सर्वात पहिले औषध म्हणजे तुळशीची माती, माहीत नाही का पण त्या मातीने फरक मात्र पडायचा, त्याचा काय आधार आहे माहीत नाही पण आराम मात्र लगेच वाटायचा, कारण ते औषध आपले जुने अडाणी लिहितां वाचता न येणारे पण उपाय मात्र नक्की सांगणारे आजी-आजोबा, आई-बाबा सांगायचे तेही अनुभवाच्या युनिवरसिटीतुन.... 🙏🏼 जुने ते सोने 👍🏼  निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼 संधर्भ-  वैद्य श्री. माळाकोळीकर,  नाडी परीक्षण तज्ञ श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ.   मोबाईल क्रमांक- 7350911888 अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या, निरोगी राहा

Image
  दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या, निरोगी राहा आयुर्वेदात म्हटले आहेत की तांब्याचे पाणी शरीरातील बऱ्याच दोषांना शांत करतं. तसेच या पाण्याने शरीरातील विषारी घटक बाहेर काढले जातात. आपल्याला हे सांगू इच्छितो की तांब्याच्या भांड्यात साचलेले पाणी ताम्रजल म्हणून ओळखले जाते. हे पाणी पूर्णपणे शुद्ध असत. हे सर्व प्रकाराच्या जिवाणूंचा नायनाट करतो. तसेच हे माहित असावे की तांब्याच्या भांड्यात पाणी किमान 8 तास ठेवलेले असावे. तांब्यामध्ये पाणी ठेवण्याचे फायदे जाणून घेऊ या - ▪️अतिसार, कावीळ, आव किंवा आमांश सारख्या आजाराशी लढायला खूप उपयुक्त आहे. ▪️ पोटात दुखणे, गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रासाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला या त्रासापासून त्वरित मुक्ती मिळते, तसेच हे पाणी पिण्यामुळे कधीही काही समस्या उद्भवत नाही. ▪️ तांब्यात ठेवलेले पाणी प्यायल्यानं कर्करोगाच्या समस्ये विरुद्ध लढण्याची समस्या वाढते. कारण यामध्ये कर्कविरोधी घटक असतात. ▪️शरीरातील जखमा अंतर्गत किंवा बाह्य असतील त्वरित बरे होण्यात मदत करणे फायदेशीर ठरते. ▪️ तांबा हे प्यूरिफायरचे काम करतं. पाण्यातील अशुद्धींना दूर करतं....

भोजनातील हानिकारक संयोग

Image
  भोजनातील हानिकारक संयोग दुधा सोबत दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु, हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधा सोबत हानिकारक आहेत. दह्या सोबत खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज), मूळा इत्यादि घेऊ नये. तुपा सोबत थंड दुध, थंड पाणी समप्रमाणात मद्य हानिकारक असते. मधा सोबत मूळ, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात. फणसा नंतर पान खाणे हानिकारक असते. मुळ्या सोबत गुळ खाणे नुकसान दायक असते. खीरी सोबत खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये. गरम पाण्याबरोबर मध घेऊ नये थंड पाण्याबरोबर शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गर्म भोजन घेऊ नये. कलिंगडा बरोबर पुदीना किंवा थंड पाणी घेऊ नये. चहा सोबत काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये. माशा सोबत दुध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये. मांसा बरोबर मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते. गरम जेवणा बरोबर थंड जेवण, थंड पेय हानिकारक असतात. खरबुजा बरोबर लसूण, मुळा, मुळ...